इंग्रज मराठा युद्धे – भाग २

पहिल्या युद्धानंतरचा शांत काळ

०१. या तहानंतर वीस वर्षात इंग्रज व मराठा यांच्यात समस्या निर्माण झाली नाही. १७९९ मध्ये सरदेशमुखी व चौथाई प्रश्नावरून पेशव्यांचे निजामाशी युद्ध झाले.

-खर्डा येथील युध्दात निजामाचा पराभव झाला. निजामाने १७६८ च्या तहाची आठवण देऊन इंग्रजाकडे मदत मागितली. पण  इंग्रजांनी मराठ्याविरुद्ध मदत दिली नाही.

०२. २५ ऑक्टोबर १७९५ रोजी नाना फडणीसच्या त्रासाने सवाई माधवरावने  आत्महत्या केली.

-१७९५ मध्ये सवाई माधवरावाच्या मृत्यूनंतर नानाने सवाई माधवरावाच्या पत्नीला दत्तक घ्यावयास लावून त्याच्या नावाने गादी चालवावी अशी योजना केली

०३. दुसऱ्या बाजीरावाने पेशवेपद मिळविण्यासाठी दौलतराव शिंद्याचे साहाय्य घेतले पेशवेपदासाठी दुसरा बाजीराव व अमृतराव यांच्यात संघर्ष होऊन पुण्यात लुटालूट, मारामाऱ्या सुरु झाल्या.

-६ डिसेंबर १७९६ रोजी रघुनाथरावाचा मुलगा दुसरा बाजीराव पेशवा बनला. बाजीरावाने गादीवर येताच रघुनाथरावाच्या पक्षाविरुद्ध असणाऱ्या रास्ते, होळकर इ सरदारांचा सूड उगविण्यास सुरुवात केली त्यातूनच शिंदे व होळकर यांच्यात वितुष्ट आले.

०४. यावेळी पेशव्यांची बाजू घेणारा इंदौरचा तुकोजी होळकर वारला व त्याच्या वारसाचा प्रश्न उद्भवला. नाना व पेशवे यांनी एकमेकांच्या विरुद्ध बाजू घेतल्या. बारभाईंच्या कारभारात नाना फडणीस यांच्यावर आरोप झाले.

-त्याच तणावात १३ मार्च १८०० रोजी नाना फडणीस यांचे निधन झाले व पेशव्यांच्या राजकारणात ताळतंत्र राहिला नाही.

०५. याचवेळी लॉर्ड वेलस्ली गवर्नर जनरल म्हणून आला. त्याने दुसऱ्या बाजीरावशी मैत्री संपादन केली. वेलस्लीने बाजीरावला तैनाती फौज पद्धत स्वीकारण्याचा आग्रह केला. पण बाजीरावने त्यास नकार दिला.

०६. याचवेळी यशवंतराव होळकर व दौलतराव शिंदे एकमेकांच्या प्रदेशात धुमाकूळ घालत होते. विठोजी होळकरने पेशव्यांच्या प्रदेशात गडबड सुरु केली. त्याला आवर घालण्यासाठी शिंदे पेशव्यांच्या मदतीला धावला.

०७. १६ एप्रिल १८०१ रोजी त्यांनी मिळून होळकराबरोबरील माळवा युद्धात विठुजी होळ्कराचा हत्तीच्या पायी देऊन वध केला.

-त्यामुळे त्याचा भाऊ यशवंतराव होळकर याने संतप्त होऊन १८०२ साली पुण्यावर चाल केली.

-पेशवे व शिंदेना होळकरांनीऑक्टोबर २५ १८०२ रोजी पुण्याच्या जवळ पराभूत केले. पराभवा नंतर होळकरांनी पुण्याचा ताबा घेतला

०८. यशवंतच्या भीतीने बाजीराव वसईला पळून गेला. ३१ डिसेंबर १८०२ रोजी इंग्रज व त्याच्यात वसईचा तह झाला. बाजीरावने इंग्रजांच्या तैनाती फौजेचे रक्षण स्वीकारले.

-या तहानुसार दोन्ही पक्षांनी आपापला प्रदेश सांभाळावा. वसईच्या तहामुळे पेशव्यांनी आपली जवळ जवळ सर्व सत्ता इंग्रजांकडे सुपूर्द केली.

-मराठ्यांची सत्ता याचवेळी संपुष्टात आली असे मानले जाते.

०९. इंग्रजांनी बाजीरावला पेशवे पद परत मिळविण्यासाठी ६००० फौज व तोफखाना द्यावा. फौजेच्या खर्चापोटी बाजीरावने वार्षिक २६ लाख रुपये इतके उत्पन्न मिळेल असा प्रदेश इंग्रजांना द्यावा.

-पेशव्याने इंग्रजांच्या परवानगीशिवाय कोणत्याही परकीय व्यक्तीस आपल्या सेवेत घेऊ नये.

