चलनवाढ

चलनवाढ

किंमत चलनवाढ अशी स्थिती आहे की ज्यामध्ये पैशाचे मूल्य घटते आणि पातळीत वाढ होते. – क्रॉउथर

 

अधिक झालेला पैसा जेव्हा कमी वस्तूंचा पाठ्लाग करतो त्या स्थितीला चलनवाढ असे म्हणतात. – कोलबर्न

चलनवाढ

इंग्रजीत ज्याला (inflattion) म्हणतात. त्यालाच मराठीत चलनवाढ, चलनविस्तार, किंमतवाढ, भाववाढ, मुद्रास्फिती किंवा चलनफुगवटा असे अनेक शब्द वापरले जातात.

याचा साधा अर्थ म्हणजे वस्तू व सेवांच्या सामान्य किंमती पातळी मध्ये विशिष्ट कालावधीत झालेली वाढ.दुसऱ्या भाषेत पैशाच्या मूल्यात झालेली घट म्हणजे वस्तू व सेवांच्या खरेदीसाठी जास्त रक्कम मोजावी लागण्याची स्थिती.
चलनवाढ एखाद्या विशिष्ट कालावधीमध्ये वस्तूच्या किंमत पातळीत होणारी वाढचलनाची खरेदी शक्ती कमी होते.
वस्तू व सेवांची मागणी वाढलेली असतेरोजगार निर्मिती क्षमता वाढतेबेरोजगारी कमी होतेयाचा फायदा ऋणकोना होतो तर तोटा धनकोना होतो
चलनसंकोच एखाद्या विशिष्ट कालावधीमध्ये वस्तू व सेवांच्या किंमतीत होणारी सतत घट खरेदी शक्ती वाढते.वस्तू व सेवांची मागणी कमी झालेली असते.रोजगार निर्मिती क्षमता कमी होते.बेरोजगारी वाढते.
याचा फायदा धनकोनां होतो तर तोटा ऋणकोनां होतो.

भाववाढीच्या मापन पद्धती (Measurement of Inflation)

भारतात दोन प्रमुख निर्देशांक आहेतघाऊक किंमत निर्देशांक (Wholsale Price Index)WPI वस्तूंच्या घाऊक किंमतीवरून काढला जातो.

यामध्ये फक्त वस्तूंच्याच किंमतीचा समावेश होतो.

WPI मध्ये ६७६ वस्तूंचा समावेश होतो.
WPI चे आधारभूत वर्ष २००४-०५
WPI दर महिन्याला काढला जातो. (दर आठवड्याला) मात्र प्राथमिक वस्तू व इंधन गटातील वस्तूंचा निर्देशांक काढला जातो.)
यावरून चलनवाढीचा दर वर्ष ते वर्ष (YEAR on YEAR) या पद्धतीने काढला जातो.
YEAR on YEAR म्हणजे ज्या तारखेपासून मोजमाप सुरु झाले परत त्याच तारखेपर्यंत मोजणी करणे. उदा.१ जानेवारी ते १ च जानेवारी.
भाववाढीचा दर निर्देशित करण्यासाठी सरकार WPI चा वापर करतो.
ग्राहक किंमत निर्देशांक(Consumer Price Index)
CPI वस्तूंच्या किरकोळ किंमतीवरून काढला जातो.
CPI मध्ये वस्तू व सेवांच्या किंमतीचा समावेश (यास COST OF LIVING INDEX असेही म्हणतात.)
CPI दर महिन्याला काढला जातो. त्यावरून चलनवाढीचा दर वर्ष ते वर्ष (YEAR on YEAR) या पद्धतीने काढला जातो.

CPI चे ४ प्रकार पडतात. (२६० वस्तूंचा समावेश होतो.)

०१. CPI(IW)-CPI FOR INDUITRIAL WORKER
०२. CPI(AL)-CPI FOR ADRICULTURAL LABOURS 
– ६० वस्तू व सेवांचा समावेश.
– BASE YEAR १९८६-८७
०३. CPI(RL)-CPI FOR RURAL LABOURS
– यामध्ये १८० वस्तू व सेवांचा समावेश.
– BASE YEAR १९८६-८७
– वरील तिन्हींचे संकलन ‘श्रम ब्युरो सिमला’.

०४. CPI फोर URBAN NON MANUAL EMPLOYEE
– CPI-UMME
– १८० वस्तू व सेवांचा समावेश.
– BASE YEAR १९८४-१९८५
– संकलन व प्रकाशन CSO

चलनवाढीचे नियम

मुद्रा-अपस्फिती (DIS-INFLATION)
चलनवाढ किंवा महागाई वाढत असली तरीही चलनवाढीचा दर कमी होत जाणे या परिस्थितीला मुद्रा अपस्फिती असे म्हणतात.
अतिचलन वृद्धी (HYPER INFLATION)
महागाईचा दर ५०% हून जास्त झाल्यावर सर्व साधारणपणे त्याला अतिचलनवृद्धी असे म्हणतात.
मुद्रा-अवपातचलनघट व चलनवाढीचे सहअस्तित्व यांस चलनविस्तारात्मक चलनसंकोच असे म्हणतात.या मध्ये भाववाढीबरोबरच मंदी व बेरोजगारीची परिस्थिती निर्माण होते.
मुद्रा संस्फितीतीव्र मंदी दर करण्यासाठी सरकारने मुद्दाम घडवून आणलेली चलनवाढीची परिस्थिती.

