महर्षी धोंडो केशव कर्वे
जन्म : १८ एप्रिल १८५८
जन्मस्थळ : शिरवली, मुरूड, रत्नागिरी
मृत्यू : ९ नोव्हेंबर १९६२
प्रभाव : पंडिता रमाबाई, ईश्वरचंद्र विद्यासागर, हर्बर्ट स्पेन्सर, विष्णुशास्त्री चिपळूणकरवैयक्तिक जीवन
१. धोंडो केशव उर्फ अण्णासाहेब उर्फ महर्षी कर्वे यांचा जन्म एका चितपावन ब्राह्मण कुटुंबात निम्न मध्यमवर्गीय घरात झाला. प्राथमिक शाळेतील सोमण गुरुजी यांच्याकडून त्यांना लोकसेवेची प्रेरणा मिळाली.
०२. मुरुड येथील प्राथमिक शिक्षणातील सहावीच्या सरकारी परीक्षेसाठी १२५ मैल अंतरावर असलेल्या सातारा केंद्रावर कुंभार्ली घाटातून पायी जाण्यासाठी त्यांना तीन दिवस लागले. सातवी परीक्षेनंतर काही काळ त्यांना मुरूडच्या प्राथमिक शाळेतच शिक्षकाचे काम करावे लागले.
०३. १८७३ साली वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा राधाबाईंशी विवाह झाला. राधाबाई त्या वेळी ८ वर्षांच्या होत्या. पण वयाच्या २७ व्या वर्षी, इ.स. १८९१ साली बाळंतपणात राधाबाईंचा मृत्यू झाला
०४. १८८१ साली मुंबईच्या रोबर्ट मनी हायस्कूल मधून ते मैट्रिक उत्तीर्ण झाले त्यानंतर त्यांनी मुंबईच्या विल्सन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तेथून त्यांनी गणित विषय घेऊन १८८४ साली बी.ए. पदवी संपादन केली. त्यानंतर एल्फिन्स्टन हायस्कूल मध्ये शिक्षकाची नोकरी पत्करली
०५. गोपाळ कृष्ण गोखले यांच्या मदतीमुळे १५ नोव्हेंबर १८९१ रोजी अण्णासाहेबांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन कॉलेजात गणित शिकवायला सुरुवात केली. पुढे इ.स. १९१४पर्यंत त्यांनी ही नोकरी केली. १८९२ मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीवन सदस्यत्वही त्यांना देण्यात आले.
०६. लोकमान्य टिळक हे फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापन करीत होते. पण राजकारणाच्या रणधुमाळीत ते उतरल्यानंतर त्यांच्या रिकाम्या जागी गणित विभागाचे प्रमुख असणारे गोपाळ कृष्ण गोखले यांनी अण्णांना बोलावून घेतले. इ.स. १८९१ ते इ.स. १९१४ या प्रदीर्घ कालखंडात अण्णांनी गणित हा विषय शिकवला.
०७. १९२८ साली कर्वेंचे मराठी भाषेतून ‘आत्मवृत्त’ नावाचे आत्मचरित्र प्रकाशित झाले. तर १९३६ साली ‘लुकिंग बॅक’ या नावाने इंग्रजीतून आत्मचरित्र प्रकाशित करण्यात आले.
सामाजिक कार्य
०१. ३१ डिसेंबर १८९३ रोजी त्यांनी ‘विधवा विवाह संघ’ (विधवा विवाहोत्तेजक मंडळ) या संस्थेची स्थापना केली.१ मे १८९४ या दिवशी अण्णांनी पुनर्विवाहितांचा एक कुटुंबमेळा घेतला. याच सुमारास १८९५ साली अण्णांनी संस्थेचे ‘विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळ’ असे नामांतर केले. विधवांच्या पुनर्विवाहपूर्वी असलेल्या मुलांसाठी त्यांनी आपल्या घरातच वसतिगृह सुरु केले.
