भूगोल जनरल नोट्स

भूगोल जनरल नोट्स

भूगोल जनरल नोट्स

०१. बल्लारपूर कागद गिरणी चंद्रपूर जिल्ह्यात आहे.

०२. नाशिक शहर महाराष्ट्राचा ‘हरित पट्टा’ म्हणून ओळखले जाते.

०३.  २०११ ची जनगणना स्वातंत्र्या नंतरची ७ वी जनगणना होती.

०४. २०११ च्या जनगणने नुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा नंदुरबार.

०५. २०११ च्या जनगणने नुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक स्त्री साक्षरतेचा जिल्हा मुंबई उपनगर.

०६. १९२१ या वर्षाला भारतीय लोकसंख्या इतिहासातील ‘महाविभाजन वर्ष’ म्हणतात.

०७. महाराष्ट्रात भुईमूग पिकाकरिता ‘इक्रिसॅट’ (Icrisat) तंत्र अवलंबिले जाते.

०८. NH7 राष्ट्रीय महामार्ग भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे.

०९. पूर्व घाटातील सर्वोच्च शिखर अर्मा कोंडा आंध्र प्रदेश राज्यात आहे.

१०. भारतातील त्रिभुज प्रदेश तयार न होणारी नदी नर्मदा आहे.

११. हिमरू कला भारतातील कर्नाटक राज्याशी संबंधित आहे.

१२. गोसीखुर्द प्रकल्प वैनगंगा नदीवर बांधण्यात येत आहे.

१३. कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान सिक्किम राज्यात आहे.

१४. टिहरी बांध भागीरथी नदीवर बनलेला आहे.

१५. गोलकोंडा खाण भारतातील आंध्र प्रदेश राज्यात आहे.

१६. सायलेंट व्हॅली केरळ राज्यात आहे.

१७. जगातील सर्वात लांब कालवा राजस्थान राज्यात आहे.

१८. शिवसमुद्र धबधबा कावेरी नदीवर आहे.

१९. माऊंट अबू अरवली पर्वत रांगेत आहे.

२०. जम्मू काश्मीर मधील सलाल जलविद्युत प्रकल्प चिनाब नदीवर आहे.

२१. पाकिस्तानने खुशाब  येथे पहिली अणुभट्टी १९९८ साली सुरु केली आहे.

२२. भारताचा वीज निर्मितीत जगात पाचवा क्रमांक लागतो.
२३. मुंबई शहराला १९०५ पासून बेस्ट ( बीईएसटी) ही कंपनी वीज पुरवठा करते. बेस्ट (बीईएसटीसी) म्हणजे बॉम्बे इलेक्ट्रीक सप्लाय ऍण्ड ट्रामवेज कंपनी.२४. मुंबई शहरात टाटा पॉवर हि कंपनीही वीज पुरवठ करते . टाटा कंपनीने पुणे जिल्ह्यात मुळशी, लोणावळा येथे धरण बांधून त्यापासून जलविद्यूत निर्मिती केली जाते व ही वीज मुंबईला पुरवठा केली जाते.

२५. महाराष्ट्रातील ठाणे, कल्याण , औरंगाबाद , नागपूर ,नांदेड ही पाच शहरे महाराष्ट्र अपारंपारीक ऊर्जा मंत्रालयाने पाच शहरे सौर ऊर्जा शहरे म्हणून घोषित केली.

२६. भारताने आतापर्यंत अमेरिका, फ्रान्स, कॅनडा, रशिया, कझाकस्तान, ऍर्जेंटिना, नामिबिया व मंगोलिया या आठ देशाबरोबर अणुकरार केले आहेत.

२७. भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटर मुंबई येथे १९५४ साली स्थापन करण्यात आले.

२८. भारतात अप्सरा, सायरस, झर्लिना, पुर्णिमा – १ , पुर्णिमा – २ , ध्रुव , पुर्णिमा – ३ , कामिनी या अणुभट्या येथे कार्यरत आहेत.

२९. महाराष्ट्रामध्ये उभारण्यात आलेला पहिला मोठा ४ मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प – चंद्रपूर

३०. झांग मू जलविद्यूत निर्मिती प्रकल्प चीनमध्ये तिबेट प्रांतात ब्रम्हपुत्रा नदिवर ५१० मेगावॅट निर्मिती क्षमतेचा जलविद्यूत प्रकल्प चीन उभारत आहे.

