या प्रकरणातील नोट्स विशेषतः राज्यसेवा परीक्षेसाठी आहेत
अंतर्गत शक्ती
याला निर्माणकारी शक्ती असे म्हणतात.
याच्या परिणामस्वरूप अभिसरण शक्ती कार्यरत असतात.
याचे दोन प्रकार पडतात.
०१. मंदगतीने कार्य करणाऱ्या शक्ती
०२. शीघ्र गतीने कार्य करणाऱ्या शक्ती
महाद्विप व पर्वतांची निर्मिती या मंद गतीच्या शक्तीने होते.या शक्तीला भूप्रक्षोभ म्हणतात. भूप्रोक्षोभ प्रक्रियेमुळे निर्माण होणाऱ्या भूरुपानुसार त्याचे दोन गटात विभागणी होते.
०१. महाद्विपिय निर्माणकारी हालचाली (भूखंड निर्माणकारी)
०२. पर्वत निर्माणकारी हालचाली (गिरीजनक निर्माणकारी हालचाली)
भूखंड निर्माण करणारी
‘इपिरोजेनी’ नावाच्या ग्रीक शब्दापासून निर्मिती झाली.(उभ्या दिशेने व्याप)
या शक्तींमुळे पृथ्वीवर पठार आणि मैदानांची निर्मिती होते.
यांच्या मध्ये दोन प्रकार पडतात.
ऊर्ध्वगामी शक्ती दिशा पृथ्वी केंद्रापासून भूपृष्ठाकडे
या प्रकारच्या हालचालीमुळे महाद्विप दोन प्रकारे उंचावतो.
०१. प्रोत्थान (उभार) (उच्चयन)
काही वेळेस भूखंडाचा एखादा भूभाग सभोतालच्या भूभागापेक्षा वर उंचावतो तेव्हा त्या वर उचललेल्या भूभागाला प्रोत्थान असे म्हणतात.
०२. उन्मजन (उत्थापन) (निर्गमन)
काही वेळेस महाद्विपाचा एखादा किनारा जो पूर्वी जलमग्न होता तो भाग सावकाश उंचावला म्हणजे त्या भागास ‘उत्थापन’ असे म्हणतात.या दोन्ही क्रियांना उठावकारी क्रिया असे म्हणतात.अशा प्रकारच्या शक्तीमुळे पठार निर्मिती होते.
उदा. आफ्रीकेचे पठार.
अधोगामी शक्ती
भूपृष्ठ दोन प्रकारे खाली जातो.
०१. अवतरण किंवा निच्चयन.
०२. निम्मजन
महाद्विपाचा एखादा किनारा पूर्वी समुद्र सपाटीच्या वर होता. तो भाग सावकाश खाली खचला जातो. त्या भागास निम्नजन असे म्हणतात.
अशा क्रियांमुळे मैदानाची निर्मिती होते.
पर्वत निर्माणकारी शक्ती [Orogenics]
पृथ्वीच्या अंतर्भागात क्षितिज समांतर दिशेने कार्य करतात.
orogenics हा ग्रीक भाषेतील शब्द आहे. oros चा अर्थ पर्वत genis चा अर्थ उत्पत्ती गिरीजनक शक्ती होतो. या आडव्या दिशेने कार्य करतात.
याचे दोन प्रकार पडतात.
संकोचीय हालचाली
एकमेकांच्या दिशेने क्षितिज समांतर अवस्थेत येतात यामुळे उत्पन्नित संरचना
यामध्ये दोन प्रकारच्या क्रिया घडतात.
संवलन
संकोचीप हालचालीमुळे खडकांना बाक निर्माण होतात. त्यास संवलन असे म्हणतात.
संवलनाचे प्रकार
०१. उत्स्वलन
जेव्हा खडकांना वरच्या बाजूने बाक येऊन त्यास घुमटाकार प्राप्त होतो त्यास उत्स्वलन असे म्हणतात.
०२. अवसंवलन
जेव्हा खडकाला खालच्या बाजूने बाक निर्माण होतो.त्याला अवसंवलन असे म्हणतात.
वलीकरण
१.५ सेमी ते २ किमी पर्यंत एका वलीची लांबी असते. अशा प्रकारच्या वल्याना वलीकरण म्हणतात.
०१. अपनती – वळीच्या वर आलेल्या भागाला अपनती असे म्हणतात.अपनतीच्या वरच्या लांबट भागास शिखर असे म्हणतात.
०२. अभिनती – वळीच्या खाली आलेल्या भागास अभिनती म्हणतात.
०३. समपनती – काही वेळेस अपनती भागात लहान लहान वळ्या पडतात, त्यास समपनती म्हणतात.
०४. समभिनती – ज्या वेळेस अभिनती च्या भागास लहान वळ्या पडतात. त्यास समभिनती असे म्हणतात.
०५. भुजा (बाजू किंवा अंग )- खडकांना वळ्या पडल्यावर त्या वळीतील अभिनती व अपनती वळ्याना दोन बाजू असतात. त्यांना भुजा असे म्हणतात. आसापासून दोन्ही बाजूच्या उतारांना भुजा ससे म्हणतात.
