इतिहास काळातील भारतातील व्यापारी कंपन्या
डच ईस्ट इंडिया कंपनी
०३. २० मार्च १६०२ ला नेदरलैंड सरकारने कंपनीला २१ वर्षांच्या कराराने सनद दिली. त्याचप्रमाणे कंपनीला आयात करात माफी देऊन, ज्या ठिकाणी व्यापार करावयाचा त्या भागावर राजकीय सत्ता प्रस्थापित करण्यास परवानगी देण्यात आली. दहा वर्षांच्या अवधीतच डचांनी मोल्यूकस, टिडोर, बांदा व अँबोइना ह्या भागांवर राजकीय व व्यापारी सत्ता प्रस्थापित केली.
०४. ही जगातील सर्वप्रथम बहुराष्ट्रीय कंपनी होती. डच ईस्ट इंडिया कंपनी रोखे विकणारी जगातील सर्वप्रथम कंपनी होती. कंपनीला वसाहती वसवणे, युद्ध करणे, तह अथवा करार करणे, अपराध्यांना कारावास अथवा देहदंडाच्या शिक्षा ठोठावणे, स्वतःच्या टांकसाळी उघडून नाणी पाडणे यांसारखे एखाद्या सार्वभौम शासनाच्या तोडीचे अधिकार होते.
०५. सतराव्या शतकाच्या सुरुवातीस इंग्रजांनी अति पूर्वेकडील व्यापारात व राजकारणात प्रवेश केला होता. डच व इंग्रज ह्यांच्यामध्ये १६१९ मध्ये जावामधील जकार्ता येथे प्रथम स्पर्धा सुरू झाली, पण इंग्रजांना माघार घ्यावी लागली. डच कंपनीचा गव्हर्नर यान पिटर्सन कोएन याने कंपनीसाठी जकार्ता येथे प्रमुख कार्यालय बांधले.
०६. जकार्ताला “बटाव्हिया” असे नाव देण्यात आले. पुढील काळातील डचांच्या अतिपूर्वेकडील व्यापाराचे बटाव्हिया हे प्रमुख केंद्र बनले. अतिपूर्वेकडील मलायापासून बोर्निओपर्यंतचा प्रदेश डचांच्या ताब्यात आला.
०७. आकडेवारीच्या दृष्टीने पाहता, आशियातील व्यापारात डच ईस्ट इंडिया कंपनीने इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांना मागे टाकले होते. १६०२ ते १७९६ या काळात कंपनीने जवळपास दहा लाख युरोपीय लोकांना आशियातल्या व्यापारासाठी ४, ७८५ जहाजांमध्ये धाडले आणि २५ लाख टनांपेक्षा जास्त आशियाई व्यापारी मालाचा व्यवहार त्यांच्यामार्फत झाला. त्या तुलनेत पाहता, उर्वरित युरोपातून सर्व मिळून केवळ ८८२, ४१२ लोक १५०० ते १७९५ यादरम्यान व्यापारासाठी पाठवले.
०८. डच ईस्ट इंडिया कंपनीची मुख्य प्रतिस्पर्धी असलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजांच्या ताफ्यात केवळ् २६९० जहाजे होती आणि एकंदरीत व्यापारी माल डच ईस्ट इंडिया कंपनीच्या मालाच्या एक पंचमांश होता.
०९. डचांनी १६०० मध्ये जपानमध्ये प्रवेश केला व पुढे पाच वर्षांनी डच ईस्ट इंडिया कंपनीला जपानशी व्यापार करण्याची परवानगी मिळाली. १६३७-३८ च्या जपानमधील क्रांतीनंतर सर्व ख्रिस्ती धर्मीयांना जपानमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली. डचांना मात्र नागासाकी विभागातील देशिया ह्या बेटावर राहण्याची परवानगी मिळाली. १६५२ मध्ये डचांनी दक्षिण आफ्रिकेतील पोर्तुगीजांचा पराभव करून केप ऑफ गुड होप येथे आपली सत्ता स्थापन केली.
१०. सतराव्या शतकात आपल्या मसाल्यांच्या व्यापारातील एकाधिकार शाहीमुळे डच ईस्ट इंडिया कंपनीने भरपूर नफा कमावला. बटाव्हिया प्रांतातील एका बंदरात (आजचे जकार्ता) कंपनीने १६१९ साली मालुकु बेटांवरील मसाल्याच्या व्यापारातून फायदा मिळवण्यासाठी राजधानी स्थापन केली.
१. पुढील दोन शतकांत कंपनीने आणखी बंदरे व्यापारी तळ म्हणून ताब्यात घेतली व त्या बंदरांच्या आसपासचा भूभाग स्वत:च्या आधिपत्याखाली आणून स्वतःचे स्थान बळकट केले. हा व्यापारातला महत्त्वाचा भाग होता आणि दरवर्षी १८ टक्के दराने लाभांश कंपनीला यातून जवळपास २०० वर्षे मिळत होता.
