सध्याच्या गुजरात व महाराष्ट्र राज्याचे मिळुन दि . १ नोव्हेंबर १९५६ रोजी द्विभाषिक मुंबई राज्य स्थापन झाले. मध्य प्रांतातून व हैद्राबाद राज्यातून मराठवाडा मुंबई राज्याला जोडले. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. व गुजरात मुंबई राज्यातून वेगळे केले गेले.
स्थान – १५.८ उत्तर ते २२.१ उत्तर अक्षांश , ७२.३६ पुर्व ते – ८०.९ पुर्व रेखांश दरम्यान.
क्षेत्रफळ – ३.०७,७१३ चौ.कि.मी.
महाराष्ट्र देशाच्या ९.३६% क्षेत्रफळाने व्यापलेला आहे.
लांबी – पुर्व पश्चिम लांबी ८०० कि.मी. व
रुंदी – उत्तर दक्षिण ७०० कि.मी. आहे.
किनारपट्टीची लांबी – ७२० कि.मी.
एकूण क्षेत्रफ़ल :- ३,०७,७१३ चौ. किमी
क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात राजस्थान व मध्य प्रदेश नंतर तीसरा क्रमांक लागतो.
महाराष्ट्र (प्रशासकीय)
प्रशासकीय संरचना
महसूली विभाग – ६
जिल्हे – ३६
तालुके – ३५५
* बांद्रा , अँधेरी , बोरीवली, या तीन नगरी ३५८ तालुके.
लोकसंख्या :-
एकूण लोकसंख्या – ११,२३,७३००० (अकरा कोटि तेविस लाख त्र्यहत्तर हज़ार)
घनता – ३६५/चौ. किमी
साक्षरता – ८२.९%
स्त्री / -पुरुष – ९२५ / १०००
नागरी लोकसंख्या – ४५. २ %
स्थूल राज्य उत्पादन –
औद्योगिक व सेवा – ८७%
कृषि संलग्नित – १३%
वनक्षेत्र – ६१,९३९ किमी
वाहतूक :-
एकूण रेलवेमार्ग – ५९८४ किमी
एकूण रस्ते – २,४१,७१२ किमी
नैसर्गिक सीमा
वायव्येस सातमाळा डोंगररांगा, गाळण टेकड्या व सातपुडा पर्वतातील आक्रणी टेकड्या आहेत.
उत्तेरस सातपुडा पर्वत, त्याच्या पूर्वेस गाविलगड टेकड्या आहेत.
ईशान्येस दरकेसा टेकड्या व पूर्वेस चिरोल टेकड्या आणि भामरागड डोंगर आहे.
पश्चिमेस अरबी समुद्र असून राज्याची किनारपट्टी उत्तरेकडील दमण गंगा नदीपासून दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत पसरलेली आहे.
महाराष्ट्र (प्रशासकीय)
राज्यातील काही भागांतील वैशिष्ट्य पुर्ण नावे
सह्याद्रीच्या पश्चिमेकडचा सखल प्रदेश –कोकण
कोकणाचे प्राचीन नाव – अपरांत
सह्याद्रीच्या पायथ्यालगतचा कोकणाचा भाग – तळ
कोकणसह्याद्री माथा तसेच त्याच्या लततचा पूर्वेकडील भाग – मावळ
सह्याद्रीच्या पुर्वेकडील पठाराचा पश्चिम भाग – देश
औरंगाबाद विभागातील आठ जिल्हे – मराठवाडा
विदर्भाचा पुर्व भाग – झाडी
मध्य व पश्चिम भाग – व-हाड.
पुणे विभागातील जिल्हे व नाशिक आणि अहदनगर मुळे बनणारा भाग – पश्चिम महाराष्ट्र
जळगांव धुळे नंदुरबार मिळून बनणारा भाग – (तापी खोरे) – खानदेश
राजकीय सीमा
महाराष्ट्राला एकूण ६ राज्यांच्या सीमा स्पर्श करतात. यापैकी सर्वाधिक लांब सीमा मध्य प्रदेशबरोबर असून सर्वात कमी सिमा गोवा या राज्याबरोबर आहे. तसेच दादरा नगर हवेली ह्या केंद्रशासित प्रदेशात सिमा लागते.
वायव्य गुजरात- ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार
उत्तर मध्यप्रदेश – नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा व गोंदिया
पुर्व छत्तीसगढ – गोंदिया व गढचिरोली
आग्नेय आंध्रप्रदेश – गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड
दक्षिण कर्नाटक – नांदेड, लातूर, उस्मानाबाद,सोलापूर, सांगली, कोल्हापूर,सिंधुदुर्ग
दक्षिण गोवा – सिंधुदुर्ग
स्थानिक स्वराज्य संस्था :-
जिल्हा परिषदा – ३४
पंचायत समिति – ३५१
ग्राम पंचायती – २७,९०६
महानगरपालिका – २६
नगर परिषदा – २१९
महाराष्ट्र (प्रशासकीय)
इतर माहिती
लोकसंख्येनुसार देशात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो.
१. उत्तर प्रदेश (१९. ९६ कोटी )
पशुधन आणि कुक्कुट पालनामध्ये राज्य देशात सहावे आहे.
महाराष्ट्र हे देशातील सर्वात जास्त औद्योगिकरण झालेले राज्य आहे.
