भूकवचावर बदल घडवून आणणाऱ्या शक्ती (बहिर्गत शक्ती) – भाग २
या प्रकरणातील नोट्स विशेषतः राज्यसेवा परीक्षेसाठी आहेत
विस्तृत झीज किंवा बृहदक्षरणसामुहिक विदारण (शिला पदार्थांची हालचाल) Mass Wasting, Mass Movement.
विदारणातून सुट्या कणांची निर्मिती होते व हे सुटे कण समूहाने गुरुत्वाकर्षणाने पुढे पुढे सरकतात. बाह्यकारकांसह गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव विस्तृत झिजेचे प्रकार.
‘शार्प’ याने १९३८ मध्ये विस्तृत झीजेबद्दल अभ्यास करून त्याचे चार प्रकार सांगितले.
०१. मंद प्रवहन (Slow Flowage )
०२. जलद प्रवहन (Rapid Flowage)
०३. मोठ्या प्रमाणावर जलद प्रवहन (Large Scale Rapid Slide)
०४. अवतलन रूप (Subsidence Form)
मंद प्रवहन
या क्रियेत विदारणात सुटे झालेले कण अतिशय मंद गतिने समूहाने पुढे सरकतात.
दोन उपप्रकार
०१. सरपटन (Creep) सूक्ष्म कण गुरुत्वाकर्षणाने उताराच्या दिशेने सरकतात
तीन उपप्रकार
– मृदा सरपटन (Soil Creep)
– पायथा डबर (Talus Creep)
– शैल विसर्पन (Rock Creep)
०२. मृतिका सरपटन (मृदा प्रवहन) (Solifluction)हा शब्द अंडर जॉन याने १९०६ मध्ये हा शब्द वापरला. पाणी हे वंगणाचे कार्य करते.
जलद प्रवहन विदारणातून सुटे झालेले वस्तू कण जलद गतीने खाली येतात पाण्याचे प्रवहन जास्त तीन उपप्रकार
०१. मृदा प्रवहन (Earth Flow)
उड्या मारत वस्तूकण पुढे जातात.
०२. पंक प्रवहन (चिखल प्रवहन) (Mud Flow)
पाण्याचे प्रमाण जास्त गाळाच्या स्वरुपात निसर्गनिर्मित दरीतून प्रवाहाच्या दिशेने वाहतात. आर्द्र हवामानाच्या प्रदेशात जागो जागी दिसतात. पायथ्याशी पंखाकृती मैदाने तयार होतात. विभाजन, आर्द्रशुष्क प्रदेशातील पंक प्रवाह ज्वालामुखी पंक प्रवाह, अल्पाईन.
०३. डबर अवधान (Debridge avalanches)
खडकाचे तुकडे असतात.पाण्याचे प्रमाण जास्त. अरुंद अशा दऱ्यातून उताराला अनुसरून धावतात. दऱ्याचा विकास होतात त्याला (Avalanches catter ) म्हणतात.
मोठ्या प्रमाणावर जलद प्रवहन भूस्खलन , अतिजलद प्रवहन किंवा भूमिपात (Very Rapid Flowage) (Land Slide)
पाण्याचे प्रमाण नसते. गुरुत्वकर्षणाला अनुसरून उताराच्या दिशेने प्रचंड मोठे खडक एकदम खाली येतात. १००m/s पर्यंत वेग असतो.
पाच प्रकार आहेत.
०१. बसकण (Slump)वेग जास्त असतो.खडकाला (Backward Rotation) असते.
०२. डबर घसरण (Debris Slide)गुंडाळण्याच्या (Rolling) क्रियेतून खाली येतात.पाणी अत्यंत कमी असते.
०३. डबर पात (Debris Fall)गुरुत्वाकर्षणाने कड्यावरून एकदम तुटून खाली पडतात. नदी ठिकाणी ही क्रिया जास्त होते.
०४. शिलाघसरण (Rock Slide)भेगा किंवा जोडांना अनुसरून पुढे जातात.
