मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील महत्वाच्या नोट्स – भाग २

मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील महत्वाच्या नोट्स – भाग २

सल्तनतकाळ
इ.स. १२०६ ते १५२६ पर्यंतच्या काळाला सल्तनतकाळ असे संबोधण्यात येते. सल्तनतकाळातील पहिला सुलतान कुतुबुद्दीन ऐबक तर शेवटचा सुलतान इब्राहिम लोदी हा होता. सल्तनत काळात गुलाम वंश, खिलजी वंश, तुघलक वंश, सय्यद वंश आणि लोदी वंश या ५ घराण्यांनी दिल्लीवर राज्य केले.


याच काळात तैमूरने १३३८ साली भारतावर आक्रमण केले.


सल्तनतकाळात प्रधानमंत्र्याला वजीर नावाने ओळखले जात असे. वजिराच्या विभागाला ‘दिवाण ए वजारत’ असे नाव होते. प्रांताच्या जमा खर्चाचा हिशोब ठेवणाऱ्या अधिकाऱ्याला ‘मुशरिफ ए मामलिक’ असे नाव होते.


सल्तनतकाळात महालेखापरीक्षकाला ‘मुस्तफा ए मामलिक’ असे म्हटले जात असे. याचे मुख्य कार्य ‘मुशरीफ ए मामलिक’द्वारे तयार केले गेलेल्या हिशोबाची तपासणी करणे हे होते.


सेनेच्या मुख्य अधिकारी याला ‘आरीज ए मुमलिक असे म्हणण्यात येत असे. मात्र हा मुख्य सेनापतो नसे.


आलेख विभागाच्या अध्यक्षाला ‘दबीर ए खास’ म्हणण्यात येत असे. त्याच्या कार्यालयाचे नाव ‘दिवाण ए ईशा’ होते. ‘दिवाण ए ईशा’ मधून शाही फर्मान (आदेश) जाहीर केले जात असत.


कोषाध्यक्षाला ‘खजीज’, मुख्य न्यायाधीशाला काजी-ए-मामलिक’, निर्माण विभागच्या प्रमुखाला ‘मीर-ए-इमारत’ म्हटले जात असे.


सुलतानद्वारे सल्तनतीचे विभाजन छोट्या प्रांतात केले जात असे. या प्रांतांना ‘इक्ता’ हे नाव देण्यात आले होते. इक्ताचे विभाजन पुढे छोटछोट्या शिक किंवा जिला मध्ये करण्यात आले होते.


जकात च्या अंतर्गत सदपा आणि टीथ कर समाविष्ट होते. टीथ कर हा भूमी कराचाच एक प्रकार आहे. खिराज हा सुद्धा भूमी कराचाच एक प्रकार आहे. 


मोठ मस्जिदीची निर्मिती सिकंदरशाह लोदी याने केली होती. जौनपूर येथील झंझरी मस्जिदीची निर्मिती इस १४३० मध्ये इब्राहिम शिर्की याने केली होती. जौनपूर येथील सर्वाधिक महत्वपूर्ण जामी मस्जिदीची निर्मिती हुसेनशाह शक याने केली होती.


याच काळात गुरु नानक यांचा जन्म झाला होता. गुरु नानक यांचा जन्म १४६९ मध्ये लाहौर जवळील तळवंडी नावाच्या एका छोट्याशा गावात झाला. अंधविश्वास ठेवणाऱ्या समाजाला सुधारण्यासाठी गुरु नानक यांनी ‘निर्गुण संत मठाची’ स्थापना केली. 


शिखांचे पाचवे गुरु अर्जुन देव यांनी ‘गुरु ग्रंथ साहिब’ याचे संकलन करून नानक यांच्या रचनांना व्यवस्थित रूप प्रदान केले.


याचा काळात मलिक मुहंमद जायसी यांनी पद्मावत या काव्याची रचना केली. या काव्याला मोठी प्रसिद्धी मिळाली. हे काव्य राणी पद्मावती याच्यावर आधारलेले होते.






विजयनगर साम्राज्य
विजयनगर साम्राज्यात प्रांतीय शासकांना आपले स्वतःचे नाणे चालविण्याचा अधिकार होता. विजय नगर साम्राज्य सहा प्रांतातविभाजित करण्यात आला होता. प्रांताच्या प्रधानाला प्रांतपती किंवा नायक असे म्हणण्यात येत असे. प्रांतांना अनेक ‘नाडू’ अर्थात जिल्ह्यांमध्ये विभाजित करण्यात आले होते.


विजयनगर साम्राज्यात ब्राह्मणांचा आदर सम्मान होत असे.  ब्राह्मण जरी कितीही मोठा अपराधी असला तरी त्याला मृत्युदंड दिला जात नसे.


विजयनगर साम्राज्यात स्त्रियांनासुद्धा सन्माननीय स्थान प्राप्त होते. अनेक स्त्रिया शस्त्रविद्यासुद्धा ग्रहण करीत असत. अंगरक्षकांच्या जागी स्त्रियांचीसुद्धा नेमणूक केली जात असे.


कृष्णदेवरायला आंध्र पितामह ची उपाधी प्राप्त होती.