जिफेन वस्तूसैद्धांतिक मांडणी-सर रॉबर्ट जिफेनअधिक किंमतीना ज्यांची मागणी वाढते मात्र कमी किंमतींना ज्यांची मागणी कमी होते अशा वस्तूंना जिफेन वस्तू असे म्हणतात.
सर ‘जिफेन’ यांना गरीब लोकांच्या जीवनावश्यक वस्तूंच्या उपभोगाबाबत हा विरोधाभास दिसून आला.
से चा बाजारविषयक नियमजे.बाप्टीस्ट से फ्रान्सचे अर्थतज्ञ व मुक्त अर्थव्यवस्थेचे पुरस्कर्ते.पुरवठा आपली मागणी निर्माण करतो.से यांच्या मते, खुल्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेत वस्तू व सेवांचे जेवढे उत्पादन म्हणजे पुरवठा होतो.
-तेवढीच त्या वस्तूंना व सेवांना मागणी निर्माण होते.

अंजेलचा नियम

खाद्याबाबतच्या आवडी व अग्रक्रम स्थिर असताना, उत्पन्न वाढत असताना अन्नावरील प्रत्यक्ष खर्च वाढत असला तरी उत्पन्नापैकी अन्नावर केलेल्या खर्चाचे प्रमाण कमी होते.

प्रो.ए.डब्ल्यू.फिलिप्स

अर्थव्यवस्थेतील बेरोजगारीचा दर व महागाईचा दर यांतील व्यस्त प्रमाण फिलीप वक्र रेषा दर्शवते.बेरोजगारीचा दर कमी असल्यास कामगाराच्या पगारवाढीचा दर जास्त असतो.
-अर्थातच त्यामुळे महागाईचा दर वाढतो. या नुसार,महागाई वाढली की बेरोजगारी किंवा बेकारी कमी होते.बेकारी वाढली की महागाई कमी होते.

चलनवाढीचे प्रकार

रांगती चलनवाढ भाववाढीचा दर खूप कमी असतो.वार्षिक ३%पेक्षा कमी.
चालणारी चलनवाढ
साधारणपणे ३ ते ७ %मात्र ती १०%पर्यंत पोहचत असल्यास सरकारने ती आटोक्यात आणावी.

पळणारी चलनवाढ
जेव्हा किंमत मोठ्या दराने वाढतात.साधारणपणे १० ते २०%याचा सर्वाधिक फटका गरीब व मध्यमवर्गीयांना.
झंझावाती किंवा बेसुमार चलनवाढकिंमत २०%पासून १००% पर्यंत किंवा त्यापेक्षाही जास्त.
या चलनवाढीमुळे अर्थव्यवस्था पूर्णपणे उध्वस्त.
उदा.दुसऱ्या महायुद्धानंतर हंगेरी. (येथे दर १३ तासांनी किंमत दुप्पट होत होत्या)
किंमती वाढण्याची कारणेवस्तू व सेवांच्या मागणीत वाढ घडवून आणणारे घटक.
०१. शासकीय खर्चातील प्रचंड वाढ.
०२. तुटीचा अर्थभरणा.
०३. चलनपुरवठ्यातील वाढ.
०४. खाजगी खर्चातील वाढ.
०५. लोकसंख्या वाढ.
०६. काळा पैसा.
०७. अंतर्गत कर्जाची परतफेड.
०८. निर्यातीमधील वाढ.
०९. करांमधील घट.
वस्तू व सेवांच्या पुरवठ्यात घट घडवून आणणारे घटक
०१. कृषी उत्पादनातील चढ उतार.
०२. अपुरी औद्योगिक वाढ.
०३. उत्पादन घटकांची दुर्मिळता.
०४. औद्योगिक कलह.
०५. नैसर्गिक संकटे.
०६. व्यापारी वर्गाकडून केली जाणारी साठेबाजी.
०७. ग्राहकांकडून केली जाणारी साठेबाजी.
०८. घटत्या उत्पादन फलाच्या नियमांची कार्यवाही.
०९. एकांगी उत्पादन.
१०. निर्यातीत वाढ होणे.

चलनवाढीचे सिद्धांत

मागणी ताणनिर्मित चलनवाढ (Demand Full Inflation)हा परंपरागत सिद्धांत आहे.
वस्तू व सेवांच्या पुरवठ्यापेक्षा त्यांच्या मागणीचे प्रमाण वाढल्याने किंमती वाढतात.असे हा सिद्धांत सांगतो.यात दोन सिद्धांत आहे.

प्रो.मिल्टन फ्रीडमन, हॉट्रे वायझर यांच्या मते चलनवाढ ही पूर्णपणे चलनी घटना आहे. अर्थात अविरिक्त चलन पुरवठाच चलनवाढीस जबाबदार असतो – चलनवाद्यांचे मत

 

वस्तू व सेवांच्या अतिरिक्त मागणीमुळेच किंमत वाढतात. – केन्सवाद्यांचे मत

खर्च दाब निर्मित चलनवाढ

या सिद्धांतानुसार मागणीत अतिरिक्त वाढ न होता सुद्धा उत्पादन खर्चात झालेल्या वाढीमुळे चलनवाढ होते.

उत्पादन खर्च का वाढतो?
– कामगारांच्या पगारात वाढ.
– कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ.
– आयात केलेल्या वस्तूंच्या किंमतीत वाढ झाल्यास.
– करांचे दर वाढल्यास.
– तेलांच्या किंमतीतील वाढ व जागतिक वाढीमुळे.
-अपूर्ण स्पर्धेचे अस्तित्व असल्यास खर्च दाब निर्मित चलनवाढ होते.
मिश्र मागणी ताण व खर्च दाब निर्मित चलनवाढ
अनेक अर्थ शास्त्रांच्या मते,चलनवाढीस मागणी ताण तसेच खर्च दाब या दोन्ही बाजू एकाचवेळी कारणीभूत असतात.
Scroll to Top