साक्षरता अभियान 
राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रम (१९७८)
(National Adult Education Programme)

उद्देश : १५ ते ३५ वयोगटातील निरक्षरापर्यंत शिक्षणाच्या सुविधा पुढील ५ वर्षात पोहोचविणे.


राष्ट्रीय साक्षरता मिशन (५ मे १९८८)
उद्देश : १५ ते ३५ या वयोगटातील निरक्षरांना कार्यात्मक साक्षर बनवणे.

तत्व : एकाने एकाला शिकवावे.

कार्यात्मक साक्षरता म्हणजे फक्त Reading, Writing & Arithmetic एवढेच न शिकता.सामाजिक विकासाप्रती लोकांना जागृत करणे होय.

१९९५ पर्यंत ८ कोटी निरक्षकांना साक्षर करणे.


साक्षर भारत 
८ सप्टेंबर २००९ रोजी राष्ट्रीय साक्षरता मिशनची पुनर्रचना  
साक्षर भारत हा कार्यक्रम (डॉ.मनमोहन सिंग)

या मध्ये स्त्री साक्षरतेवर भर तसेच पंचायत राज व्यवस्थांचा सहभाग वाढविण्यावर भर.

यामध्ये ३७२ जिल्हे,४४४१ तालुके व १,६१,९९३ ग्रामपंचायती सहभागी.

अकराव्या योजनेचे उद्दिष्टे ८० % साक्षरता प्राप्त करणे हे होते.



प्राथमिक शिक्षण योजना
Operation Black Board (1987-88) 
उद्देश : प्राथमिक शाळांना मुलभूत सुविधा पुरविणे. (उदा. खडू,फळा,नकाशे,इत्यादी)

२००२-०३ मध्ये ही योजना सर्व शिक्षा अभियानात वर्ग.


मध्यान्ह आहार योजना (Mid Day Meal)
१५ ऑगस्ट १९९५ 
उद्देश : शाळेतील पटनोंदणी व उपस्थिती वाढविण्यासोबत विद्यार्थी पोषणस्तरात वाढ करणे. 

सुरुवातीला पहिली ते पाचवी पर्यंत (
२००७ पासून ८ वी पर्यंत) 

प्राथमिक शाळातील विद्यार्थ्याना (१ ली ते ५ वी) ४५० कॅलरीज व १२ ग्राम प्रोटीन. 

उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ६ वी ते ८ वी पर्यंत ७०० 
कॅलरीज व २० ग्राम प्रोटीन. 

२०११ -१२ मध्ये १०.४६ कोटी विद्यार्थ्यांना लाभ (९१२८ कोटी खर्च)

प्राथमिक शिक्षणातील एवढ्या मोठ्या संख्येला अन्नसुरक्षा देणारी जगातील सर्वात मोठी योजना. 


सर्व शिक्षा अभियान (२००१)

उद्देश :
०१. ६ ते १४ वर्ष वयोगटातील बालकांना उपयुक्त व योग्य प्राथमिक शिक्षण देऊन शिक्षणाचे सर्वत्रीकरण करणे. 


०२. शालेय व्यवस्थापनात समाजाचा सहभाग घेऊन शिक्षणातील सामाजिक ,प्रादेशिक व लैंगिक भेद दूर करणे. 


०३. याअंतर्गत 
i)शाळा नसलेल्या ठिकाणी शाळा उभारणे. 
ii)शाळामध्ये पायाभूत सुधारणा करणे. उदा.पिण्याचे पाणी,स्वच्छलय ई. 
iii)अतिरिक्त शिक्षण व त्यांना प्रशिक्षण देणे. 
iv)शैक्षणिक साहित्य विकसित करण्यासाठी निधी उपलब्ध करणे. 
v)पाठ्यपुस्तके ,गणवेश पुरविणे 
vi)संगणकाचे प्रशिक्षण देणे. 


शिक्षकांच्या अध्यापन व निरंतर प्रशिक्षणासाठी ११९५ मध्येच शिक्षण अध्यापन राष्ट्रीय परिषद स्थापन झाली होती. 

खर्च 
राज्य : केंद्र
७५:२५ 
नंतर ६५:३५ 
सिक्कीम व ईशान्य पूर्व राज्य खर्च वाटा ९०:१० 


मुलींच्या प्राथमिक शिक्षणासाठी राष्ट्रीय योजना (NPEGEL) (National Programme for Education of Girls At Elementary Level) 
जुलै २००३ 
सर्व शिक्षा अभियानाची उपयोजना शैक्षणिक दृष्ट्या मागास तालुक्यात 
या अंतर्गत 
मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी आदर्श समूह शाळा उभारणे (Model Cluster School) 
मुलीना स्वत:बद्दल आदर व आत्मविश्वास वाढविणे. 
व्यवसायिक व जीवनकौशल्य शिक्षण देणे. 

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय 

ऑगस्ट २००४ 
२००७ पासून सर्व शिक्षा अभियानाची उपयोजना. 
अनुसूचित जाती ,जमाती व अल्पसंख्यांक गटातील मुलींसाठी उच्च प्राथमिक शिक्षणाची सोय असणारी विद्यालये उभारणे. 

आदर्श शाळा (Model School)

२००८ 
प्रत्येक तzलुक्याला एक असे ६००० मॉडेल स्कूल उभारणे. 



माध्यमिक शिक्षण योजना
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान 
(RMSA) 2003 
या मध्ये माध्यमिक शिक्षणाची उपलब्धता व स्तर उंचावणे यांसाठी 

उद्दिष्टे
०१. शाळांची उपलब्धता वाढवणे. 
०२. माध्यमिक शिक्षण घेणाऱ्यांची संख्या ७५% पर्यंत वाढविणे. 
०३. गुणवत्ता वाढविणे व विषमता दूर करणे. 
०४. २०१७ पर्यंत माध्यमिक शिक्षणाच्या उपलब्धतेचे सर्वत्रीकरण करणे. 
०५. २०२० पर्यंत माध्यमिक शिक्षणातील गळती थांबविणे शिवाय ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक,विज्ञान,गणित व इंग्रजी विषयावर भर 

शिक्षक प्रशिक्षण, विज्ञान प्रयोगशाळा,व माहिती तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण ही काही प्रमुख लक्ष्ये 


खर्च 
राज्य : केंद्र

७५:२५ 
सिक्कीम व ईशान्य पूर्व -९०:१०