विजयनगर साम्राज्यात सोन्याची नाणी प्रचलनात होती. यांना ‘बाराह’ असे म्हटले जात असे. मिश्रित धातूंच्या नाण्यांना ‘परतब’ म्हटले जात असे.  






मुगल साम्राज्य
बाबर 
बाबर याचे संपूर्ण नाव ‘जहिरुद्दीन मुहम्मद बाबर’ असे होते. बाबरचा जन्म २४ फेब्रुवारी १४८३ रोजी फरघना येथील समरकंद येथे झाला. बाबरला हुमायून, अस्करी, कामरान आणि हिंदाल ही चार मुले होती.


बाबरने भारतावर प्रथम आक्रमण १५१९ मध्ये केले. या आक्रमणात त्याने बाजार आणि भेरा ही दोन राज्ये जिंकली. त्यानंतर तो येथून परत निघाला. तो परत निघून जाताच ही दोन्ही राज्ये त्याच्या हातातून निसटली .


त्यानंतर बाबरने भारतावर १५२६ मध्ये परत एकदा आक्रमण केले. मात्र यावेळेस तो येथून परत गेला नाही. पानिपतची लढाई जिंकून त्याने येथेच मुगल साम्राज्याची स्थापना केली.


बाबरने ‘तुलगमा युद्ध’ नीतीचा शोध लावला होता. याच युद्ध नीतीचा वापर करून त्याने इब्राहिम खान लोदीचा पराभव केला. प्रथम पानिपतच्या युद्धात भारतात पहिल्यांदाच तोपखान्याचा प्रयोग करण्यात आला होता. तोपखान्याचा प्रथम प्रयोग करणारा बादशाह बाबर ठरला.


उस्ताद अली तसेच मुस्तफा नावाच्या दोन तुर्की अधिकाऱ्यांकडून बाबरने तोपखान्याचा वापर शिकला होता.


बाबरने तुर्की भाषेत ‘तुजके बाबरी’ नावाची आत्मकथा लिहिली. मिर्जा हैदरने त्याच्या ‘तारिखे रसिदी’ या पुस्तकात बाबराच्या अनेक गुणांचे वर्णन केले. 


बाबरची मुलगी आणि हुमायूनची बहीण गुलबदन बेगम याने ‘हुमाँयूनामा’ हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात बाबरच्या विशेष गुणांचे वर्णन केले आहे.


बाबरने त्याच्या शासनकाळात ‘तमगा’ नावाचा कर समाप्त केला होता. 


बाबरच्या उदारतेच्या कारणावरून तो कलंदर म्हणून प्रसिद्ध आहे.


१५३० मध्ये बाबतचा मृत्यू झाला.






शेरशहा सूरी
बाबरच्या नंतर हुमाँयू वयाच्या २३ व्य वर्षी बादशाह बनला. तो बाबरचा मुलगा होता. हुमाँयूच्या आईचे नाव ‘माहम सुलताना’ होता. हुमायूनचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास होता. ज्योतिषावर विश्वास ठेवणारा तो पहिला मुस्लिम राजा होता.

१७ मे १५४० रोजी शेरशहाने बिलग्रामच्या युद्धात हुमाँयूचा पराभव केला. व तो दिल्लीचा बादशाह बनला.


त्यामुळे १५४४ साली हुमाँयू इराणचा शाह तहमास्पच्या संरक्षणाखाली निघून गेला.


शेरशहाच्या शासनकाळात ‘दिवाण-ए-वजारत’  हा शेतसारा आणि अर्थव्यवस्थेचा प्रमुख होता. याचे मुख्य कार्य उत्पन्नाचे हिशोब ठेवणे हा होता.


‘दिवाण-ए-आरीज’चे  मुख्य कार्य सेनेमध्ये भरती करणे, रसदची व्यवस्था करणे तसेच शिक्षणासंबंधी कार्यांना संपन्न करणे हा होता.


‘दिवाण-ए-रसालत’ चे मुख्य कार्य इतर राज्यांशी पत्रव्यवहार करणे हा होता.


‘दिवाण-ए- इशा’ चे मुख्य कार्य सुलतानच्या आदेशांचे लेखन करणे तसेच यांचा लेखाजोखा ठेवणे हे होते.


२२ मे १५४५ रोजी शेरशहा सुरीचा मृत्यू झाला. त्यानंतर १५५५ च्या काळापर्यंत सूर घराण्याचे एकूण ५ बादशाह होऊन गेले. इस्लामशाह सूरी, फिरुजशाह सूरी, मुहम्मद आदिल शाह सूरी, इब्राहिमशाह सूरी, सिकंदरशाह सूरी हे पाच बादशाह होऊन गेले.


जुलै १५५५ मध्ये हुमाँयू परत एकदा दिल्लीच्या गादीवर विराजमान झाला.


२७ जानेवारी १५५६ रोजी ‘दीनपनाह’ महालाच्या पायऱ्यांवरून खाली पडल्यामुळे हुमाँयूचा मृत्यू झाला.






सुलतानशाही व त्यांची नावे
विजापूर – आदिलशाही (१४८९)
गोवळकोंडा – कुतुबशाही (१५१२)
अहमदनगर – निजामशाही (१४५०)
बिदर – बरीदशाही (१५२६)
बेरार  इमादशाही (१४९०)

Scroll to Top