अकबर
१५४२ मध्ये अमरकोट येथे अकबराचा जन्म झाला. १५५६ साली तो दिल्लीच्या गादीवर बसला. १५५६ च्या पानिपतच्या दुसऱ्या युद्धात त्याने हेमू विक्रमादित्य याचा पराभव केला.
अकबर सत्तेवर आला तेव्हा राज्याला कठीण परिस्थितीतुन बाहेर काढण्याचे श्रेय बैरामखान यास जाते. १५५६ ते १५६० या कालावधीत मुगल साम्राज्याची शासन सूत्रे बैरम खान यांच्या हातात होती.
काही काळानंतर अकबर व बैरम खान यांच्यात बिनसले. तिल्वाडा या ठिकाणी अकबर व बैरम खान यांच्या फौजांमध्ये युद्ध झाले. या युद्धात बैरम खान पराजित झाला.
अकबराची आई हमिदा बानू एक धार्मिक सुफी शिया परिवारातील स्त्री होती. अकबर वर तिचा तसेच इतर स्त्रियांचा खूप मोठा प्रभाव होता. म्हणूनच काही इतिहासकार अकबर शासनकाळाला ‘परदा शासन’ किंवा ‘पेटीकोट सरकार’ असे संबोधतात.
अकबराची दाइ महाम अनगा हिच्या मृत्यूनंतर अकबराच्या शासनातील पेटीकोट शासनाचा अंत झाला.
इ.स. १५६२ मध्ये अकबराने गुलामी प्रथा संपुष्टात आणली. १५६४ साली त्याने जिझिया कर रद्द केला.
१५७६ साली हल्दीघाटीच्या प्रसिद्ध लढाईत अकबराचा सेनापती मानसिंग याने मेवाडचा राजा महाराणा प्रताप यास पराभूत केले.
अकबर पहिला असा मुस्लिम शासक होता ज्याने राजस्थानात सर्वाधिक यश प्राप्त केले. अकबराने गुजरातवर जे दुसरे आक्रमण केले होते ते आक्रमण जगातील ‘दूतगामी’ आक्रमण मानले जाते.
अकबराच्या दरबारात ९ महत्वाच्या व्यक्ती होत्या. त्यांना नवरत्ने असे म्हटले जाई. बिरबल, मानसिंह, फैजी, तोडरमल, अब्दुल रहीम खान खाना, अबुल फजल, तानसेन, भगवानदास, मुल्ला दो प्याजा ही अकबराच्या दरबारातली नवरत्ने होती.
अकबराच्या नवरत्नांपैकी एक महत्वाचे रत्न राजा बिरबलचा मृत्यू अफगाण बलुचिचा विद्रोह दूर करताना झाला.
अकबराने १५७१ मध्ये फतेहपूर सिक्रि येथे एका इबादतखाण्याची निर्मिती केली. येथे प्रत्येक गुरुवारी धार्मिक विषयांवर विचार विमर्श केला जात असे.
अकबराने जैन धर्मावरून प्रभावित होऊन जैन धर्माचे सिद्धांत समजून घेण्यासाठी गुजरात येथून महान धर्मगुरू जैन आचार्य हीरविजय सूरी यांना पाचारण केले. पारसी धर्मवरून प्रेरित होऊन अकबराच्या राजमहालात पवित्र अग्नी प्रज्वलित केला जाऊ लागला. हिंदू राजांच्या परंपरानुसार अकबराने प्रत्येक दिवशी आपल्या प्रजेस झरोक्यातून दर्शन देणे सुरु केले.
१५८२ साली अकबराने सर्व धर्मातील अतिउत्तम सिद्धांतांना घेऊन ‘तौहीद-ए-इलाही’ या नवीन धर्माची स्थापना केली. हा धर्म स्वीकारणारा पहिला व शेवटचा व्यक्ती ‘बिरबल’ हा होता.
अकबराच्या शासनकाळात प्रधानमंत्र्यास ‘वजीर’ किंवा ‘वकील-ए-मुतलक’ असे संबोधण्यात येत असे. अकबराने मुज्जफरखान यास आपला पहिला वजीर नेमले. सरकारी खजिनदारास ‘मुश्रिफ-ए-खजाना’ म्हणण्यात येत असे.
अकबराच्या शासनकाळात वित्तमंत्र्यास ‘दिवाण’ असे म्हंटले जात असे. दिवाणचा सहाय्यक ‘साहिब-ए-तौजिह’ सेनेच्या संबंधित हिशोब पाहत असे. दिवाणचा दुसरा सहाय्यक ‘दिवाण-ए-ब्यूतुत’ विविध कारखान्यांची देखरेख करत असे
‘पीर सामा’ राजमहाल, स्वयंपाकघर इत्यादींचा प्रबंध ठेवत असे.
