बेरोजगारी

बेरोजगारी

बेरोजगारी

उच्च किंवा निम्न अशा कोणत्याही स्तरावरील आर्थिक क्रियांमध्ये गुंतलेल्या व त्याद्वारे राष्ट्रीय उत्पन्नात भर घालणा-या सर्व व्यक्तींना कामगार म्हटले जाते.

रोजगार नसलेल्या परंतु रोजगार मिळावा अशी इच्छा असलेल्या व्यक्तीला बेरोजगार म्हणता येईल. रोजगार मिळविण्यासाठी उत्सुक असलेली व्यक्ती त्यासाठी शारिरीक व मानसिकदृष्ट्या समर्थ असावी.

बेरोजगारीचे प्रकार पुढील प्रकार असतात.

खुली बेरोजगारी

काम करण्याची इच्छा व क्षमता असूनही नियमित उत्पन्न देणारा रोजगार प्राप्त होत नसेल तर त्याला खुली बेरोजगारी असे म्हणतात.
उदा. भूमिहीन, अकुशल व अर्धकुशल मजूर, शहरी भागात रोजगारासाठी आलेले मजूर. ही बेरोजगारी शहरी व ग्रामीण दोन्ही भागात आढळते.

हंगामी बेरोजगारी

भारतीय शेती हे हंगामी स्वरूपाची असल्याने विशिष्ट हंगामातच रोजगार उपलब्ध असतो. याचे उदाहरण म्हणजे शेतीच्या नांगरणीपासून कापणीपर्यंतचा कालावधी सोडून वर्षाच्या इतर काळात भासणारी बेरोजगारी.
ही बेरोजगारी प्रामुख्याने ग्रामीण भागात आढळते.

अदृश्य / प्रच्छन्न बेरोजगारी

आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर करुन एखादे काम जेवढे व्यक्ती करू शकतात त्यापेक्षा जास्त व्यक्ती त्या कामात गुंतलेले असल्यास.
यात काही व्यक्तींना कार्यातून मुक्त केल्यासही उत्पादनावर कोणताही प्रतिकूल परिणाम होत नाही.
यात श्रमिकांची सीमांत उत्पादकता शून्य असते. ही बेरोजगारी प्रामुख्याने ग्रामीण भागात आढळते.
याचे उदाहरण म्हणजे शेतीत एकाच्या जागी चार श्रमिकांचे काम करणे.

कमी प्रतीची बेरोजगारीज्यावेळी एखाद्या व्यक्तीला आपल्या क्षमतेपेक्षा / शिक्षणाच्या दर्जेपेक्षा कमी प्रतीच्या रोजगारावर समाधान मानावे लागते.

उदा . MA झालेला व्यक्ती कारकून म्हणून कार्य करणे. ही बेरोजगारी प्रामुख्याने शहरी भागात आढळते.

सुशिक्षीत बेरोजगारीजेव्हा सुशिक्षीत लोक कमी प्रतीच्या किंवा खुल्या बेरोजगारीला बळी पडतात. ही बेरोजगारी प्रामुख्याने शहरी भागात आढळते.

चक्रीय बेरोजगारी

हा विकसित देशातील बेरोजगारीचा प्रकार आहे. विकसीत भांडवलशाही देशांमधील व्यापारी चक्राच्या मंदीच्या परिस्थितीत ही बेरोजगारी दिसून येते.

यात तेजीच्या काळात रोजगार पुरवठा वाढतो तर मंदीच्या काळात रोजगार नसतो.

घर्षणात्मक बेरोजगारी

हा विकसित देशातील बेरोजगारीचा प्रकार आहे. विकसीत देशांना जेव्हा नवीन उद्योग जुन्या उद्योगांना आपल्या व्यवसायातून बाहेर पडण्यास भाग पाडतात व कामगार अधिक चांगल्या रोजगाराच्या प्रतिक्षेत असतात तेव्हा ही बेरोजगारी निर्माण होते.

असा तात्पुरता कालावधी जेव्हा कामगार ऐच्छिकरित्या बेरोजगार असतो तेव्हा त्या परिस्थितीला घर्षणात्मक बेरोजगारी असे म्हणतात. (येथे घर्षण जुन्या व नव्या उद्योगामध्ये निर्माण झालेले असतात.)

संरचनात्मक बेरोजगारी

हा विकसनशील देशातील बेरोजगारीचा प्रकार आहे. विकसनशील देशात उत्पादनक्षमता कमी असते त्यामुळे ही बेरोजगारी निर्माण होते.

Scroll to Top