प्राचीन भारताच्या इतिहासातील महत्वाच्या नोट्स – भाग २

प्राचीन भारताच्या इतिहासातील महत्वाच्या नोट्स – भाग २

संगम काळ
०१. संगम साहित्य आठ ग्रंथात समाविष्ट आहे. नत्रिने, कुरगदो, ऐगुरुणुरु, पाटट्रीफ्तु, परीपाडल, कलित्तौगै, अह्नानुरू, पुरनानुरू हे ते आठ ग्रंथ आहेत. तमिळ व्याकरणावर आधारित ‘तौल्कप्पियम’ या ग्रंथाची रचनासुद्धा संगम काळातच झालेली आहे. h 


०२. गायकांच्या गाण्यावर नर्तकी नृत्य करत असे. यांना ‘पाणर’ तसेच ‘विडैलियर’ असे म्हटले जात होते. 


०३. ‘संगम’ हा शब्द संस्कृत भाषेतील आहे. याचा अर्थ ‘गोष्टी’ किंवा ‘परिषद’ असा होतो. संगम साहित्याचा मुख्य विषय ‘शृंगार’ व ‘वीरगाथा’ आहे. या काळात शृंगाराला ‘अहम’ आणि वीरगाथेला ‘पुरम’ असे संबोधले जात होते. ‘पेदिनेकिलकिन्कू’ ही संगम साहित्याची प्रसिद्ध रचना आहे.


०४. प्रथम संगमाचे आयोजन ‘मदुरा’ येथे अगस्त्य ऋषींच्या अध्यक्षतेखाली केले होते. द्वितीय संगमाचे आयोजन ‘कपाटपुरम’ येथे अगस्त्य ऋषींच्या अध्यक्षतेखाली केले होते. तृतीय संगमाचे आयोजन ‘मदुरा’ येथे नक्कीरर यांच्या अध्यक्षतेखाली केले होते.


०५. ‘अवे’ हा संगमकालीन परिवार होता ज्याचा अर्थ सभा असे होतो. ‘उर’ नावाची संस्था नगराच्या प्रशासनाची व्यवस्था पाहत असे.


०६. अरीक्मेंडू येथील उत्खननातून असे स्पष्ट होते कि येथे पूर्वी रोमन व्यापाऱ्यांची छावणी अस्तित्वात होती.


०७. संगम काळात शिक्षकाला ‘कनक्काटर’ तर विद्यार्थ्याला ‘भान्वन’ किंवा ‘पिल्लै’ असे संबोधले जात होते.


०८. पार्श्वनाथाने  भिक्षुंसाठी चार व्रत सांगितले होते. 
—– मी जीवित प्राण्यासोबत हिंसा करणार नाही.
—– मी नेहमी सत्यच बोलणार. 
—– मी चोरी करणार नाही.
—– मी कोणतीही संपती ठेवणार नाही.


०९. बौद्ध साहित्यात महावीर स्वामींना निगष्ठ नाथपुत्र किंवा निग्रंथ सातपुत्र असेही म्हटले आहे. महावीर स्वामींचे बिहारच्या पटना जिल्ह्याजवळील पावापुरी नावाच्या ठिकाणी निर्वाण झाले.


१०. सम्यक श्रद्धा, सम्यक ज्ञान आणि सम्यक आचरण हे बौद्ध धर्मातील त्रिरत्न आहेत. जैन धर्मानुसार आत्म्याला भौतिक तत्वापासून मुक्त करणे हेच निर्वाण आहे. महावीर स्वामींनी सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य हे पंचमहाव्रत सांगितले आहेत.



बौद्ध काळ
०१. गौतम बुद्धांचा जन्म नेपाळच्या तराइत कपिलवस्तू पासून १४ किमी दूर असलेल्या लुम्बनी वनात झाला. या काळात कौन्दिन्य नावाचा एक ब्राह्मण भविष्यवेत्ता होता.


०२. गौतमना गया येथे ज्ञानाची प्राप्ती झाली. म्हणून त्या स्थानाला बौद्ध गया असे संबोधले जाते. बुद्धांचा प्रथम उपदेश धम्म चक्र परिवर्तन म्हणून ओळखला जातो. त्यांनी प्रथम उपदेश ऋषिपत्तन (सारनाथ) येथे दिला होता. ४५ वर्ष धर्मोपदेश करून वयाच्या ८० व्या वर्षी कुशीनगर येथे बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले. 


०३. बुद्धांचे अनुयायी भिक्षु, भिक्षुणी, उपासक आणि उपासिका या ४ भागात विभक्त आहेत. विनय पीटक, सुत्तपिटक, अभिधम्म पिटक हे त्रीपिटक आहेत. सुत्त विभंग, खन्धक, परिवार हे विनय पिटकाचे तीन भाग आहेत.


०४. दिघनिकाय, मज्झिम निकाय, अंगुत्तर निकाय, संयुक्त निकाय, खुद्द्क निकाय हे सुत्त पीटकाचे निकाय आहेत.


०५. अभिधम्म पीटकात दार्शनिक आणि अध्यात्मिक चिंतन केलेले आहे. धम्म संगीती, विभंग, धातुकथा, पुग्गल पंजीती, कथावस्तू, यमक, पट्ठान हे अभिधम्म पिठ्काचे सात ग्रंथ आहेत.  


०६. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मांत, सम्यक आजीव, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी हे अष्ठांगिक मार्ग आहेत. बौद्ध धर्मात अष्ठांगिक मार्गांना प्रजा स्कंध, शील स्कंध आणि समाधी स्कंध या तीन प्रकारात श्रेणीबद्ध केले आहे.


