स्वाइन फ्ल्यू  रोगाविषयी माहिती

स्वाइन फ्ल्यू रोगाविषयी माहिती

‘स्वाईन फ्ल्यू’ एन्फ्लुएंझा-ए (एच-1 एन-1) पॅनडेमिक या साथीचा ताप येण्याला ‘स्वाईन फ्ल्यू’ असे म्हणतात. जगातील आरोग्य संघटनेने ‘महासाथ’ हा आजार जाहीर केला आहे. 

पक्षी, डुक्कर आणि माणूस यांच्यातील विषाणूंच्या एकत्रीकरणातून एच-1 एन-1 हा नवीन विषाणू तयार झाला आहे.

रोगाची लक्षणे
धाप लागणे.
जीभ व ओठ काळेनीळे पडणे.
खूप चिडचिड होणे.
खोकला व शिंक येणे.
शरीर दुखणे.
घसा खवखवणे.
चक्कर येणे.
थंडी वाजून येणे.
डोके दुखणे.
थकवा जाणवणे.
छाती व पोट दुखणे

उपचार
‘टॅंमिफ्लू’ व ‘रेलेन्झा’ ही औषधे वापरली जातात.

मेक्सिको, अमेरिका, कॅनडा व भारत या देशांमध्ये ‘स्वाईन फ्ल्यू’ एच-1 एन-1 या विषाणूंमुळे डुकरापासून मानवाला लागण झाली आहे.

महाराष्ट्रातील पुणे शहरातील रिदा शेख या चौदा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला असून ती देशातील स्वाईन फ्ल्यूची पहिली बळी आहे.

Scroll to Top