दादाभाई नौरोजी

दादाभाई नौरोजी

दादाभाई नौरोजी

जन्म : ४ सप्टेंबर १८२८
जन्मस्थळ : नवसारी (गुजरात)
प्रभाव : विल्बर फोर्स

ओळख

भारताचे पितामह
आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते
भारतीय अर्थशास्त्राचे जनक
जहाल व मवाळ यांच्यात सुवर्णमध्य साधणारे नेते
भारतीय स्वराज्याचे पहिले उद्गाते

जीवनकार्य

१८८३ साली त्यांना ब्रिटिशांकडून ‘जस्टीस ऑफ पीस’ हा किताब प्रदान करण्यात आला.

१८५३ साली मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात नियुक्त होणारे ते पहिले भारतीय प्राध्यापक होते. ते रा.गो. भांडारकरांचे आवडते भारतीय प्राध्यापक होते.

बॅरिस्टर जिना हे दादाभाई नौरोजी यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी होते.

१८४५ साली त्यांनी स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी हि संस्था स्थापन करण्यात सहभाग घेतला.

१८६१ साली त्यांनी ‘रास्त गोफ्तार’ (खरी बातमी) नावाचे वृत्तपत्र सुरु केले. हे पर्शियन भाषेतील वृत्तपत्र होते. याचा उद्देश पारशी धर्मात सुधारणा करणे हा होता.

१८६६ साली त्यांनी इंग्लंडमध्ये ‘ईस्ट इंडिया असोसिएशन’ या संघटनेची स्थापना केली. या संघटनेच्या शाखा मुंबई, मद्रास व कोलकाता येथे सुरु केल्या. मुंबई येथील शाखेचे सचिव फिरोजशाह मेहता हे होते.

१८६६ साली त्यांनी आपल्या ‘Poverty and Unbritish Rule in India’ या पुस्तकात लुटीचा सिद्धांत मांडला. यालाच आर्थिक निःसारणाचा सिद्धांत असेही म्हणतात.

या सिद्धांतानुसार त्यांनी भारतीयांचे सरासरी उत्पन्न २० रु असल्याचे सिद्ध केले.

१८७२-७४ या काळात दादाभाई बडोदा संस्थानाचे दिवाण होते.

१८८५ साली त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत सहभाग घेतला.

१८९२ ते ९५ या काळात ते ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्स चे सदस्य होते. तेथे ते फिन्सबेरी या मतदारसंघातून निवडून गेले होते.

दादाभाई नौरोजी हे इंग्रजांच्या मतदारसंघातून निवडून येणारे व तेथील हाऊस ऑफ कॉमन्सचे सभासद बनणारे पहिले भारतीय होते.

१८९६-९७ साली त्यांच्याच प्रयत्नामुळे भारतात वेल्बी कमिशनची स्थापना झाली. याचा उद्देश हिंदी राज्यकारभाराचा खर्च किंवा भारतातील आर्थिक सुधारणासंबंधी अहवाल सादर करणे हा होता.

वेल्बी कमिशनसमोर साक्ष देणारे पहिले भारतीय गोपाळ कृष्ण गोखले हे होते. या कमिशनचे पहिले सदस्य दादाभाई बनले.

दादाभाई नौरोजी राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे तीनवेळा अध्यक्ष बनले.

१८८६ – कोलकाता अधिवेशन
१८९३ – लाहोर अधिवेशन
१९०६ – कोलकाता अधिवेशन

ते रॉयल कमिशनचे पहिले हिंदी सभासद होतेत्यांनी व्हॉइस ऑफ इंडिया हे इंग्रजीतील वृत्तपत्र सुरु केले.

त्यांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीसमोर ‘इंग्लंडचे भारताबाहेरील कर्तव्य’ हा निबंध वाचला.

३० जून १९१७ रोजी मुंबई येथे दादाभाई नौरोजी यांचे निधन झाले.

प्रसिद्ध वाक्ये

“इंग्रजांच्या न्यायपणावर विश्वास ठेवता ठेवता मी थकलो, म्हतारा झालो. जर मी तरुण असतो तर इंग्रजांविरुद्ध बंड करून उठलो असतो.”

“गजनीच्या मोहम्मदने आपल्या सतरा स्वाऱ्यांमध्ये जेवढी लूट भारताची केली नसेल तेवढी लूट ब्रिटिशांनी प्रगती, संस्कृती व विकास या गोंडस नावाखाली केली.”

१९०९ च्या मोर्ले मिंटो कायद्याबद्दल मत व्यक्त करताना ते म्हणाले कि, “या कायद्याच्या सुधारणेचा हप्ता आम्हा भारतीयांना पिढीभर पुरेल काय.”

Scroll to Top