०२. वयाच्या ४२व्या वर्षी अण्णा विधवा विवाहाचे पुरस्कर्ते होते. अण्णांनी पंडिता रमाबाईंच्या शारदा सदन संस्थेत शिकणाऱ्या २३/२८ वर्षीय गोदूबाई या विधवा मुलीशी १८९३ साली पुनर्विवाह केला. याच गोदूबाई पुढे आनंदी कर्वे किंवा बाया कर्वे म्हणून ख्यातनाम झाल्या. त्यांच्या लग्नाला आगरकर उपस्थित होते.
०३. महर्षी कर्वेंच्या या कृत्यास मुरुड गावातील लोकांनी त्यांच्या कुटुंबावर बहिष्कार टाकून प्रचंड विरोध केला. तरीही ते डगमगले नाही. कारण १८५६ सालीच ‘विधवा विवाह कायदा’ मंजूर झाला होता.
०४. १८९६ मध्ये अण्णांनी सहा विधवा महिलांसह पुणे येथे सदाशिव पेठेत रावबहादूर भिडे यांच्या वाड्यात ‘अनाथ बालिकाश्रम’ काढला. त्याचे अध्यक्ष रा.गो. भांडारकर आणि सरचिटणीस महर्षी कर्वे बनले. पुण्यातील प्लेगच्या साथीत ही संस्था हिंगणे येथे हलविण्यात आली. त्याचवर्षी अण्णासाहेबांनी पुण्याजवळील हिंगणे (आता कर्वेनगर) या गावी विधवा महिलांसाठी आश्रम स्थापन केला.
०५. रावबहादूर गणेश गोविंद गोखले यांनी अण्णांचे हे उदात्त कार्य पाहून हिंगणे येथील आपली सहा एकरांची जागा आणि रु. ७५० संस्थेच्या उभारणीसाठी अण्णांकडे सुपूर्द केले. १९०४ साली वेणूबाई व काशीबाई आश्रमात आल्या. काशीबाईंनी १९१३ पर्यंत आश्रमात महिला अधीक्षक म्हणून काम पाहिले.०६. ४ मार्च १९०७ रोजी हिंगणे येथे लाकडी पुलाजवळ महिला विद्यालयाची स्थापना त्यांनी केली.१९०७ सालीच त्यांनी महाराष्ट्रात पुण्याजवळील हिंगण्याच्या माळरानावर एका झोपडीत मुलींची शाळा सुरू केली. अण्णासाहेबांची २० वर्षांची विधवा मेहुणी – पार्वतीबाई आठवले – या विद्यालयाच्या पहिल्या विद्यार्थिनी होत.०७. १९०५ साली नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी स्थापन केलेल्या ‘भारत सेवक समाज’ या संस्थेच्या प्रभावामुळे लोकसेवेसाठी महर्षी कर्वे यांनी ४ नोव्हेंबर १९०८ रोजी ‘निष्काम कर्ममठ’ ही संस्था स्थापन केली. या संस्थेस फारसा प्रतिसाद मिळू शकला नाही.०८. पुढे या तिन्ही संस्थांचे कार्य उत्तरोत्तर वाढत गेल्याने त्यांच्या सेवक सेविकांचे १९१५ साली एकत्रीकरण करून महिला आश्रमाची स्थापना करण्यात आली.०९. जपानच्या महिला विद्यापीठाला भेट दिल्यानंतर अण्णासाहेब अत्यंत प्रभावित झाले. त्यामुळेच त्यांनी ३ जून १९१६ रोजी पुण्यात भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना झाली. ‘महिला विद्यापीठ’ हे महर्षी कर्वे यांचे महान कार्य समजले पाहिजे.१०. विद्यापीठात प्रपंचशास्त्र, गृहशास्त्र, आरोग्यशास्त्र, पाककला, चित्रकला, गायनकला इत्यादी स्त्री जीवनाला अत्यावश्यक अशा विषयांचे शिक्षण मिळावे हे विद्यापीठाचे उद्दिष्ट होते. या विद्यापीठात माध्यमिक प्रशिक्षण पदवी, गृहजीवनशास्त्र पदवी, आरोग्य परिचारिका पदवी यासारखे अभ्यासक्रम सुरु करण्यात आले. या विद्यापीठाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यापीठाच्या सर्व शाखांतील शिक्षणाचे माध्यम मातृभाषा हेच ठेवले होते.