०५. शिलापात (Rock Fall)अवतलन रूप (Subsidence Form)चुनखडीच्या प्रदेशातद.कोरियाच्या खनिज भागात क्षरण (Erosion) अपक्षरण असेसुद्धा म्हणतात. अपरदन असेही म्हणतात. वाहून नेणे असा याचा अर्थ होतो.
विदारनातून सुटे झालेले कण बाह्यकारकांद्वारे घर्षण होऊन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे.
क्षरणाचे दोन प्रकार पडतात.
०१. भौतिक क्षरण
०२. रासायनिक क्षरण
भौतिक अपक्षरण
नदी, हिमनदी, वारा यांच्या घर्षणाने एका ठिकाणचे खडक दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणे.
उपप्रकार
०१. अपघर्षण
नदी, हिमनदी, वारा यामुळे खडकांची झीज होऊन पृष्ठभाग घासला जातो.
०२. संनिघर्षण
वहनाच्या दरम्यान एकमेकांवर आदळून त्यांचे लहान कणात रुपांतर होते.
०३. अपवहन
शुष्क प्रदेशात कार्य चालते. वाऱ्याद्वारे लहान लहान कणात रुपांतर करून ते वाहून नेणे.
०४. जलगती क्रिया
वाहत्या पाण्याच्या वेगामुळे आघातामुळे नदीपात्रातील मोठ्या खडकाचे लहान खडकात रुपांतर
०५. उखडणे/ उत्पाटन (Plucking)
हिमनदीच्या पात्रात ही क्रिया घडते.
रासायनिक अपक्षरण (Corrosion)भक्षण असे ही म्हणतात. चुनखडीच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर निसर्गनिर्मित पाण्याचे द्रावण तयार होते.
क्षरणचक्र
जेम्स हटन यांनी १७५८ मध्ये ही संकल्पना मांडली. समानतावादाचे चक्र या माध्यमातून क्षरण चक्राचे सिद्धांत मांडले.
अमेरिकन शास्त्रज्ञ विल्यम मोरिस डेविस यानी पुढे १८९९ मध्ये प्रथमच क्षरणचक्राची संकल्पना मांडली व त्यास जीवनचक्र असे नाव दिले.
डेविस याने नदीचे क्षरणचक्र सांगितले याचे तीन टप्पे सांगितले.(युवावस्था, प्रौढावस्था, वृद्धावस्था)
डेविस ने ‘शुष्क क्षरणचक्र’ १९०५ मध्ये मांडले.या सिद्धांतावर ‘वॉल्टर पेन’ या जर्मन शास्त्रज्ञ ने टीका केली.
याने तीन अवस्थेला नावे दिली. (आफास्तिजिन्डे – इंटिकिवलुंग, ग्लीकफार्मिक – इंटिकवलुंग, अबस्थिजिन्डे – इंटिकवलुंग)
कास्ट क्षरणचक्र
कास्ट प्रदेश = चुनखडीचा प्रदेश
१९११ – बिडी या शास्त्रज्ञा ने संकल्पना मांडली.
१९१८ – स्वीजीक व सैण्डर
‘किंग’ याने शुष्क सवाहना प्रदेशातील ‘पेडिप्लेशन चक्र’ १९४८ मध्ये संकल्पना मांडली. ‘पफ व टामस’ याने सव्हाना अपक्षय चक्र हे संकल्पना मांडली.
‘पेल्टीयर’ परिहिमानी क्षेत्रातील अपक्षयचक्र ही संकल्पना मांडली. ‘चोरले, स्ट्रलर, हैक’ यांनी डेव्हिसने सांगितलेल्या क्षरणचक्रास ‘भ्रामक’ सांगून गतिज संतुलन सिद्धांताचे प्रतिपादन केले.
क्षरणाची बाह्यकारके
०१. नदी
०२. हिमनदी
०३. भूमिगत पाणी
०४. वारा
०५. सागरी लाटा