-तसेच पेशव्याने सुरतमधील हक्क कंपनीस द्यावे असे ठरले होते. याशिवाय निजाम व गायकवाड यांच्यासोबत पेशव्यांच्या असलेल्या वादात लवाद म्हणून इंग्रजांना पेशव्यांनी मान्यता दिली.

दुसरे इंग्रज मराठा युध्द (१८०३)

०१. वसईच्या तहानंतर वेलस्लीने कारवाई केली. तो आपल्या फौजेसह १३ मे १८०३ रोजी पुण्यात आला. त्याने दुसऱ्या बाजीरावास पेशवे म्हणून जाहीर केले.

-बाजीरावाने पेशवेपदासाठी मराठी सत्ता इंग्रजांना विकली होती.

– साऱ्या मराठा मंडळाला वसईचा तह अपमानास्पद वाटला. होळकर, शिंदे आणि भोसले एक झाले आणि त्यांनी इंग्रजांशी लढा देण्याचे ठरविले.

०२. शिंदे व भोसले यांचे सुमारे एक लाख सैन्य मोगलाईच्या सरहद्दीवर एकत्र झाले. इंग्रजांनी सर्व प्रांतांतून ५०,००० फौज गोळा केली त्यांनी चारी बाजूंनी मराठ्यांविरुद्ध मोहीम सुरु केली.

-मराठे संस्थानिकांनीही फ्रेंचांकडून सैन्य मदत घेतली होती. भारतातील फ्रेंच प्रभुत्व कमी करणे हेही ब्रिटीशांचे धोरण होते.

-अशा प्रकारे बाजीराव-इंग्रज सरकार-ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध शिंदे व इतर काही मराठा संस्थानिक असे दुसरे इंग्रज मराठा युद्ध सुरु झाले.

०३. इंग्रजांनी मराठ्यांना चुचकारण्यासाठी सरळसरळ संस्थानिकांच्या शहरांवर हल्ल्याची योजना बनवली. शिंद्यानीही शत्रुला लवकर संपवावे या दृष्टीने आपली सेना दक्षिणेला भोसल्यांच्या मदतीला पाठवली.
-महाराष्ट्रात जालना जिल्ह्यात आष्टी, अकोला जिल्ह्यात आडगाव तसेच चिखलदऱ्याजवळील गविलगड येथे वेलेस्लीने मराठ्यांचा निर्णायक पराभव केला.
०४. त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा देण्यासाठी मराठा सरदारांशी गुप्तपणे बोलणी केली. परंतु ती यशस्वी झाली नाहीत. मराठा सरदारातील दुफळी पाहून दक्षिण आघाडीवर गवर्नर वेलस्लीचा भाऊ आर्थर वेलस्ली याची नेमणूक केली गेली.

-त्याने शिंद्यांचा पराभव केला. यावेळी होळकर शिंद्यांच्या मदतीला आले नाहीत. यानंतर शिंदे व इंग्रज यांच्यात सुर्जी-अंजनगावचा तह झाला.

०५. इंग्रजांनी उत्तरेतील आघाडीवर जनरल लेकची नेमणूक केली. त्याने तेथे भोसल्यांचा पराभव केला. १७ डिसेंबर १८०३ रोजी भोसले व इंग्रज यांच्यात देवगावचा तह झाला.

-दोन्ही तहानुसार शिंदे व भोसले यांनी वसईच्या तहास मान्यता दिली. इतकेच नव्हे तर दोघांनीही युद्धप्रसंगी इंग्रजांना मदत करण्याचे कबुल केले.

-इंग्रजांनी शिंदे व भोसले यांना तैनाती फौज स्वीकारावयास लावल्या.

-इंग्रजांनी भोसल्यांकडून कटक प्रांत व शिंदेकडून भडोच, अहमदनगर दिल्ली हे प्रदेश ताब्यात घेतले.

०६. उत्तरेकडे जनरल लेक यांनी दिल्ली काबीज केली.यशवंतराव होळकरांनी मराठ्यांची चाललेली ससेहोलपट पाहून युद्धात उतरण्याचा निर्णय घेतला.

-लष्करी दरारा व मुत्सदेगीरी यावर इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले. मराठे संस्थानिकांचे सार्वभौमत्व कायम राहिले परंतु मराठ्यांना गुजरात व ओरिसाचा भूभाग गमवावा लागला.

०७. इंग्रजांच्या तुलनेने पाचपट सैन्य असूनही मराठा सैन्य सर्व आघाड्यावर पराभूत होत गेले. या दुसऱ्या इंग्रज मराठा युध्दात इंग्रजांचा मोठा राजकीय लाभ झाला.

– या मिळकतीमुळे इंग्रजांचा बंगाल व मद्रास येथील टापू सलग एकत्र जोडला गेला. अनेक लहान मोठ्या राज्यांच्या गळ्यात तैनाती फौजेचा पाश अडकला. मराठा सरदारांचे पेशवे, निजाम, इंग्रज यांच्यावर असलेले येणे रकमांचे सर्व दावे त्यांना सोडून द्यावे लागले.

इंग्रज मराठा युद्धे – भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

इंग्रज मराठा युद्धे – भाग ३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.