अकबराने आग्रा येथे बुलंद दरवाज्याची स्थापना केली होती. अकबराने फतेहपूर सिक्रि येथे ‘जोधाबाई महाल’ ची स्थापना केली.
जहांगीर
अकबराच्या नंतर त्याचा मुलगा जहांगीर १६०६ साली भारताचा बादशाह बनला. अकबराचा जन्म रविवारी झाला होता म्हणून जहांगीरने ‘रविवार’ हा पवित्र दिवस म्हणून घोषित केला होता.
नूरजहाँ ही जहांगीरची पत्नी होती. ती शेर-ए-अफगाण या सरदाराची विधवा होती. नूरजहाँ एक शिक्षित महिला होती. तिला संगीत, चित्रकला आणि कविता रचनेची विशेष आवड होती. नूरजहाँ स्वतः फारसी भाषेत काव्यरचना करायची.
कॅप्टन हॉकिन्स हा मुगल दरबारात येणार पहिला इंग्रज कॅप्टन होता. तर इंग्रज शासनाचा दूत म्हणून सर थॉमस रो हा जहांगीरच्या दरबारात आला होता.
‘अब्दुर्रहीम खानखाना’ हे जहांगीरच्या शिक्षक व संरक्षक होते. जहांगीरला स्वतःलासुद्धा लेखनाची आवड होती. ‘तुजके जहांगिरी’ हि जहांगीरच्या सर्वोत्कृष्ट रचना आहे.
जहांगीरच्या मुलगा खुसरो याने बापाविरुद्ध बंड केले होते. म्हणून जहांगीरने त्याला आंधळा बनविण्याची शिक्षा दिली होती. तसेच शिखांचा पाचवा गुरु अर्जुनसिंग याने जहांगीरची मदत केल्याने त्याने अर्जुनसिंग यांना फाशी दिली.
जहांगीरने आग्रा येथे अकबर का मकबरा निर्माण केले.
१६२७ साली जहांगीरच्या मृत्यू झाला.
शाहजहाँ
शाहजहाँचा जन्म ५ जानेवारी १५९२ रोजी लाहोरमध्ये झाला. त्याच्या आईचे नाव ‘जगत गोसाई’ होते. खुर्रम हे त्याचे लहानपणीचे नाव होते.
शाहजहाँ च्या शासनकाळात मोगलसाम्राज्यात दोन मोठे विद्रोह झाले. पहिला विद्रोह बुंदेलखंडचा सरदार जुझरसिंह याच्या नेतृत्वाखाली तर दुसरा विद्रोह दक्षिणेचा सुभेदार खानजहाँ लोदी याच्या नेतृत्वाखाली झाला.
मुमताज महल ही शाहजहाँची पत्नी होती. तिचे मूळ नाव आरजूमंद बानो बेगम होते. तिला ‘मलिक-ए-जमानी’ ही उपाधी देण्यात आली होती.
शाहजहाँने मयूर सिंहासनाची निर्मिती केली होती. यालाच तखत-ए-ताऊस असे म्हणण्यात येते. सिंहासनाची निर्मिती बादलखान या कलाकाराने केली.
शाहजहाँने लाल किल्ल्याची निर्मिती केली.
शाहजहाँने मुमताजमहालच्या प्रेमापोटी आग्रा येथे १६३२ मध्ये ताजमहाल बांधला.
शाहजहाँला दारा शुकोह, शुजा, मुराद व औरंगजेब हे पुत्र होते.यापैकी दारा हा सर्वात विद्वान होता.
२५ एप्रिल १६५८ रोजी दारा व औरंगजेब यांच्यात युद्ध होऊन दाराचा पराभव झाला. याचवर्षी औरंगजेबाने शाहजहाँला आग्रा येथे नजरबंद ठेवले.
१६६६ मध्ये शहाजहानचा मृत्यू झाला.
औरंगजेब
औरंगजेबचा जन्म ३ नोव्हेंबर १६१८ रोजी उज्जैन येथे झाला. तो शाहजहान व मुमताज महल यांचा मुलगा होता.
औरंगजेबाचा गुरु मीर मुहम्मद हकीम हा होता. औरंगजेब सुन्नी पंथाला मनात होता. सिंहासनावर बसण्यापूर्वी औरंजेब दक्षिणेचा (दक्खन) गव्हर्नर होता.
