साताऱ्याचा उठाव
०२. या कटात गुप्तेसोबत त्यांचा पुत्र सीताराम, मेहुणा केशव निंबाळकर, रामोशांचा पुढारी सत्तू रामोशी, मांगांचा पुढारी नबीया येरीया मांग व यलमा मांग इत्यादी होते. त्यासोबतच गुप्तेंनी गेंडा महाल रेजिमेंट, मोग्लाय स्वार पलटण, रेग्युलर इंफ्रन्ट्री यांकडून उठावास विरोध होणार नाही याची आश्वासने घेतली.
०३. गुप्तेंनी नारायण पावसकर सोनारास तोफगोळे बनविण्याची जबाबदारी दिली. सोनाराने वाळवा येथील अप्पा ऐतवडेकर याच्यावर ८०० तोफगोळे बनविण्याची जबाबदारी सोपविली. केशवकडे महाबळेश्वर येथील तर गुप्तेकडे साताऱ्यातील खजिना लुटण्याची जबाबदारी होती. शिवराम कुलकर्णी हा या कटाचा प्राण होता. सीताराम हा या सर्व गोष्टींवर देखरेख करत होता. मात्र आतीलच काही फितुरांनी या कटाची माहिती इंग्रजांना दिली.
०४. नाझर कोर्टातील शिपाई मानसिंग या कटात सामील होता. हे कळताच इंग्रजांनी त्यास १२ जून १८५७ रोजी गोळी मारून ठार केले. सरकारने अप्पा ऐतवडेकर व दाजी कबाडे याला पकडले. त्यांनी भीतीपोटी सर्व माहिती सांगितली. २० जून १८५७ रोजी सरकारने गुप्तेंचा पुत्र सीताराम, केशव, शिवराम कुलकर्णी, बबीया मांग व इतर १७ जणांना पकडले. आपल्या मित्रांना पकडल्याने सर्व भूमिगतांनी १३ जुलै १८५७ रोजी पंढरपुरवर हल्ला केला.
०५. गिरीजाप्पा चिमण्णा वाणी याने पैशाच्या आमिषाने या हल्लेखोरांची माहिती सरकारला दिली. सरकारने सर्वांना पकडले. ४ ऑगस्ट १८५७ रोजी मित्र बंधूंना तोफेने उडविले. संपूर्ण गुप्ते घराण्याला ठार करण्यात आले. बाकीच्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. ६ ऑगस्ट १८५७ रोजी इंग्रजांनी प्रतापसिंहाचा दत्तकपुत्र शाहू, चुलते काकासाहेब, माता राजसबाई, जनकमाता गुणवंताबाई, सेनापती दुर्वासिंग यांना अटक करून बुचर बेटावर वेगवेगळ्या कोठडीत ठेवण्यात आले.
०६. ५ जुलै १८५७ पासून गुप्ते भूमिगत झाले होते. गुप्तेंना पकडण्यासाठी सरकारने ५०० रुपये बक्षीस ठेवले. १८५८ मध्ये कृष्णाजी सदाशिव सिंदकर याने विश्वासघात केल्याने इंग्रजांनी गुप्तेंना अटक केली व ग्वाल्हेरच्या तुरुंगात टाकले. तेथून ते नंतर निघून पळून गेले. रंगो बापुजी गुप्ते कोठे गेले, नंतर त्यांचे काय झाले. याचा कोणाला कधीही सुगावा लागला नाही.
नागपुरचा उठाव
०१. मीरत व दिल्लीतील उठावाची बातमी नागपूर येथे सर्वप्रथम टाकळी येथील राज्याच्या बिनकवायती लष्करास लागली. उत्तरेकडील हेर नागपुरात आले व त्यांनी कामठी येथील सैनिकांना फितूर केले. नागपुरातील सैनिकांनी १३ जून १८५७ रोजी उठाव करण्याचे ठरविले पण ही बातमी फुटली.
०२. कॅप्टन वूड यास त्यांच्या नोकराने टाकळी येथील सैन्याच्या फितुरीची बातमी दिली. १२ जून १८५७ रोजी फैजबक्ष याने स्टीफन हिस्लॉप मिशनरी यांना कटाची माहिती दिली. या सर्व बातम्या कमिश्नर प्लौड यांस १२ जूनला रात्री १० वाजता कळल्या. लगेचच सीताबर्डी किल्ल्यातील सैन्य शहरात आणले गेले. पायदळाचे आधिपत्य कमिश्नर असिस्टंट कैबरलेन यांच्याकडे दिले.
०३. ठरल्याप्रमाणे सर्व बंडखोर १३ जून रोजी रात्री १० वाजता एकत्र जमले. ते टाकळी येथील सैन्य येण्याची वाट पाहत होते. टाकळीचे स्वारही पायदळाच्या लायनीत पाठविलेल्या दफेदारांच्या येण्याची वाट पाहत होते. पण मद्रासी हवालदाराने दफ़ेदारास पकडल्याने सर्व कट उघडकीस आला. ठरल्याप्रमाणे मोतीबागेत दारूचे फुगारे न उडाल्यामुळे बंडखोरांनी योजनेची अंमलबजावणी केली नाही.
०४. १४ जून रोजी रविवारी कामठी येथील सैन्य इंग्रजांनी बोलावले. सैनिकांची धरपकड सुरु करण्यात आली. घोडदलातील २० जणांवर खटले भरले गेले. इनायतुल्ला खान, विलायत खान, नवाब कादरखान यांना फाशी दिली गेली.
०५. मराठा मंडळींनी युवराज जानोजी भोसले यांच्या नावाने द्वाही फिरवून गादीचे पुनरुज्जीवन करण्याचे ठरविले. परंतु राणी बाकाबाईंनी सर्व प्रतिष्ठित लोकांना राजवाड्यात बोलाविले. आणि कोणीही उठाव करू नये असे सांगितले.
