* दाब
०१. भौतिक शास्त्रात दाब ही संकल्पना द्रव व वायू या प्रवाही पदार्थाबाबत वापरण्यात आली आहे.
०२. एकक क्षेत्रफळाच्या पृष्ठभागावर लंब दिशेने क्रिया करणाऱ्या बलाच्या परिणामाला त्या पृष्ठ भागावरील दाब असे म्हणतात.
०३. दाबामधील बदल दर्शविण्यासाठी दाबमापी (बॅरोमीटर ) हे एक साधे व सोपे उपकरण वापरले जाते
०४. द्रवातील कोणत्याही बिंदुवरील दाब त्या बिंदुच्या द्रवातील खोलीवर अवलंबून असतो.
०५. वस्तूवर लावलेल्या बलाची दिशा वस्तूच्या पृष्ठभागाला लंब असेल तर त्या बलाचा वस्तूवर होणारा परिणाम सर्वाधिक असतो.एखाद्या पृष्ठभागावर लावलेल्या बलाचा परिणाम किती होतो हे लावलेल्या बलाचे परिमाण, बलाची दिशा आणि बल लावलेल्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ यावर अवलंबून असते. बलाच्या अशा एकत्रित परिणामाला दाब म्हणतात.
दाब = लंबरूप बल / क्षेत्रफळ
* पास्कलचा नियम
०१. बंदिस्त द्रवाला लावलेला दाब हा कमी न होता द्रवाच्या प्रत्येक भागावर सारखाच पारेषित होतो. यालाच पास्कलचा दाब पारेषणाचा नियम म्हणतात.
०२. व्यवहारात या नियमांवरून द्रविक दाबयंत्र (Hydraulic press) व द्रविक ब्रेक्स (Hydraulic Breaks) यांचे कार्य चालते.
* प्लावक बल
* वातावरण व त्याचा दाब
* पाऱ्याचा हवा दाब मापी
०१. वातावरणाचा दाब हा पाऱ्याच्या स्तंभाच्या उंचीने दर्शविला जातो. समुद्रसपाटीवर वातावरणाचा दाब ७६ सेमी उंचीच्या पाऱ्याच्या स्तंभाने दिलेल्या दाबाएवढा असतो.
०२. शून्य अंश सेल्सिअस तापमानाला ७६ सेमी उंची असलेल्या पाऱ्याच्या स्तंभाने दिलेला दाब म्हणजेच एक वातावरण दाब होय (g= 9.8 cm /s2)
०३. O० C तापमानास पाऱ्याची घनता p=13595 kg / m3
म्हणून १ वातावरण दाब = hpg = 1.013X105 n/m2
०४. पारा हा पाण्यापेक्षा १३.५९५ पट जड असल्याने पाऱ्याच्या ऐवजी पाणी वापरल्यास एक वातावराण दाब मोजण्यासाठी ६.७६X १३.५९५ =१०.३३ मी एवढ्या उंचीचा जलस्तंभ लागेल
* आर्किमिडीजचे तत्व
०१. कोणताही पदार्थ कोणत्याही द्रवात अंशतः अथवा पुर्णतः बुडविला असता त्याचे वजन कमी होते. त्याच्या वजनात येणारी तुट ही त्याच्या द्रवव्याप्त भागाने उत्सारलेल्या द्रवाच्या वजनाएवढी असते.
०२. पदार्थ द्रवात बुडविला असता द्रवाच्या दाबामुळे पदार्थावर क्रिया करणारे बल उर्ध्वगामी असते. या उर्ध्वगामी बलाला द्रवामुळे क्रिया करणारे प्लावकबल अथवा उत्प्रणोद म्हणतात. द्रवाच्या या गुणधर्माला प्लावकता म्हणतात. यावरून आर्किमिडीजचे तत्व खालीलप्रमाणे मांडतात.
०३. कोणताही पदार्थ द्रवात अंशतः अथवा पुर्णतः बुडालेला असता तो, द्रव्यव्याप्त भागाने उत्सारलेल्या द्रवाच्या वजनाएवढ्या बलाने, वरच्या बाजूस प्लावित केला जातो.
०४. आर्किमिडीजच्या तत्वानुसार अद्रावणीय व पाण्यापेक्षा हलक्या पदार्थाची घनता काढता येते.
०५. पाण्यात द्रावणीय अशा स्थायू पदार्थाची घनता काढतांना पदार्थ ज्या द्रवात विरघळत नाही असा द्रव वापरावा लागतो.
०६. हा निष्कर्ष आर्किमिडीज या विख्यात शास्त्रज्ञाने इ.स.पूर्व ३३२ मध्ये प्रस्थापित केला. याला ‘आर्किमिडीज तत्व’ असे म्हणतात. आर्किमिडीज हे ग्रीक शास्त्रज्ञ व गणिती होते. बाथटबमध्ये उतरल्यावर बाहेर सांडणारे पाणी पाहून त्यांना हा शोध लागला. ‘युरेका’असे म्हणजेच ‘मला मिळाले’ असे म्हणत ते बाहेर आले होते.
* तरणाचा नियम
०१. तरंगणाऱ्या वस्तुचे वजन तिच्या द्रवव्याप्त भागाने विस्थापित केलेल्या द्रवाच्या वजनाएवढे असते. यालाच तरणाचा नियम म्हणतात.
०२. लोखंडाची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असल्याने लोखंडी तुकडा पाण्यात बुडतो. परंतु तोच लोखंडी तुकडा पाऱ्यावर तरंगतो कारण पाऱ्याची घनता लोखंडापेक्षा जास्त असते.
०३. लाकडाचा ठोकळा पाण्यावर तरंगतो. पाण्यात जातांना तो पाणी बाजूला सारतो. सारलेल्या पाण्याचे वजन ठोकळ्याच्या वजनाएवढे होते. या वेळी ठोकळ्याचे वजन आणि ठोकळ्यावर कार्य करणारे प्लावीक बल समान असते.