औरंगजेबचे दोन राज्याभिषेक करण्यात आले होते. पहिला राज्याभिषेक ३१ जुलै १६५८ रोजी तर दुसरा राज्याभिषेक १५ जून १६५९ रोजी करण्यात आला. तो आलमगीर या नावाने सिंहासनावर बसला.
मुगल साम्राज्यातील पूर्वीचे सर्व बादशाह धार्मिकदृष्ट्या अत्यंत सहिष्णू होते. मात्र औरंगजेब त्याबाबतीत असहिष्णू होता. पूर्वीच्या काळापासून मुगल दरबारात साजरे होत असणारे हिंदू सण दरबारात साजरे करण्यास प्रतिबंध घातला. असे असले तरी तो स्वतः एक उत्कृष्ट वीणावादक होता.
औरंगजेबाने ‘रहदारी’ व ‘पानदारी’ हे कर रद्द केले. पण अकबराच्या काळात रद्द करण्यात आलेला ‘जजिया’ कर त्याने १६७९ मध्ये परत लागू केला.
१६८१ मध्ये औरंजेबाचा पुत्र अकबर याने दुर्गादासच्या सांगण्यावरून बापाविरुद्धच विद्रोह केला.
औरंजेबाने शिखांचे नववे गुरु तेगबहादूर यांचे शिरकाण केले.
उत्तरकालीन मुगल
औरंजेबच्या मृत्यूनंतर उत्तराधिकारी युद्धात यश मिळवून त्याचा मुलगा मुअज्जम सिंहासनावर विराजमान झाला. त्याने बहादुरशहा हे नाम धारण केले. यालाच ‘शाह बेखबर’ असे सुद्धा म्हटले जाते.
१७५९ मध्ये औरंजेबचा मुलगा अली मौहर सिंहासनावर विराजमान झाला. त्याने शाह आलम द्वितीय हे नाम धारण केले.
बंगालचा नवाब मुर्शिद कुली खान याने आपली राजधानी ढाका येथून मुर्शिदाबाद येथे स्थलांतरित केली. त्यानंतर बंगालचा नवाब मीर कासीम ने राजधानी मुर्शिदाबादहुन मुंगेर येथे स्थलांतरित केली.
मध्ययुगीन काळातील भारतातील युरोपियन
पोर्तुगाल शासनाच्या प्रतिनिधींच्या रूपाने वास्को द गामा भारतात आला. वास्को द गामानेच युरोपातून भारतात येणारा सागरी मार्ग शोधून काढला. सर्वप्रथम तो भारतातील पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात येऊन पोहोचला. तेथे त्याने तेथील राजा झामोरिन याला भेटवस्तू देऊन व्यापार करण्याची परवानगी मिळविली.
इस १४९२ मध्ये पॉप अलेक्झांडर यांनी पोर्तुगीजांना पूर्व समुद्रात व्यापार करण्याचे एकाधिकार बहाल केले.
इस १५०५ ते १५०९ पर्यंत फ्रन्सिस डी अल्मेडा हा पोर्तुंगिजांचा भारतातील गव्हर्नर जनरल होता. नंतर अलबकुर्क हा अल्मेडाचा उत्तराधिकारी गव्हर्नर जनरल म्हणून भारत आला. भारतीयांशी वैवाहिक संबंध स्थापित करून भारत गुंतवणूक सुरु करणे हा अलबकुर्कचा उद्देश होता.
पोर्तुगीजांनंतर डच भारतात आले. डचांनी सुरत, भडोच, कैंबे, अहमदाबाद, चीनसुरा, कासीम बझार, पाटणा, बालासौर, नागापट्टम, कोचीन, मछलीपट्टण, आग्रा येथे आपले व्यापारी केंद्र स्थापन केले.
डचांचा मुख्य उद्देश दक्षिण पूर्व आशियायी देशांशी व्यापार करणे हा होता. डचांसाठी भारत हा केवळ या देशांशी व्यापार करण्यासाठी एक मार्ग होता. यामुळेच अन्य युरोपीय कंपन्यांच्या तुलनेत भारतात डचांची प्रगती झाली नाही.
१६०८ मध्ये कॅप्टन हॉकिन्सच्या नेतृत्वाखाली पहिले इंग्रज जहाज भारतात आले.
१७१७ मध्ये मुगल बादशाह फर्रुखसियार याने एक फर्मान जाहीर करून इंग्रजांना व्यापारी अधिकार प्रदान केले.
१६९२ मध्ये बंगालच्या नवाबाकडून परवानगी प्राप्त करून फ्रेंचांनी बंगालमधील चंद्रनगर येथे व्यापारी कारखाना स्थापन केला.