जमखिंडचा उठाव
अप्पासाहेब पटवर्धन हे इंग्रजधार्जिणे जमखिंडीचे राजे होते. आपल्या संस्थानात गडबड झाल्यास आपण तत्पर असावे या उद्देशाने त्यांनी शस्त्रास्त्रे व दारुगोळा जमविला. किल्ल्याची दुरुस्ती केली. पण इंग्रजांना याही हालचाली संशयास्पद वाटल्या. रेसिडेंटने गवर्नरला ही माहिती कळविली. गवर्नरने जमखिंडीत संशयितांना पकडण्यास सुरुवात केली. म्हणून हा उठाव सुरु होण्याआधीच दडपला गेला. बेकायदेशीर शस्त्रसाठा जमा करून ठेवल्याबद्दल अटक व राजपद काढून घेतले. १८५७ च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार आप्पासाहेबांची सुटका व राजपद परत मिळेल.
मुधोळ मधील बेरड जमातींचा उठाव
०१. इंग्रजांनी १८५७ मध्ये शस्त्रबंदीचा कायदा केला. मुधोळमधील हुलगडीच्या बेरडांना हा कायदा मान्य नव्हता. तरीही मुधोळ संस्थानच्या कारभाऱ्यांनी बेरड जमातीच्या प्रमुखास कायद्याचे महत्व समजावून सांगितले. त्यांच्याकडील शस्त्रास्त्रांची नोंद करून घेतली. परंतु बेरड समाजाने आपल्या प्रमुखास गद्दार घोषित करून त्याला वाळीत टाकले.
०२. ५०० बेरड एकत्र आले. त्यांनी गावोगाव जाऊन प्रचार केला कि कोणीही सरकारकडे शस्त्रे जमा करू नये. मुधोळच्या कारभाऱ्याने तेथील पॉलिटिकल एजंटला बातमी कळविली व विजापूर येथील सैन्य बोलाविले. इंग्रज सैन्य व बेरडांत चकमक सुरु झाली. परिस्थिती आटोक्यात आल्याचे सांगून इंग्रज सैन्य निघून गेले. पण नंतर रात्री २ वाजता इंग्रज सैन्य परतले व हुगळी गावात शिरले. तेथे त्यांनी सुमारे २०० बेसावध बेरडांची कत्तल केली.
औरंगाबादेतील उठाव
औरंगाबादेतील घोडदळाच्या पलटणीत बहुसंख्य मुस्लिम सैनिक होते. मुघल बादशाहविरुद्ध उत्तरेकडे लढाईसाठी जाण्यास ब्रिटिश घोडदळातील मुस्लिम सैनिक नाखुश होते. त्यामुळे त्यांनी फिदाअलीच्या
नेतृत्वाखाली उठाव केला.
शेतकऱ्यांचा उठाव
०१. १८५७ साली पुणे व अहमदनगर, सातारा जिल्ह्यात या प्रदेशात रयतवारी ही महसुलाची पद्धत अस्तित्वात होती. रयतवारी पद्धतीचा दोषाप्रमाणे या भागातील शेतकरी सावकारांच्या तावडीत सापडले. या भागातील सावकार बाहेरून आलेले मारवाडी, गुजराती होते.
०२. १८६० च्या दशकात पूर्वार्धात अमेरिकेतील यादवी युद्धमुळे कापसाची निर्यात वाढल्याने कापसाचे भाव वाढत गेले. १९६४ मध्ये हे यादवी युद्ध संपल्यावर कापसाची निर्यात कमी होवून कापसाचे भाव कोसळले त्यामुळे शेतकरी संकटात सापडला. शेतकऱ्याच्या अडचणीचा फायदा घेवून सावरकरांनी जमिनी बाळकवायला सुरवात केली
०३. १८७१-७२ मध्ये पावसाचे प्रमाण कमी झाल्याने शेतीचे उत्पन्न कमी झाले. मालाच्या किमतीत वाढ झाली. शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली. परिणामी शेतमजुरांनाही मजुरी मिळेनासी झाली. सारा भरण्यासाठी शेतकऱ्यांनी जमिनी विकल्या. १८७४ मध्ये सरकारने सारा कमी केला, पण त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. म्हणून पुणे, सोलापूर, सातारा भागात शेतकऱ्यांनी सरकारविरुध्द बंड पुकारले.
०४. उठावाची सुरुवात १८७४ साली पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील ‘कर्धे’ गावापासून झाली. कर्धे गावाच्या लोकांनी सारा भरण्यासाठी नकार दिला व सावकारांवर हल्ले केले. १२ मे १८७५ रोजी ‘सुपे’ येथे शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला. मारवाडी, गुज्जर व सावकारांवर शेतकऱ्यांनी हल्ले केले. त्यानंतर अहमदनगर, सातारा, सोलापूर, रत्नागिरी या जिल्ह्यात उठाव झाल.
०१. या उठावांत सावकारांकडील गहाणखाते, न्यायालयाचे हुकूमनामे, सर्व कर्जविषयक दस्ताऐवज हस्तगत करून त्याची सार्वजनिक होळी करण्यात येई. या चळवळीत हिंसाचार फारसा झाला नाही. उठावाचा रोख ब्रिटिश सरकारविरूद्ध नव्हता तर स्थानिक सावकारांविरुद्ध होता. ब्रिटीशांनी कारवाइ करून उठाव दडपून टाकला.
१८५७ चे महाराष्ट्रातील उठाव – भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
१८५७ चे महाराष्ट्रातील उठाव – भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.