महाराष्ट्र राज्याची निर्मिती (संयुक्त महाराष्ट्र चळवळ) – भाग ३

महाराष्ट्र राज्याची निर्मिती (संयुक्त महाराष्ट्र चळवळ) – भाग ३

* संयुक्त महाराष्ट्राची स्थापना

०१. अखेर १०५ जणांच्या बलिदानानंतर, १ मे १९६० ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली.

०२. द्वैभाषिकची विभागणी करताना महाराष्ट्र राज्याला गुजरात राज्याला १० कोटी द्यायचे व पुढील ४ वर्षात ती रक्कम कमी करत आणायची अशी अट मान्य झाली

०३. तसेच मुंबईचा विकास व उभारणी गुजराती भांडवलदारांनी केली असा दावा गुजराती भाषिक करत होते व त्याचं ‘व्याज’ म्हणून एकूण ५० कोटी देऊनच मुंबई महाराष्ट्राला मिळाली.

०४. नेहरुंना राज्याला ‘मुंबई’ नाव हवे होते. पण ते वगळून संयुक्त महाराष्ट्र समितीने ‘महाराष्ट्र’असे नाव ठरवले व राज्याची स्थापना कामगारदिनी म्हणजे १ मे रोजी केली गेली.

०५. महाराष्ट्र स्थापनेचा कलश पहिले मुख्यमंत्री यशवंतरावांच्या हस्ते आणला गेला. नव्या राज्याची मुंबई ही राजधानी व नागपूर उपराजधानी निश्चित झाली.

०६. १९६० च्या दशकातील संयुक्त महाराष्ट्र चळवळीने महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक भागास एकत्र आणले. स्वातंत्र्योत्तर काळात राजकीय दृष्ट्या यशस्वी अशा सहकारी चळवळी आणि जातीय गणितातील प्रभुत्वाने काँग्रेस पक्षाचे शासनात वर्चस्व राहिले.

०७. परंतु बेळगांव आणि आसपासचा परिसर व गुजरातेतील डांगी बोली बोलणारा प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट केला गेला नाही. बेळगाव, निपाणी कारवार हे भाग कर्नाटकात घातले गेले. बिदर, भालकी, संतपूर, हुमामाबाद, बुऱ्हाणपूर, सौंसर, मुल्ताई, भैंसदे हे भाग वादग्रस्त समजले गेले. उंबरगाव तालुक्यातील ५० खेडी, पश्चिम खान्देशातील उकाई योजनेची १४४ खेडी व संपूर्ण डांग जिल्हा गुजरातमध्ये समाविष्ट करण्यात आला.

०८. बेळगाव निपाणी कारवार भागातील मराठी भाषिकांनी ‘महाराष्ट्र एकीकरण समिती’ स्थापन करून जोरदार आंदोलन उभे केले. या आंदोलनात सीमावासियांना बलिदानही करावे लागले. त्याची स्मृती म्हणून आजही सीमा भागात १ नोव्हेंबर काळा दिवस म्हणून पाळला जातो. महाराष्ट्र सरकारने ऑगस्ट २००५ मध्ये सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात नेला आहे.

०९. बेळगांवासह ८६५ गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी आजही प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटक यामधील न सुटलेला सीमाप्रश्न अजूनही कायम आहे. १९६६ मध्ये बेळगावच्या प्रश्नावर केंद्र सरकारने महाजन आयोगाची स्थापना केली. या आयोगाच्या शिफारशी दोन्ही राज्यांना मान्य झाल्या नाहीत.






संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांची नावे 

२१ नोव्हेंबर १९५५ चे हुतात्मे
१) सीताराम बनाजी पवार
२)जोसेफ डेव्हिड पेजारकर
३)चिमनलाल डी.सेठ
४) भास्कर नारायण कामतेकर
५)रामचंद्र सेवाराम
६)शंकर खोटे
७)मीनाक्ष मोरेश्वर
८)धर्माजी नागवेकर
९)चंद्रकांत लक्ष्मण
१०)के.जे.झेवियर
११)पी.एस.जॊन
१२शरद जी. वाणी
१३)वेदीसिंग
१४)रामचंद्र भाटिया
१५)गंगाराम गुणाजी

