नियोजन व पंचवार्षिक योजना

जगात पहिल्यांदा नियोजनाचा स्वीकार १९२८ साली सोव्हिएत रशियाने केला.

१९२९ च्या काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनात नियोजन संकल्पनेचा विचार करण्यात आला.

१९३४ साली एम. विश्वेश्वरय्या यांनी ‘Planned Economy for India’ या ग्रंथात सर्वप्रथम नियोजनाची संकल्पना मांडली.

भारतीयभांडवलदारांची संघटना ‘Federation of Indian Chambers of CommerceIndustries (FICCI) ने भारतात नियोजनाची आवश्यकता आहे असे सांगितले.

१९३८ च्या काँग्रेसच्या अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समिती स्थापन करण्यात आली.

१९४४ मध्ये मुंबईतील ८ उद्योगपतींनी भांडवलाच्या जोरावर Bombay Plan तयार केला. यास टाटा-बिर्ला योजना असेही म्हणतात.

१९४४ मध्येश्रीमान नारायण अग्रवाल यांनी गांधीजींच्या आर्थिक विचारावर आधारित गांधीयोजना तयार केली.  १९४५ मध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांनी जनता योजना मांडली.

१९५० मध्ये लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी सर्वोदय योजना आणली.

योजनासर्वाधिक खर्चटक्केवारीतुटीचा भरणाएकूण आराखडाप्रत्यक्ष खर्च
१ लीकृषी व जलसिंचन४५२२३२०६९१९६०
२ लीवाहतूक व दळणवळण२८९४५४८००४६७३
३ लीवाहतूक व दळणवळण२४.६११३३७५००८,५७७
तीन वार्षिकउद्योग व खाणी २२.८१५,७७९
४ थीवाहतूक व दळणवळण १९.५२०६०१५,९०१३९,४२६
५ वीउद्योग व खाणी २२.८५८३०३८,८५३१,९००
६ वीऊर्जा निर्मिती२८.११५,६८४९७,५००२,१८,७३०
७ वीऊर्जा निर्मिती३०.४५३४,६६९१,८०,०००५,२७,०१२
८ वीऊर्जा निर्मिती व जल२५.४८२०,०००४,३४,१००
९ वीशेती१९.४८,७५,०००९,४१,०४१
१० वीऊर्जा२६.४७१९,६८,८१६
११ वीसामाजिक सेवा३०.२४३६,४४,७१८

योजना व नियोजन मंडळाचे अध्यक्ष

योजनानियोजन मंडळाचे अध्यक्षआकृतीबंधनियोजन मंडळाचे उपाध्यक्ष
१ ली योजनाजवाहरलाल नेहरुहेरॉल्ड डोमरगुलझारीलाल नंदा
२ ली योजनाजवाहरलाल नेहरुपी.सी.महालनोबिसव्ही.टी.कृष्णम्माचारी
३ ली योजनाजवाहरलाल नेहरुपी.सी.महालनोबिसमसुदा –अशोक मेहता
तीन वार्षिकजवाहरलाल नेहरुपी.सी.महालनोबिसप्रा. लाकडवाला
४ थी योजनाइंदिरा गांधीगाडगीळ तंत्रप्रा. लाकडवाला
५ वी योजनाइंदिरा गांधीधनंजयराव गाडगीळनारायणदत्त तिवारी
६ वी योजनामोरारजी देसाईसी सुब्रह्मण्यम (रद्द)मनमोहन सिंग
७ वी योजनाइंदिरा गांधीडी. बी.धरआर.के.हेगडे
८ वी योजनाराजीव गांधीप्रा.रॅगनरचंद्रशेखर
९ वी योजनाव्ही. पी.सिंगअशोक रुद्र व ऍलनमोहन धारिया
१० वी योजनाएच.डी.देवगौडासी.एन.वकीलपी.व्ही.नरसिंहराव
११ वी योजनाअटलबिहारी वाजपेयीव ब्रह्मानंद रावप्रणव मुखर्जी

पंचवार्षिक योजना

०१ एप्रिल १९५१ पासून भारतात आर्थिक आर्थिक नियोजनास सुरवात झाली.  ही पध्दती भारताने रशियाकडून स्वीकारली आहे.

७ वार्षिक योजनाही भारतात राबविल्या गेल्या त्यातील १९६६-६९ च्या कालावधीत योजनेला सुट्टी (Plan Holiday) असे म्हणतात.

पंचवार्षिक योजना तयार करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर ‘केंद्रीय नियोजन मंडळ’ आणि ‘राष्ट्रीय विकास परिषद’ दोन संस्था कार्य करतात.

केंद्रीय नियोजन मंडळ

स्थापना : १५ मार्च १९५०
पहिली बैठक : २८ मार्च १९५०
स्वरूप : असांवैधानिक, सल्लागार मंडळ
अध्यक्ष : पंतप्रधान (पदसिद्ध अध्यक्ष)

नियोजन मंडळाची कार्ये:

देशातील संसाधने, भांडवल, भौतिक साधन सामग्री यांचा विचार करून त्यांचा वापर करता येईल अशी योजना आखणे.

केंद्र व राज्यांना सल्ला देणेयोजनेस राष्ट्रीय विकास परिषदेकडून मान्यता प्रा[त करून घेणे

राष्ट्रीय विकास परिषद

स्थापना : ६ ऑगस्ट १९५२, पंचवार्षिक योजना
उद्देश : निर्मिती प्रक्रियेत घटक राज्यांच्या सहभागासाठी
स्वरूप : असंवैधानिक
अध्यक्ष : पंतप्रधान
सदस्य : सर्व केंद्रीय कॅबिनेट मंत्री, घटकराज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक, नियोजन मंडळाचे सर्व सदस्य

कार्य:

नियोजन मंडळाने तयार केलेल्या अंतिम आराखड्यास मान्यता देणेनियोजन अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक तत्वे सांगणे

वर्षातून दोन बैठक घेणे