राज्याचा मुख्य सचिव

राज्याचा मुख्य सचिव

०१. प्रत्येक राज्यात मुख्यमंत्र्याच्या सरळ अधिनियंत्रणाखाली सामान्य प्रशासन विभाग कार्यरत असतो. मुख्य सचिव  हा राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेचा प्रमुख असतो. 



०२. मुख्य सचिव राज्य सचीवालयाचा कार्यकारी प्रमुख असतो. राज्यातील सर्व प्रशासकीय कार्यालयावर मुख्य सचिवांचे पूर्ण नियंत्रण असते. केंद्र – राज्य तसेच राज्य – राज्य संबंधात तो प्रमुख दुवा असतो. 


०३. १९६५-६६ च्या “आंध्र प्रदेश प्रशासकीय सुधारणा समिती”च्या अहवालानुसार मुख्य सचिव राज्यातील सनदी सेवांचा प्रमुख असतो. 


०४. केंद्राच्या कॅबिनेट सचिवाच्या तुलनेत राज्याच्या मुख्य सचिवाची भूमिका अधिक रुंद असते. राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेचा प्रमुख यासोबतच  राज्य लोकसेवा आयोगाचा प्रमुख, राज्य शासनाचा प्रमुख जनसंपर्क अधिकारी या भूमिका त्यांना वठवाव्या लागतात. 


०५. मुख्य सचिव या पदावर अधिकाऱ्याचा कालावधी निश्चित नाही. कदाचित मुख्य सचिव त्याच पदावर असताना निवृत्त होऊ शकतो किंवा केंद्र सरकारच्या एखाद्या विभागात बढती होऊन जाऊ शकतो. 


०६. “राजस्थान प्रशासकीय सुधारणा समिती,१९६३” ने मुख्य सचिवाची तणावपूर्ण बहुआयामी भूमिका स्पष्ट केली. तो मुख्यमंत्र्यांचा प्रमुख सल्लागार असतो. त्याच्याकडील विभाग वगळता इतर विभागाच्या कार्यातही तो समन्वय घडवून आणतो. इतर सचिवांच्या कार्यकक्षेत न येणारे विषय मुख्य सचिव हाताळतो. 


०७. वेळोवेळी वेगवेगळ्या परिस्थितीत प्रशासकीय कामे व राज्य सरकारची धोरणे यांच्यात एकसूत्रता आणण्याचे कार्य मुख्य सचिवांना करावे लागते. 


०८. “रा.प्र.सु.स १९६३” ने अशी शिफारस केली होती कि, प्रत्येक मंत्र्याने पुढील दोन बाबतीत कार्य करताना मुख्य सचिवांचा सल्ला घ्यावा. 
अ) एखादे विशेष आणि नवीन धोरण स्वीकारताना किंवा प्रचलित नियम तोडून एखादा नवीन कार्यक्रम तयार करताना. 
ब) उपप्रमुख तसेच विभागातील इतर उच्च पदावर कोणत्याही अधिकाऱ्याची नियुक्ती, बदली किंवा बढती करताना





मुख्य सचिवांचे कार्ये
वर नमूद केलेली कार्ये यासोबतच इतर काही महत्वाची कार्ये मुख्य सचिवांना पार पाडावी लागतात. 
०१. राज्य कॅबिनेट सचिव आणि कॅबिनेट समित्यांचा सचिव म्हणून कार्य पाहणे. म्हणून कॅबिनेट मिटिंगचे ठिकाण व अजेंडा तेच ठरवितात आणि त्यासाठी आवश्यक नोंदी ठेवतात. 


०२. तो राज्याचा आपत्ती मुख्य व्यवस्थापक आणि निवारण कार्याशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांसाठी राज्य शासनाचे प्रतिनिधित्व करतो. तसेच चक्राकार पद्धतीने विभागीय परिषदांचा सचिव या नात्याने कार्य करतो.


०३. केंद्र शासनातील कॅबिनेट सचिवाच्या अध्यक्षतेखाली भरविण्यात येणाऱ्या वार्षिक परिषदेला ते हजर राहतात. ते प्रशासकीय पातळीवर राज्य शासनाचा प्रवक्ता म्हणून कार्य करतात. 


०४. राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू असल्यास आणि केंद्रीय सल्लागाराची नियुक्ती केलेली नसेल तर ते राज्यपालाचा मुख्य सल्लागार म्हणून कार्य करतात. 


०५. आपत्ती निवारण व पुनर्वसन कार्याच्या वेळी ते राज्य व जिल्हा यांच्यातील समन्वयक म्हणून कार्य पाहतात. 

०६. महाराष्ट्राचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय हे आहेत.  (३० ऑगस्ट २०१५)  


Scroll to Top