०७. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी हे मार्ग प्रजा स्कंधाच्या अंतर्गत येतात. सम्यक कर्मांत, सम्यक आजीव हे शील स्कंधाच्या अंतर्गत येतात. सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी हे समाधी स्कंधाच्या अंतर्गत येतात.


०८. महात्मा बुद्ध हे अनात्मवादी होते. आत्म्याच्या अस्तित्वावर त्यांचा विश्वास नव्हता.


०९. गौतम बुद्धांच्या मृत्यूनंतर महाकस्सप च्या अध्यक्षतेखाली राजगृहाच्या जवळ सप्तपर्ण गुहेमध्ये प्रथम बौद्ध संगीताचे आयोजन करण्यात आले. द्वितीय बौद्ध संगीताचे आयोजन वैशाली येथे, तृतीय बौद्ध संगीताचे आयोजन अशोकाच्या काळात पाटलीपुत्र येथे तर चौथ्या बौद्ध संगीताचे आयोजन कनिष्कच्या काळात काश्मीर येथे करण्यात आले.






मौर्य काळ
चंद्रगुप्त मौर्य
मौर्य साम्राज्यात विष्णुगुप्त चाणक्य याचे अभूतपूर्व योगदान होते.

ग्रीक लेखांमध्ये चंद्रगुप्त मौर्य याचा उल्लेख Sandrocottus असा करण्यात आला आहे. एपीअन आणि प्लुटार्क चंद्रगुप्ताचा उल्लेख Androcottus असा करत असत. 

विशाखादत्तच्या मुद्राराक्षस मध्ये चंद्रगुप्त मरीया यास चंद्रसीरि किंवा चंद्र्श्री असे म्हणण्यात आले आहे.


बौद्ध साहित्यातील महावंश ग्रंथात चंद्रगुप्त मौर्यास क्षत्रिय जातीय म्हणण्यात आले आहे. 


चंद्रगुप्ताकडून युद्धात पराभूत झाल्यांनतर सेल्युकसने चंद्रगुप्ताला गडरोसिया (बलुचिस्तान), अर्रकोसिया (कंधार), एरिया (हिरात) आणि हिंदूकुशचा काही भाग हे भाग बहाल केले.


जुनागढ येथील सुदर्शन तलावाचे निर्माण चंद्रगुप्त मौर्य यानेच केले होते.


जैन धर्मातील मान्यतेनुसार जीवनाच्या अंतिम क्षणी चंद्रगुप्ताने जैन धर्माचा स्वीकार केला होता. नंतर तो जैन भिक्षु भद्रभाऊ सोबत मैसूर येथे निघून गेला.


चंद्रगुप्ताच्या काळात शासनप्रणाली राजतंत्रशुद्ध होती. राज्य योग्य पद्धतीने चालविण्यासाठी चंद्रगुप्ताने मंत्रिपरिषदेचे गठन केले होते. 


व्यापार कर गोळा करणाऱ्या व्यक्तीस ‘शुल्काध्यक्ष’ म्हटले जात असे. राजकीय व्यवसाय विभाग अध्यक्षास ‘सुत्राध्यक्ष’ असे म्हटले जात असे. मोजन मापन अधिकाऱ्यास ‘पित्वाध्यक्ष’ म्हटले जात असे.


मौर्य काळात दारू उत्पादन आणि विक्रीवर नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकाऱ्यास सुराध्यक्ष असे म्हटले जात असे. तसेच कृषी विभागाच्या अध्यक्षास ‘सीताध्यक्ष’ असे म्हणण्यात येत असे. यासोबत मौर्यकाळात गणिकाध्यक्ष, मुद्राध्यक्ष, नावाध्यक्ष, अश्वध्यक्ष, देवताध्यक्ष इत्यादी अनेक मौर्यकालीन अधिकारी होते.


राज्याच्या अर्थविषयक अधिकाऱ्याला सन्निधाता म्हणण्यात येत असे. कोषाध्यक्ष आणि शुल्काध्यक्ष हे अधिकारी सन्निधात्याच्या अधीन असत.


मौर्यकाळात कारखाना मंत्र्याला ‘कर्मांतीरक’ असे म्हटले जात असे.


मौर्यकाळात फौजदारी न्यायालयाच्या अमात्याला ‘प्रदेष्टा’ तर दिवाणी न्यायालयाच्या अमात्याला ‘व्यावहारिक’ म्हटले जात असे. ग्रीक लेखकांनी अमात्याचे वर्णन सातव्या जातीचे लोक असे केले आहे.


चंद्रगुप्ताच्या काळात नगरप्रमुखाला नगराध्यक्ष म्हणण्यात येत असे. 


चंद्रगुप्ताच्या काळात शासनव्यवस्थेची सर्वात खालची पायरी ग्राम होती. याच्या प्रमुखाला ग्रामिक किंवा ग्रामिणी म्हणीत असत. ग्रामिणीची निवड जनतेच्या द्वारे केली जात असे. प्रत्येक गावात सरकारचा एक अधिकारी असे त्याला ‘ग्राम-भोजक’ असे म्हटले जात असे.


‘बिंदुसार’ हा चंद्रगुप्ताचा उत्तराधिकारी होता. वायू पुराणात याचा उल्लेख भद्रासार तर इतर काही पुराणात याचा उल्लेख वारीसार असा करण्यात आला आहे. चिनी ग्रंथ फा-युएन चू-इन मध्ये बिन्दुसाराचा उल्लेख बिंदूपाल असा करण्यात आला आहे.


इजिप्तचा राजा टोलेमीने बिन्दुसाराच्या राज्यात आपला डायोनियस नावाचा दूत पाठविला होता.

Scroll to Top