संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय करार – भाग १
मानवाधिकाराची वैश्विक घोषणा (UDHR)
(UNIVERSAL DECLARATION OF HUMAN RIGHTS)
(UNIVERSAL DECLARATION OF HUMAN RIGHTS)
जागतिक मानवी हक्काचा जाहीरनामा
कार्यारंभ : १० डिसेंबर १९४८ (मानवी हक्क दिवस )
एकूण ३० कलमे (५ प्रकार)
साधारण अधिकार
कलम १ : सर्व व्यक्ती जन्मता: स्वतंत्र
कलम २ : लिंग ,जात, वंश ,जन्म ठिकाण धर्म यावरून भेदभावास मनाई.
कलम ३ : जीवित स्वतंत्र व संरक्षणाचा अधिकार
कलम ४ : गुलामगिरी प्रथेस मनाई
कलम ५ : कोणत्याही व्यक्तीला क्रूर अमानवी वागणूक न मिळणे.
कलम ६ : कायद्यासमोर सर्व ठिकाणी सर्व व्यक्ती समान.
कलम ७ : कायद्याचे सर्वाना समान संरक्षण.
कलम ८ : मानवी हक्काचे उल्लंघन झाल्यास तत्सम राष्ट्रीय न्यायाधिकरणाकडे जाण्याचा हक्क
कलम ९ : बेताल अटक (वाटेल तेव्हा )स्थानबद्धता, चौकशीवर बंदी.
कलम १० : न्यायालयात दाद मागण्याच्या अधिकार
कलम ११ : निर्दोषत्व सिद्ध करण्याच्या तसेच अटकेतून मुक्तता करून घेण्याचा सर्वांना अधिकार.
कलम १२ : कोणत्याही व्यक्तीच्या वैयक्तिक, कौटुंबिक बाबतीत कोणीही हस्तक्षेप करता कामा नये.
स्वातंत्र्याचा अधिकार
कलम १३ : संचार स्वतंत्र्य.
कलम १४ : प्रत्येकाला देशादेशात जाच रहित आश्रय मिळणे.
कलम १५ : प्रत्येकाला राष्ट्रीयत्व मिळणे.
कलम १६ : लग्न,कुटुंब व समाज उभारणीचे स्वातंत्र्य.
कलम १७ : मालमत्त्तेचा अधिकार
कलम १८ : विचार करण्याचे ,विवेकाचे व धार्मिक स्वातंत्र्य.
कलम १९ : विचार करण्याचा व मांडण्याचा अधिकार.
कलम २० : शांततामय मार्गाने एकत्र येण्याचे व संगठीत होण्याचे स्वातंत्र्य.
आर्थिक व सामाजिक अधिकार
कलम २१ :
– शासकीय कामकाजात सहभाग घेता येणे.
– वेतन तसेच सार्वजनिक सेवा मिळवण्याचा समान अधिकार असणे.
– लोकांच्या आर्थिक व सामाजिक अपेक्षांना लोकशाहीत आत्यंतिक महत्व .
– वेतन तसेच सार्वजनिक सेवा मिळवण्याचा समान अधिकार असणे.
– लोकांच्या आर्थिक व सामाजिक अपेक्षांना लोकशाहीत आत्यंतिक महत्व .
कलम २२ : सामाजिक सुरक्षा व मुक्त विकासाचा अधिकार.
कलम २३ :
– रोजगाराचा अधिकार
– समान काम व समान वेतन
– चांगले जीवन जगण्याइतपत न्याय व योग्य वेतन मिळणे.
– कामगार संघटना स्थापण्याचा किंवा सहभागी होण्याचा अधिकार.
– समान काम व समान वेतन
– चांगले जीवन जगण्याइतपत न्याय व योग्य वेतन मिळणे.
– कामगार संघटना स्थापण्याचा किंवा सहभागी होण्याचा अधिकार.
कलम २४ : कामात विश्रांतीचा ,कामाच्या विशिष्ट तासांचा व बिनपगारी विशिष्ट रजांचा अधिकार.
कलम २५ : निरोगी व चांगल्या राहणीमानाचे आयुष्य मिळण्याचा अधिकार तसेच बालपण व मातृत्वकाळात विशेष शुश्रुषा व सेवा मिळणे.
कलम २६ :
– मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण मिळण्याच्या अधिकार.
– शिक्षणाचा मानवी विकासात पुरेपूर वापर करणे.
– पालकांना पाल्यांच्या शिक्षणाच्या संधीची निवड करता येणे.
– शिक्षणाचा मानवी विकासात पुरेपूर वापर करणे.
– पालकांना पाल्यांच्या शिक्षणाच्या संधीची निवड करता येणे.
सांस्कृतिक अधिकारकलम २७ : सांस्कृतिक जीवन जगता येणे.
कलम २८ : सामाजिक तसेच आंतरराष्ट्रीय स्वातंत्र्य उपभोगता येणे.
इतर अधिकार
कलम २९ : समाजाप्रती प्रत्येकाचे काही कर्तव्य असणे.
कलम ३० : घोषणेतील विविक्षित अधिकार किंवा स्वातंत्र्यास बाधक असे कृत्य करण्यास कोणत्याही देशास परवानगी आहे असे अर्थ प्रस्तुत घोषणेचा लावता न येणे.
आर्थिक सामाजिक व सांस्कृतिक हक्कांचा आंतरराष्ट्रीय करार (ICESCR)
International Convention on Economy Social and Cultural Rights.
International Convention on Economy Social and Cultural Rights.
हा करार आमसभेत १६ डिसेंबर १९६६ ला स्वीकारला व ३ जानेवारी १९६७ पासून लागू.
या कराराच्या सरनाम्यात “मानवाधिकारास वैश्विक घोषणेत अपेक्षित असलेले मानवी स्वातंत्र्य व अधिकाराला तेव्हाच अर्थ आहे जेव्हा प्रत्येक व्यक्तीला आर्थिक,सामाजिक व सांस्कृतिक अधिकार उपभोगता येतील.”
एकूण ३१ कलमे व ५ भाग
कलम १ : प्रत्येक व्यक्तीला स्वयंनिर्णयाचा अधिकार
कलम २ ते ५ : वंश, जात, धर्म, लिंग यावरून कुठलाही भेदभाव न करता कल्याणकारी लोकशाहीची स्थापना करणे
कलम ६ : कामाचा हक्क
कलम ७ : काम मिळणे,न्याय व योग्य वेतन,कामात विश्रांती,तसेच विशिष्ट तासाचे काम असणे
कलम ८ : कामगार संघटना स्थापन करता येणे
कलम ९ : सामाजिक सुरक्षेचा हक्क
कलम १० : प्रसूतीकाळात सुट्टी वेतन तसेच आर्थिक पिळवणुकीपासून व बालमजुरी पासून बालकाचे संरक्षण
कलम ११ : अन्न, वस्त्र, निवारा,तसेच चांगले राहणीमान मिळण्याचा अधिकार
कलम १२ : उच्च प्रतीचे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य लाभण्याचा अधिकार
कलम १३ : माध्यमिक शिक्षणाची संधी मिळणे
कलम १४ : वैश्विक सक्तीचे,व मोफत शिक्षण मिळण्यासाठी राज्याने राष्ट्र पातळीवर नियोजन करणे
कलम १५ : विज्ञान व संस्कृतीचा अधिकार तसेच विकासाचा अधिकार मिळण्यासाठी राज्याने प्रयत्नशील असणे.