aaak |
कलम |
वैशिष्ट्य |
कलम १ |
भारत आणि राज्यांचा संघ | |
कलम २ |
नवीन राज्यांचा समावेश आणि नवीन राज्यनिर्मिती | |
कलम ३ |
नवीन राज्यांची स्थापना, राज्यांच्या सीमा, क्षेत्रफळ व नावात बदल करण्यासंबंधी तरतुदी | |
कलम ४ |
घटनेत कलम २ व ३ नुसार करण्यात आलेली दुरुस्ती घटनादुरुस्ती कायदा समजण्यात येणार नाही. | |
कलम ५ |
घटनेचा अंमल सुरु होण्यापूर्वीचे नागरिकत्व | |
कलम ६ |
पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित झालेल्या व्यक्तींच्या नागरिकत्वाच्या हक्कसंबंधी तरतूद. | |
कलम ७ |
मार्च १९४७ नंतर जे व्यक्ती भारतामधून पाकिस्तानात स्थलांतरित झाले त्यांना भारताचा नागरिक समजण्यात येणार नाही. | |
कलम ८ |
भारताबाहेर राहणाऱ्या एखाद्या भारतीय वंशाच्या व्यक्तीच्या नागरिकत्वाचा हक्क. | |
कलम ९ |
एखाद्या व्यक्तीने स्वच्छेने जर दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले असेल तर त्यानंतर त्याला भारताचा नागरिक समजण्यात येणार नाही. | |
कलम १० |
कोणताही भारतीय नागरिकसंसदेच्या कायद्यातील तरतुदींच्या अधीन राहून नागरिक म्हणून कायम राहील. | |
कलम ११ |
संसदेला नागरिकत्वाचे संपादन व समाप्ती याशिवाय नागरिकत्वासंबंधी अन्य सर्व बाबींसाठी कायदा करण्याचा अधिकार आहे. | |
कलम १२ |
मुलभूत हक्कसंबंधी राज्यसंस्थेची व्याख्या | |
कलम १३ |
मुलभूत हक्कांशी विसंगत असणारे कायदे | |
कलम १४ |
कायद्यासमोर समानता | |
कलम १५ |
धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई | |
कलम १६ |
सार्वजनिक रोजगारामध्ये समान संधी | |
कलम १७ |
अस्पृश्यता नष्ट करणे | |
कलम १८ |
किताब नष्ट करणे | |
कलम १९ |
भाषण स्वातंत्र्य संबंधी हक्कांचे संरक्षण | |
कलम २० |
अपराधांच्या दोषसिद्धीसंबंधी संरक्षण | |
कलम २१ |
जीविताचे आणि व्यक्तीस्वातंत्र्याचे संरक्षण | |
कलम २१ (अ) |
शिक्षणाचा हक्क | |
कलम २२ |
अटक व स्थानबद्धता यांपासून संरक्षण | |
कलम २३ |
माणसांचा व्यापार आणि वेठबिगारी यांना प्रतिबंध | |
कलम २४ |
कारखाने व इतर घटक ठिकाणी बालकामगार कामाला ठेवण्यास प्रतिबंध | |
कलम २५ |
विवेकबुद्धीचे स्वातंत्र्य, धर्माचे आचरण, प्रकटीकरण व प्रचार करण्याचे स्वातंत्र्य. | |
कलम २६ |
धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य | |
कलम २७ |
एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धन व प्रसारासाठी कर देण्याबाबत स्वातंत्र्य | |
कलम २८ |
शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य. | |
कलम २९ |
अल्पसंख्यांक वर्गाच्या हितसंबंधांचे रक्षण | |
कलम ३० |
अल्पसंख्यांकांना शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व चालवण्याचा हक्क. | |
कलम ३२ |
भाग ३ ने प्रदान केलेले हक्क बजावण्याकरिता केलेले उपाय | |
कलम ३३ |
भाग ३ मध्ये वर्णन केलेले संबंधी सेनेच्या मुलभूत हक्कांमध्ये फेरबदल करण्याचा संसदेला असणारा हक्क. | |
कलम ३४ |
लष्करी कायदा (मार्शल लो) अमलात असताना मुलभूत हक्कांवर निर्बंध | |
