गोपाळ कृष्ण गोखले

गोपाळ कृष्ण गोखले

गोपाळ कृष्ण गोखले

जन्म : ९ मे १८६६
जन्मस्थळ : कोथळूक जि.रत्नागिरी

गोपाळ कृष्ण गोखले हे भारताच्या इतिहासातील अतिशय महत्वाच्या व्यक्तिमत्वांपैकी एक आहेत.महात्मा गांधी, सरोजिनी नायडू आणि बॅरिस्टर जिना गोखलेंना आपला गुरु मानत.

गोपाळ कृष्ण गोखले यांचे टिळकांशी मोठे मतभेद होते.

जीवन

१८८७ साली गोखलेंनी राधाबाई यांच्याशी दुसरा विवाह केला.१८८९ साली समाजजागृती व राजकीय सुधारणा करण्यासाठी मवाळ मार्ग स्वीकारला

१८८९ साली मुंबई येथील काँग्रेसच्या अधिवेशनाला टिळक व गोखले प्रथमच उपस्थित होत१८९६-९७ या काळात वेल्बी कमिशनसमोर साक्ष देणारे ते पहिले भारतीय होते.

१८९१ ते ९८ या काळात ते डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे ते सेक्रेटरी होते.१९०२ साली व्हाईसरॉयच्या कौंसिलवर त्यांची नियुक्ती करण्यात आली.

१२ जानेवारी १९०५ रोजी त्यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली.

१९०५ साली काँग्रेसच्या बनारस येथील अधिवेशनाचे ते अध्यक्ष बनले. या अधिवेशनाला वेल्सचा राजकुमार व राजकुमारी हजर राहणार होते. त्यांचा सत्कार करावा असा प्रस्ताव मवाळांनी मांडला.

त्याला जहालांनी तीव्र विरोध केला. जहालांचा विरोध न जुमानता मवाळांनी या अधिवेशनात या दोघांचाही सत्कार केला. येथूनच जहाल व मवाळ यांच्यातील दरी वाढत गेली.

१९०९ साली मोर्ले मिंटो कायद्याचे सुधारणेचे स्वरूप ठरविण्यात त्यांनी पुढाकार घेतला.१९ फेब्रुवारी १९१५ रोजी त्यांचे निधन झाले.

इतर माहिती

गोखलेंना महाराष्ट्राचाच सॉक्रेटिस म्हणतात.भारतासाठी सर्वप्रथम पार्लमेंटची जाहीर मागणी करणारे ते पहिले भारतीय होते.

गोखलेंनी अर्थसंकल्पावर एकूण १२ भाषणे केलीते आगरकरांच्या सुधारक या वृत्तपत्राचे इंग्रजी विभागाचे संपादक होते.

गोखलेनी हितवादी हे दैनिक सुरु केले.पुण्याचा प्लेग कमिश्नर रँडच्या प्रकरणात पुरावा सिद्ध करता न आल्याने त्यांना भर कोर्टात इंग्रजांची जाहीर माफी मागावी लागली.

बंगालच्या फाळणीवेळी गोखले पुणे नगरपालिकेचे अध्यक्ष होते.गोखले लोकसेवा आयोगाचे सदस्यदेखील होते.

वर्णन

“गोखले बोलू लागले कि आपल्यापुढे गुलाबपुष्पाचा सडा पडतो.”
– सी.वाय. चिंतामणी

“गोखलेशिवाय अर्थसंकल्पावरील चर्चा म्हणजे शेक्सपिअरचे हॅम्लेट हे नाटक प्रिन्स ऑफ डेन्मार्क यांच्याशिवाय पाहण्यासारखे आहे.”
– सर ग्रे

“The Diamond of India and Jewel of Maharashtra”
– लोकमान्य टिळक

“गोखले सारखे अर्थसंकल्पावरील भाषण क्वचितच ऐकायला मिळते”
– व्हाइसरॉय लॉर्ड मिंटो

“गोखले म्हणजे आधुनिक काळातील ऋषी होय”
– विल्यम वेडर्नबर्न

Scroll to Top