—-जानेवारी १९५६ चे हुतात्मे
१६) बंडू गोखले
१७)निवृत्ती विठोबा मोरे
१८)आत्माराम रावजी पालवणकरण
१९)बालप्पा सुनप्पा कामाठी
२०)धोंडू लक्ष्मण पारडूले
२१)भाऊ सखाराम कदम
२२) यशवंत बाबाजी भगत
२३) गोविंद बाबूराव जोगल
२४) भाऊ सखाराम कदम
२५) पांडुरंग धोंडु धाडवे
२६)गोपाळ चिमाजी कोरडे
२७) पांडुरंग बाबाजी जाधव
२८) बाबू हरु काते
२९) अनुप महावीर
३०) विनायक पांचाळ
३१) सीताराम गणपत म्हात्रे
३२)सुभाष भिवा बोरकर
३३)गणपत रामा तानकर
३४)सीताराम गयादीन
3५) गोरखनाथ रावजी जगताप
३६) महंमद अली
३७) तुळशीराम पुंजाजी बेलसरे
३८) देवाजी सखाराम पाटील
३९) शामलाल जेठानंद
४०) सदाशिव महादेव भोसले
४१) भिकाजी पांडुरंग रंगाटे
४२) बासुदेव सूर्याजी मांजरेकर
४३) भिकाजी बाबू बाबरकर
४४)सखाराम श्रीपत ढमाले
४५) नरेंद्र प्रधान
४६) शंकर गोपाळ कुष्टे
४७)दत्ताराम कृष्णा सावंत
४८)बबन बापू बरगुडे
४९) विष्णु सखाराम बने
५०)सीताराम धोंडु राडे
५१) तुकाराम धोंडु शिंदे
५२)विठ्ठल गंगाराम मोरे
५३)रामा लखन विंदा
५४)एडवीन आमरोझ साळ्वी
५५)बाब महादू सावंत
५६)वसंत द्वारकानाथ कन्याळकर
५७)विट्ठल दौलत साळुंके
५८)रामनाथ पांडुरंग अमृते
५९)परशुराम अंबाजी देसाई
६०)घनशाम बाबू कोलार
६१)धोंडू रामकृष्ण सुतार
६२)मुनीमजी बलदेव पांडे
६३)मारुती विठोबा मस्के
६४)भाऊ कोंडीबा भास्कर
६५)धोंडो राघो पुजारी
६६)दयसिंग दारजेसिंग
६७) पांडू महादू अवरीरकर
६८) शंकर विठोबा राणे
६९)विजयकुमार सदाशिव बेडेकर
७०)कृष्णाजी गणू शिंदे
७१)रामचंद्र विठ्ठल चौगुले
७२)धोडु भागु जाधव
७३)रघुनाथ सखाराम बेनगुडे
७४)काशीनाथ गोविंद चिंदरकर
७५) करपैया किरमल देवेंद्र
७६)चुलाराम मुंबराज
७७)बालमोहन
७८) अनंता
७९)गंगाराम विष्णु गुरव
८०)रत्नु गोंदिवरे
८१) सय्यद कासम
८२)भिकाजी दाजी
८३)अनंत गोळतकर
८४)किसन वीरकर
८५)सुखलाल रामलाल बंसकर
८६)पांडुरंग विष्णु वाळके
८७)फुलवरु मगरु
८८)गुलाब कृष्णा खवळे
८९)बाबूराव देवदास पाटील
९०) लक्ष्मण नरहरी थोरात
९१)ठमाबाई विठ्ठल सूर्यभान
९२) गणपत रामा भुते
९३)मुनशी वझीर अली
९४)दौलतराम मथुरादास
९५) विठ्ठ्ल नारायण चव्हाण
९६) सीताराम घाडीगावकर
९७) होरमसजी करसेटजी
९८) सत्तू खंडू वाईकर
९९) मारुती बेन्नाळकर
१००)मधुकर बापू वांदेकर
१०१)लक्ष्मण गोविंद गावडे
१०२) महादेव बारीगडी
१०३)सौ. कमळाबाई मोरे ( निपाणी)
१०४) गिरधर हेमचंद लोहार
१०५) देवजी शिवन राठोड
१०६) माधव राजाराम तुरे(बेलदार)
१०७) शंकरराव तोरस्कर





महाराष्ट्र राज्याची निर्मिती – भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
महाराष्ट्र राज्याची निर्मिती – भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
संयुक्त महाराष्ट्र चळवळ व्हिडियो डॉक्युमेंट्री पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 


Please Share This Article for More Upadtes……

Scroll to Top