कलम ३५ |
मुलभूत हक्कांच्या अंमलबजावणीकरता असणारे कायदे. | |
कलम ३६ |
‘राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे’ या संबंधी राज्यसंस्थेची व्याख्या. | |
कलम ३७ |
या भागात असलेली तत्वे लागू करणे. | |
कलम ३८ |
राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाजव्यवस्था प्रस्थापित करणे. | |
कलम ३९ |
राज्याने अनुसरावयाच्या धोरणाची विशिष्ट तत्वे. | |
कलम ३९ (अ) |
समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य | |
कलम ४० |
ग्रामपंचायतींचे संघटन | |
कलम ४१ |
कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क, विशिष्ट बाबतीत सार्वजनिक सहाय्याचा हक्क | |
कलम ४२ |
कामाची न्याय्य व मानवीय स्थिती, प्रसूती सहाय्य यांसाठी तरतूद. | |
कलम ४३ |
कामगारांना निर्वाह वेतन इत्यादी संबंधी तरतुदी | |
कलम ४३ (अ) |
उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग | |
कलम ४३ (ब) |
सहकारी सोसायट्याना प्रोत्साहन | |
कलम ४४ |
नागरिकांसाठी समान नागरी कायदा | |
कलम ४५ |
सहा वर्षाखालील बालकांचे संगोपन व शिक्षणाची तरतूद. | |
कलम ४६ |
अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती तसेच इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन | |
कलम ४७ |
नागरिकांचे पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्तव्य | |
कलम ४८ |
कृषी व पशुसंवर्धन यांचे संघटन | |
कलम ४८ (अ) |
पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन, वने व वन्यजीवांचे रक्षण करणे. | |
कलम ४९ |
राष्ट्रीय महत्वाची स्मारके, स्थाने, वस्तू यांचे संरक्षण करणे. | |
कलम ५० |
न्यायमंडळ कार्यकारी मंडळापासून वेगळे ठेवणे. | |
कलम ५१ |
आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन. | |
कलम ५१ (अ) |
मुलभूत कर्तव्ये | |
कलम ५२ |
भारताचा राष्ट्रपती | |
कलम ५३ |
केंद्राचे कार्यकारी अधिकार | |
कलम ५४ |
राष्ट्रपतींची निवडणूक (निर्वाचक गण, मतदार, इ.) | |
कलम ५५ |
राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पध्दत | |
कलम ५६ |
राष्ट्रपती पदाचा कालावधी | |
कलम ५७ |
राष्ट्र्पती पुनर्निवडणुकीसाठीची अर्हता | |
कलम ५८ |
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी पात्रता | |
कलम ५९ |
राष्ट्रपती पदाच्या शर्ती. | |
कलम ६० |
राष्ट्रपतींनी घ्यावयाची शपथ किंवा प्रतिज्ञा | |
कलम ६१ |
राष्ट्रपतींवरील महाभियोगाची पद्धत | |
कलम ६२ |
राष्ट्रपती पद रिक्त झाल्यानंतर रिक्त पद भरण्यासाठी घेतलेला कार्यकाल, किंवा काळजीवाहू राष्ट्रपतींचा कार्यकाल याबाबत तरतुदी. | |
कलम ६३ |
भारताचे उपराष्ट्रपती | |
कलम ६४ |
भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिध्द सभापती असतील. | |
कलम ६५ |
भारताचे राष्ट्रपती अनुपस्थित असतील किंवा काही अनपेक्षित कारणामुळे राष्ट्र्पतीचे पद रिक्त झाले असेल तर भारताचे उपराष्ट्रपती | |
कलम ६६ |
उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक, सेवा, शर्ती व पात्रता या बाबत तरतूद. | |
कलम ६७ |
उपराष्ट्रपती पदाचा कालावधी. | |
कलम ६८ |
उपराष्ट्रपती पद रिक्त झाल्यानंतर रिक्त पद भरण्यासाठी घेतलेला कार्यकाल, किंवा काळजीवाहू उपराष्ट्रपतींचा कार्यकाल याबाबत तरतुदी. | |
कलम ६९ |
पद धारण करण्यासाठी उपराष्ट्रपतींना घ्यावयाची शपथ. | |
कलम ७० |
इतर आकस्मिक कारणाने अध्यक्षांची कार्यापासून मुक्तता. | |
कलम ७१ |
राष्ट्रपती तसेच उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीतून उद्भवणाऱ्या विवादाबद्दल तरतुदी. | |
कलम ७२ |
राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार | |
कलम ७३ |
केंद्राच्या कार्यकारी अधिकारांवर मर्यादा | |
कलम ७४ |
राष्ट्रपतींना त्यांच्या कामात सहाय्य व सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळाची तरतूद. | |
कलम ७५ |
मंत्र्यांसाठी इतर तरतुदी. | |
कलम ७६ |
भारताचा महान्यायवादी. | |
कलम ७७ |
भारत सरकारची व्यापार चालवण्याची पध्दत. | |
कलम ७८ |
राष्ट्रपतींना माहिती सादर करण्याबाबत पंतप्रधानांचे कर्तव्ये. | |
कलम ७९ |
संसद | |
कलम ८० |
राज्यसभेची रचना. | |
कलम ८१ |
लोकसभेची रचना | |
कलम ८२ |
प्रत्येक जनगणनेनंतर यात पुनर्रचना | |
कलम ८३ |
संसदेच्या सदनांचा कालावधी | |
कलम ८४ |
संसद सदस्यांची पात्रता. | |
कलम ८५ |
संसदेचे सत्र, संसद साधनांची स्थापना किंवा भंग करण्याची तरतूद. | |
कलम ८६ |
संसदेच्या सदनाना संबोधित करणे व सदनाना निरोप पाठविण्याबाबत राष्ट्रपतींचे अधिकार. | |
कलम ८७ |
राष्ट्रपतींचे विशेष संबोधन. | |
कलम ८८ |
संसद सदनाबाबत मंत्री व महान्यायवादी यांचे अधिकार. | |
कलम ८९ |
राज्यसभेचे सभापती आणि उपसभापती. | |
कलम ९० |
राज्यसभा उपसभापतींचा राजीनामा, सुट्ट्या, बडतर्फी याबाबत तरतुदी. | |
कलम ९१ |
राज्यसभा सभापतींच्या अनुपस्थितीत त्यांचे अधिकार व कर्तव्ये निभावण्याबाबत उपसभापती किंवा इतर सदस्यांचे अधिकार. | |
कलम ९२ |
राज्यसभा सभापती किंवा उपसभापती त्यावेळी सदनाचे सभापतीपद भूषवणार नाहीत जेव्हा त्यांच्या बडतर्फीचा ठराव सदनासमोर विचाराधीन असेल. | |
कलम ९३ |
लोकसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष. | |
कलम ९४ |
लोकसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा राजीनामा, सुट्ट्या, बडतर्फी याबाबत तरतुदी. | |
कलम ९५ |
लोकसभा अध्यक्षांच्या अनुपस्थितीत त्यांचे अधिकार व कर्तव्ये निभावण्याबाबत उपाध्यक्ष किंवा इतर सदस्यांचे अधिकार. | |
कलम ९६ |
लोकसभा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष त्यावेळी सदनाचे अध्यक्षपद भूषवणार नाहीत जेव्हा त्यांच्या बडतर्फीचा ठराव सदनासमोर विचाराधीन असेल. | |
कलम ९७ |
लोकसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच राज्यसभा सभापती व उपसभापती यांचे वेतन व भत्ते. | |
कलम ९८ |
संसदेचे सचिवालय. | |
कलम ९९ |
संसद सदस्यांनी घ्यावयाची शपथ. |