१२. तथापि यापुढील काळात मात्र डचांना इंग्रजांना तोंड द्यावे लागल्याने, त्यांची पूर्वेकडील सत्ता हळूहळू कमी होत गेली. १७९५ मध्ये इंग्रजांनी दक्षिण आफ्रिकेतील डचांची सत्ता नष्ट केल्यानंतर त्यांच्या ताब्यात जावा व आसपासची काही बेटे एवढाच प्रदेश राहिला.
१३. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात, भ्रष्टाचारामुळे पोखरल्याने कंपनीचे दिवाळे निघाले आणि १८०० साली कंपनी विसर्जित झाली. तिचे कर्ज आणि मालकीहक्क डच बटाव्हियन रिपब्लिकाच्या सरकारकडे गेले. १८१५ मध्ये डच कंपनीच्या ताब्यातील सर्व प्रदेश डच वसाहती म्हणून डच सरकारने आपल्या ताब्यात घेतला. १७३२ मध्ये स्थापन झालेली डॅनिश एशियाटिक कंपनी १८४५ पर्यंत व्यापार करीत होती. या कंपनीला राजकीय दृष्टीने महत्त्व नाही.
१४. इंडोनेशिया १९४५ पर्यंत डच साम्राज्यांतर्गत एक वसाहत होती. डच ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यातील भूभाग पुढे डच ईस्ट इंडीज म्हणून ओळखला जाऊ लागला. १९ व्या शतकात इंडोनेशिया द्वीपसमूहाला सामावून घेत हा भाग विस्तारला आणि २० व्या शतकात यातूनच इंडोनेशिया निर्माण झाला.
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी
०१. द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही सतराव्या शतकात इंग्लंडमध्ये स्थापन झालेली कंपनी होती. या कंपनीच्या स्थापनेमागचा मुख्य उद्देश ईस्ट इंडीझ प्रदेशांत व्यापार करण्याचा होता परंतु कालांतराने या कंपनीचा सगळा व्याप भारतातच झाला. डचांच्या अतिपूर्वेकडील मसाल्याच्या फायदेशीर व्यापाराला शह देण्यासाठी सप्टेंबर १५९९ मध्ये लंडनमधील व्यापाऱ्यांनी एक संघटना स्थापन केली. देशातील भागधारकांकडून ३,००,००० पौंडांचे भांडवल जमविले.
०२. ३१ डिसेंबर १६०० रोजी या कंपनीची स्थापना करण्यात आली. त्यावेळी या कंपनीचे १२५ भागधारक होते आणि कंपनीचे भांडवल £७२००० होते. ३१ डिसेंबर १६०० ला एलिझाबेथ राणीने ईस्ट इंडिया कंपनीला पंधरा वर्षांच्या कराराने अतिपूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याची सनद दिली.
पोर्तुगीज कंपनी
फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी
०२. याचा मुख्य उद्देश ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व डच ईस्ट इंडिया कंपनीशी स्पर्धा करून भारतातील तसेच भारताशी होणाऱ्या व्यापाराचा भाग मिळवण्याचा होता. फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीस दोन कंपन्यांइतके यश मिळाले नाही. १७९४मध्ये ही कंपनी बरखास्त करण्यात आली.
०३. भारत व अतिपूर्वेकडील देशांशी व्यापार करण्यासाठी फ्रेंचांनी चौदाव्या लुईच्या कारकीर्दीतच सुरुवात केली. १६६४ मध्ये चौदाव्या लुईचा मंत्री कॉलबेअर ह्याने परदेशांशी व्यापार करणाऱ्या विविध कंपन्यांची पुनर्रचना करून, पौर्वात्य व पाश्चात्त्य व्यापार यांकरिता दोन स्वतंत्र कंपन्यांची स्थापना केली.
०४. प्रथमपासूनच कंपनीला फ्रेंच सरकारचा पूर्ण पाठिंबा होता आणि व्यापारी, राजकीय व लष्करी हालचालींच्या बाबतीत पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले होते. फ्रेंचांनी भारतातील पाँडिचेरी, चंद्रनगर, माहे, कालिकत तसेच इंडोचायना, मॉरिशस ह्या अतिपूर्वेकडील भागांवर व्यापाराबरोबरच आपली राजकीय सत्ताही स्थापन केली.
०५. तत्पूर्वी भारतात इंग्रजांबरोबरच्या युद्धांत १७६० साली फ्रेंचाचा वाँदीवाश येथे पराभव झाला व त्यांच्याकडे केवळ वर दर्शविलेले प्रदेश राहिले. शिवाय जिनीव्हा परिषदेनंतर फ्रेंच-इंडोचायनाचे उत्तर व दक्षिण असे दोन विभाग होऊन उत्तर व्हिएतनाम कम्युनिस्टांच्या हाती गेला व फ्रेंचाची अतिपूर्वेकडील प्रदेशातील सत्ता संपली आणि पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर काही वर्षांनी फ्रेंचांची भारतातील सत्ताही संपुष्टात आली.