वंग भंग आंदोलन

वंग भंग आंदोलन

वंग भंग आंदोलन

१६ ऑक्टोबर १९०५ रोजी बंगालच्या फाळणीचा दिवस बंगालवासियांनी दुखवटा दिवस म्हणून पाळला.

या आंदोलनावेळी बंगालवासीयांनी स्वदेशीचा स्वीकार तर परदेशी माळावर बहिष्कार टाकला.

शाळा, महाविद्यालये, कोर्ट कचेऱ्या, रेल्वे स्टेशन, पोलीस स्टेशन इत्यादींवर बहिष्कार टाकण्यात आला.

यावेळी स्वदेशी चळवळीचे नेतृत्व रवींद्रनाथ टागोर, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, गुरुनाथ बॅनर्जी, आनंदमोहन बोस यांनी केले.

या आंदोलनाच्यावेळी प्रफुल्लचंद्र रे यांनी बंगाल केमिकल्स हा भारतातील स्वदेशी औषधांचा पहिला कारखाना सुरु केला.

या आंदोलनात लाल-बाल-पाल यांनी एकत्र येत चतुःसुत्रीचा प्रसार केला.

राष्ट्रीय शिक्षण, स्वराज्य, बहिष्कार, स्वदेशी ही ती चतुःसूत्री होती.

या आंदोलनात परवलीचा शब्द ‘वंदे मातरम’ हा होता.

हे आंदोलन बंगालपुरते मर्यादित न राहता राष्ट्रव्यापी आंदोलन बनले.

या आंदोलनाचा परिणाम म्हणून १२ डिसेंबर १९११ रोजी व्हाइसरॉय लॉर्ड हार्डिंग्जने दिल्ली येथे दरबार भरविला.

या दरबाराचा प्रमुख पाहुणा ब्रिटिश सम्राट पंचम जॉर्ज हा होता. त्याने बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा केली.

Scroll to Top