३१. ऑईल ऍण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन ( ओएनजीसी) आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी) यांना केंद्र सरकारने दिलेला दर्जा – महारत्न.

३२. रत्नागिरी जिल्ह्यात जैतापूर येथे अणुऊर्जा निर्मिती केंद्र स्थापन करण्यास केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने २८ नोव्हेंबर २०१० रोजी ३५ अटी घालून पर्यावरणीय मंजूरी दिली.

३३. येथे फ्रान्स सरकारच्या मालकीची आरेवा ही कंपनी जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा निर्मिती प्रकल्प सुमारे १० हजार मेगावॅट निर्मिती क्षमतेचा प्रकल्प उभारणार आहे. सुमारे १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येथे केली जाणार आहे.

३४. जगात सर्वाधिक अणुऊर्जा फ्रान्स तयार करतो. फ्रान्समध्ये ६३ हजार मेगावॅट अणुऊर्जा निर्माण केली जाते. फ्रान्सच्या एकूण ऊर्जेमध्ये अणुउर्जेचा वाटा सुमारे ७५ ट्क्के आहे.फ्रान्समध्ये सुमारे ५९ अणुभट्टया/ अणुऊर्जा निर्मिती केंद्र आहे.

३५. जपानच्या एकूण ऊर्जेमध्ये २५ टक्के वाटा अणुऊर्जेचा आहे. अमेरिकेमध्ये एकूण ऊर्जेमध्ये अणुऊर्जेचा वाटा सरासरी २५ टक्के आहे .

३६. केंद्र सरकारच्या मालकीच्या इंधन विक्री कंपन्या – इंडियन ऑईल कॉर्पोरेशन भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन , हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन.

३७. तापी करार या करारानुसार तुर्कमेनिस्तान , अफगाणिस्तान, पाकिस्तान आणी भारत या चार देशातून भारताला नैसर्गिक वायू व खनिज तेलाची आयात करण्यासाठी पाईप लाईन टाकली जाणार आहे.

३८. ग्रीन एनर्जी म्हणून सौर उर्जा , पवन उर्जा ओळखली जाते.

३९. पुणे जिल्ह्यात भिमा शंकर परिसरत एनरकॉन इंडिया ही जर्मन कंपनी पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारत आहे.

४०. रामचंद्र नगर (त्रिपुरा) येथे औष्णीक ऊर्जा निर्मिती केंद्र उभारले जाणार आहे. हे ऊर्जा निर्मिती केंद्र नैसर्गिक वायू/ गॅस वरती चाविले जाणार आहे.

४१. भारताला अणुऊर्जा निर्मितीसाठी युरेनियम आणि औष्णीक ऊर्जा निर्मितीसाठी दगडी कोळसा, खनिज तेल व नैसर्गिक वायू आयात करावा लागतो.

४२. भारतासोबत अणुइंधन पुरवठा करण्यासाठी अणुकरार केलेले ८ देश
अमेरिका, फ्रान्स, रशिया, मंगोलिया, कझाकस्थान, अर्जेंटींना, नामिबिया, कॅनडा

४३. मोगरा दगडीकोळसा खाण छत्तीसगढ राज्यात कोरबा या जिल्ह्यात आहे.

४४. रशिया भारतातील कुंडाकुलम (तामिळनाडू) हरीकुट(पश्चिम बंगाल) येथे अणुप्रकल्प उभारण्यास मदत करीत आहे.

४५. जगात एकूण जी वीज निर्मिती केली जाते त्यापैकी १४ टक्के वाटा अणुविद्युतचा आहे.

४६. प्लुटोनियम २३९ याचा वापर अण्वस्त्रे / क्षेपनास्त्रे तयार करण्यासाठी केला जातो.

७. देशातील एकूण औष्णीक वीज उत्पादनापैकी ११% वीज नैसर्गिक वायुवर आधारित तयार केली जाते.

४८. भारताच्या ईशान्य भागातील औष्णीक वीज केंद्रे नैसर्गिक वायुवर आधारित आहे.

४९. उरण, जि. रायगड येथील औष्णीक वीज केंद्र मुंबई हाय मधील नैसर्गिक वायुवर ( गॅस ) वर चालविला जातो.

Scroll to Top