* ग्रामसभा
०१. ग्रामसभेचे सभासद गावातील सर्व मतदार असतात. व्यक्ती १८ वर्षाचा झाला कि त्याला मतदान करण्याचा अधिकार मिळतो. मग तो प्रत्येक नागरिक आपोआपच ग्रामसभेचा सदस्य बनतो. एकदा सदस्य झाला कि तो मरेपर्यंत सदस्य असतो.
०२. ग्रामसभेला निवडणूक नाही. ग्रामसभेत हजर राहण्याचा, ग्रामसभेत मत, विचार मांडण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. बहुमतांनी ठराव पास / नापास करण्याचा, मत देण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे.
-जसे हे अधिकार आहेत तसेच हे अधिकार बजावण्याचे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. एकूण मतदारांच्या १५% सभासद किंवा एकूण १०० व्यक्तींपैकी जी संख्या कमी असेल. ती संख्या ग्राम सभेची गणपूर्ती समजली जाते.
—– १ मे – महाराष्ट्र दिन / कामगार दिन
—– १५ ऑगस्ट – स्वातंत्र्य दिन
—– २ ऑक्टोबर – महात्मा गांधी जयंती
०५. आर्थिक वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष तसेच निवडणुकीनंतरचा पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष सरपंच असतो. सरपंचांच्या गैरहजेरीत उपसरपंच हा अध्यक्ष असतो बाकी उर्वरित ग्रामसभेचा अध्यक्ष मतदारांनी बहुमताने निवडून दिलेला व्यक्ती हा ग्रामसभेचा अध्यक्ष असतो.
०६. ग्रामसभेत मतदारांना बोलण्याचा अधिकार आहे. मतदारांनी ग्रामसभेच्या अध्यक्षाची परवानगी घेवून बोलावे तसेच उभे राहून अध्यक्षांना अध्यक्ष महाराज असे संबोधून त्यांचेकडे पाहून बोलावे.
अध्यक्षांनी सुद्धा माहिती विचारणाऱ्याकडे पाहून बोलावे. सभेत मतदारांच्या प्रश्नाला फक्त अध्यक्षच उत्तर देवू शकतात. इतरांना उत्तरे देण्याचा अधिकार नाही.
०७. ग्रामसेवक हा ग्रामसभेचा सचिव असतो. ग्रामसभेचे इतिवृत्त सचिव तयार करून व्यवस्थित ठेवतो.
-मात्र त्याच्या अनुपस्थित अध्यक्ष सांगेल तो शिक्षक, तलाठी, अंगणवाडी सेविका या सारख्या शासकीय/ निमशासकीय / ग्रामपंचायत कर्मचारी तयार करील.
०८. पुढील ग्रामसभेत ज्या विषयांचे ठराव व्हावेत असे आपणास वाटते, त्याचे निवेदन तयार करून तसा विनंती अर्ज सभेच्या ८ दिवस आधी ग्रामपंचायतीत जमा करून त्याची पोच घ्यावी.
०९. ग्रामसभेत आपण रस्ता, पाणी, गटार, वीज, शिक्षण, आरोग्य, शौचालये, रेशन, रोजगार, घरकुले, असे कोणतेही नागरी, सार्वजनिक हिताचे प्रश्न उपस्थित करू शकतो व त्यावर चर्चा घडवून आणू शकतो व ठराव करण्यास भाग पडू शकतो.
१०. आर्थिक वर्षातील पहिली ग्रामसभा ग्रामपंचायतीच्या कार्यालयात घेणे बंधनकारक आहे. तसेच उर्वरित ग्रामसभा इंग्रजी मुळाक्षरांच्या (अल्फाबेटिकल्स प्रमाणे) अद्याक्षरांप्रमाणे इतर वाडे, वस्तीवर घ्याव्यात.
११. संध्याकाळी किंवा सकाळी लवकर देखील मतदारांच्या सोयीच्या वेळेत ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे. जर ग्रामसभेच्या दिवशी लग्न / मयत किंवा महत्वाचे कार्यक्रम असतील तर निवेदन देवून नागरिकांच्या सोयीच्या दिवशी ग्रामसभा भरविण्यास सुचवता येवू शकते.
१२. प्रत्येक ग्रामसभेपुर्वी एक दिवस अगोदर महिलांची ग्रामसभा घेणे आवश्यक आहे. त्या सभेमध्ये पारित झालेले ठराव जसेच्या तसे ग्रामसभेने मान्य करावे लागतात.
* ग्रामसेवक
०१. ग्राम सेवक हा ग्रामविकास खात्याचा वर्ग-३ चा कर्मचारी असतो. ग्राम सेवकाची निवड जिल्हा निवडमंडळाकडून केली जाते. त्याची नेमणूक मुख्य कार्यकारी अधिकारी करतात.
-ग्राम सेवकावर नजीकचे नियंत्रण गट विकास अधिकारी यांचे असते.
ग्रामसेवकाची कामे :
०१. ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करतो.
०२. ग्रामपंचायतीचे दफ्तर सांभाळणे
०३. कर्मचार्यांवर नियंत्रण ठेवणे.
०४. ग्रामपंचायतीचा अहवाल पंचायत समिती व जिल्हा परिषदेला देणे.
०५. व्हिलेज फंड सांभाळणे.
०६. ग्रामसभेचा सचिव म्हणून काम पाहणे.
०७. ग्रामपंचायतीच्या बैठकांना हजर राहणे व इतिवृत्तांत लिहणे.
०८. गाव पातळीवर बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून काम करणे.
०९. जन्म-मृत्यूची नोंद करणे.