राज्याचा मानव विकास निर्देशांक – ०. ५७२ (देशात पाचवा क्रमांक १.केरळ २.दिली ३.गोवा ४.पंजाब)
राज्याच्या वायव्येस असणारा केंद्रशासित प्रदेश – दादरा व नगरहवेली
दोन राज्यांना संलग्न आसणारे जिल्हे – धुळे, नंदुरबार, गोंदिया, गडचिरोली, नांदेड, सिंधुदुर्ग
राज्य स्थापनेच्या वेळी असणारे जिल्हे व प्रशासकीय विभाग – २६ व ४
महाराष्ट्रात असणारे एकून जिल्हे व तालुके – ३६ व ३५७
क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा – अहमदनगर
क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा – मुंबई
महाराष्ट्रातील सर्वात पुर्वेकडील जिल्हा – गडचिरोली
सर्वाधिक उत्तरेकडच्या जिल्हा – नंदुरबार
सर्वाधिक दक्षिणेकडचा जिल्हा – सिंधुदुर्ग
महाराष्ट्रातील सर्वाधिक पश्चिमेकडचा जिल्हा – ठाणे
सर्वाधिक जिल्ह्यांसोबत सिमा असणारा जिल्हा – अहमदनगर (एकूण सात जिल्ह्यांत)
जिल्हा माहिती
सन १९५१ मध्ये मुंबई राज्यात २८ जिल्हे होते . यात गुजरात व महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा समावेश होता .
१ मे १९६० रोजी महाराष्ट्रात एकूण २६ जिल्हे होते . त्यानंतर १० जिल्हे अस्तित्वात आले .
१ | सिंधुदुर्ग | १ मे १९८१ | रत्नागिरी मधून |
२ | जालना | १ मे १९८१ | औरंगाबाद मधून |
३ | लातूर | १६ ऑगस्ट १९८२ | उस्मानाबाद मधून |
४ | गडचिरोली | २६ ऑगस्ट १९८२ | चंद्रपुर |
५ | मुंबई उपनगर | १९९० | मुंबई |
६ | नंदुरबार | १ जुलै १९९८ | धुळे |
७ | वाशीम | १ जुलै १९९८ | अकोला |
८ | हिंगोली | १ मे १९९८ | परभणी |
९ | गोंदिया | १ मे १९९९ | भंडारा |
१० | पालघर | २ ऑगस्ट २०१४ | ठाणे |
सरहदीना लागून असणारे जिल्हे
राज्य | जिल्हे |
गुजरात | १.पालघर २.नाशिक ३.धुळे ४.नंदुरबार |
मध्य प्रदेश | १.नंदुरबार २.धुळे ३.जळगाव ४.बुलढाणा ५.अमरावती ६.नागपूर ७.भंडारा ८.गोंदिया |
छत्तीसगड | १.गोंदिया २.गडचिरोली |
तेलंगाना | १. गडचिरोली २.चंद्रपूर ३.यवतमाळ ४.नांदेड |
कर्नाटक | १.सिंधुदुर्ग २.कोल्हापूर ३.सांगली ४.सोलापूर ५.उस्मानाबाद ६.लातूर ७.नांदेड |
गोवा | सिंधुदुर्ग |
क्षेत्रफळानुसार पाच मोठे जिल्हे :-
१. अहमदनगर – १७०४८ किमी
२. पुणे – १५६४३ किमी
३. नाशिक – १५५३० किमी
४. सोलापूर – १४८९५ किमी
५. गडचिरोली – १४४१२ किमी
क्षेत्रफळानुसार पाच लहान जिल्हे :-
१. मुंबई शहर – १५७ किमी
२. मुंबई उपनगर – ४४६ किमी
३. भंडारा – ३८९५ किमी
४. हिंगोली – ४५२४ किमी
५. नंदुरबार – ५०३४ किमी
प्रशासकीय विभाग
प्रशासकीय विभाग व त्यांचे क्षेत्रफळ (उतरता क्रम):-
१. औरंगाबाद – ६४८१३ किमी
२. नाशिक – ५७४९३ किमी
३. पुणे – ५७२७५ किमी
४. नागपूर – ५१३७७ किमी
५. अमरावती – ४६०२७ किमी
६. कोंकण – ३०७२९ किमी
प्रशासकीय विभाग व त्यातील तालुके (उतरता क्रम):-
१. औरंगाबाद – ७६
२. नागपूर – ६४
३. पुणे – ५८
४. अमरावती – ५६
५. नाशिक – ५४
६. कोंकण -५०
प्रशासकीय विभाग व जिल्हे
प्रशासकीय विभाग | जिल्हे |
औरंगाबाद | १.औरंगाबाद २.लातूर ३.बीड ४.उस्मानाबाद ५.परभणी ६.हिंगोली ७.नांदेड ८.जालना |
कोकण | १.मुंबई शहर २.मुंबई उपनगर ३.ठाणे ४.पालघर ५.रायगड ६. रत्नागिरी ७.सिंधुदुर्ग |
पुणे | १.पुणे २.कोल्हापुर ३.सातारा ४.सांगली ५.सोलापूर |
नाशिक | १.नाशिक २.धुळे ३.अहमदनगर ४.जळगाव ५.नंदुरबार |
अमरावती | १.बुलढाणा २.अमरावती ३.वाशीम ४.यवतमाळ ५.अकोला |
नागपूर | १. नागपूर २.भंडारा ३.गोंदिया ४.चंद्रपूर ५.गडचिरोली ६.वर्धा |
प्राकृतिक महाराष्ट्र विषयी माहिती वाचा