११. १९१७ साली अण्णांनी अध्यापिका विद्यालय सुरु केले. या संस्थेला वर आणण्यात पार्वतीबाई आठवले (आनंदीबाईंची सख्खी बहीण) यांचा मोलाचा वाटा होता. पार्वतीबाईंच्या मृत्यूनंतर १९५५ साली विद्यालयाचे नाव ‘पार्वतीबाई अध्यापक विद्यालय’ असे करण्यात आले.१२. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शिक्षण प्रसार करण्याचा दृष्टीने महर्षी कर्वेंनी विद्यापीठाच्या वतीने १९३५ मध्ये ‘महाराष्ट्र ग्रामीण प्राथमिक शिक्षण मंडळ‘ स्थापन करण्यात आले.१३. पुढे १९२० साली विठ्ठलदास ठाकरसी यांनी १५ लाखांचे अनुदान दिल्याने या विद्यापीठाचे नामांतर त्यांच्या आईच्या नावावरून `श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ’ (एसएनडीटी) असे करण्यात आले. पण त्यानंतर विद्यापीठ व ठाकरसी ट्रस्ट यांच्या वादातून हे विद्यापीठ मुंबईला आले.१४. १ जानेवारी १९४४ रोजी कर्वेंनी समता संघाची स्थापना केली. त्यासाठी त्यांनी ‘मानवी समता‘ नावाचे आठ पानी वृत्तपत्र सुरु केले. याचा उद्देश मनुष्यांतील आर्थिक व सामाजिक मतभेद कमी करून सर्वांत समतेची भावना उत्पन्न करणे हा होता.१५. १४ जून १९४६ रोजी अनाथ बालीकाश्रमाचे नाव बदलून ‘हिंगणे स्त्री शिक्षण संस्था’ आणि त्यानंतर `महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था’ असे त्याचे नामकरण करण्यात आले१६. १९४८ साली त्यांनी जाती-निर्मुलन संघटनेची स्थापना केली. १९४९ साली सरकारने एसएनडीटी ला विद्यापीठाचा दर्जा दिला.
पुरस्कार व सम्मान
०१. १९७२ साली प्रकाशित झालेले वसंत कानेटकर लिखित मराठी नाटक हिमालयाची सावली महर्षी कर्वे यांच्यापासून प्रभावित आहे.
०२. महर्षी कर्वे स्त्री शिक्षणाचे आणि स्त्री उद्धाराचे शिल्पकार ठरतात. म्हणून विधवा स्त्रिया त्यांचा, “अण्णा तुम्ही नसतो तर आमचे काय झाले असते.” या शब्दात गौरव करतात.
०३. १९५८ साली नेहरूंनी मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर, “मी आशीर्वाद घेण्यासाठी आलोय” असे उद्देशून कर्वे यांच्या कार्याचा गौरव केला.
०४. प्रल्हाद केशव अत्रे म्हणतात, “महर्षी अण्णा म्हणजे भारताच्या इतिहासातील एक क्रांतिकारक शतकाचे मूर्तिमंत साक्षीदार आहेत. एवढेच नव्हे तर महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचे ते एक महान शिल्पकार होते.”
०५. त्यांना बनारस हिंदू विद्यापीठाकडून १९४२ साली, पुणे विद्यापीठाकडून १९५१ साली आणि एस.एन.डी.टी. विद्यापीठाकडून १९५४ साली मनाची डी. लिट पदवी प्रदान करण्यात आली. १९५७ साली मुंबई विद्यापीठातर्फे त्यांना मनाची एल.एल.डी. पदवी प्रदान करण्यात आली.
०६. त्यांना भारत सरकारतर्फे १९५४ साली ‘पद्मभूषण’, १९५५ साली ‘पद्मविभूषण’ आर १९५८ साली सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ ने सम्मानित करण्यात आले. भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती होते.