०६. आस – अपनतीच्या माथ्यावरील भूजांच्या उताराला काटकोनात पसरलेल्या संपूर्ण भागाला वळीचा आस असे म्हणतात.
०७. आसाची पातळी – संपूर्ण वलीच्या आसावरुन वळीचा छेद घेतल्यास पृष्ठापर्यंत वळीचा जो भाग उघडा पडेल त्याला आसाची पातळी असे म्हणतात.
वळ्यांचे प्रकार
०१. संमित वळ्या (समअंग वळ्या )
साधारण वळ्या
सारखाच उतार
०२. असंमीत वळ्या (असाधारण ,असमअंग वळ्या)
भुजा सारख्या नसतात
उतार सारखा नसतो
दाब वेगवेगळा पडतो
०३. एकनती वळ्या (दिग्नत वळ्या )
एका भागात लंब उताराची व दुसरी बाजू मंद उताराची.
०४. समनत वळ्या
दोन्ही भुजा एका बाजूला झुकलेल्या असतात.
०५. परिवलीत वळ्या
०६. प्रतिवलीत व ळ्या
०७. पंखाकार वळ्या
०८. ग्रीवा वळ्या (विखंडीत वळ्या)
०९. खुल्या वळ्या
१०. बंदिस्त वळ्या
वलीकरण पर्वतातून निर्माण होणारी भूरूपे
घडीचे पर्वत (वली पर्वत )
निर्मिती भूसन्नतीमध्येच होत असते.
भूसन्नतीला वलीकरणाचा पाळणा असेसुद्धा म्हणतात.
उदा.आल्प्स पर्वत
तनावक शक्ती
भूपृष्ठ अंतर्गत परस्पर विरुद्ध दिशेने तणावक हालचालीने उत्पन्नीत संरचना
०१. तडे
०२. भ्रंश ( प्रस्तर भंग)
भ्रंशाचे प्रकार
०१. सामान्य भ्रंश
तडा पडल्यानंतर काही भाग खाली खचला जातो.
०२. व्यूत्क्रम भ्रंश (प्रतिकूल भ्रंश)
०३. पाशर्वीय भ्रंश
क्षितिज समांतर दिशेने हालचाल
याच भ्रंशाला नतिलंब सर्पण भ्रंश असे म्हणतात.
०४. नतिउतार सर्पण भ्रंश
खडकांच्या भागांचे स्थानांतर नती उताराच्या दिशेने होते. त्यास नतीउतार सर्पण भ्रंश असे म्हणतात.
०५. क्षेपित /प्रणोद भ्रंश
खडकाच्या एका भागाचे स्थानांतरण होते.
कोन ४५० पेक्षा कमी असतो.
उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वत.
०६. सोपान किंवा पायऱ्यांच्या सिडीदार भ्रंश
या भ्रंशात भ्रंश पातळीचा उतार एका दिशेने असतो. व त्यांना पायऱ्या पायऱ्या सारखा आकार प्राप्त होतो.
उदा. युरोपातील राहीन नदीचे खोरे. एकूण युरोपातील ७०%खनिज राहीन नदीच्या खोऱ्यात
भ्रंशामुळे निर्माण होणारे भूआकार
०१. Block Faulting
०२. गट पर्वत/ अवरोधी/ हॉस्ट पर्वत
उदा.युरोपातीलब्लॅक फॉरेस्ट, व्हॉंसजेस हर्झ.
USA मधील केलिफोर्निया सिएरा नेवाडा
सुएझ व बत्तकाबा याच्या दरम्यानचा सिनाई पर्वत.
पीत समुद्र व जपानचा समुद्र याच्या दरम्यान असलेल्या कोरियातील पर्वत.
०३. ग्रेबन
मधला भाग खचतो ग्रेबन पासून मृत समुद्राची निर्मिती होते.
०४. रॉम्प व्हॉले
बाजूचे भाग वर जातात
उदा. आसाम दरी
०५. खच दरी (Rift Valley)
मधला भाग खोलपर्यंत खचला जातो.
उदा. युरोपातील राही नदीची दरी या दरीच्या एका बाजूला व्हासजेस व दुसऱ्या बाजूला ब्लोक फोरेस्ट गटपर्वत आहे
ही दरी ३२० किमी लांब व ३२ किमी रुंद आहे.
सुएझ व अकाबाचे आखात.
तांबडा समुद्र व एडनचे आखत यांच्याही दरम्यान खचदरी आहे.
जोड /संधी
भूकवचावर क्षितिज समांतर हालचालीमुळे ताण निर्माण होते.
कठीण प्रकारच्या खडकांना तडे पडतात. त्यास वळख पडत नाही
तडे पडलेल्या खडकांच्या भागांचे स्थलांतरण होत नाहीत. अशा भेगांना जोड किंवा संधी असे म्हणतात.
याची कारणे
०१. खडकांचे थंड होणे/ निवने
०२. खडक कोरडे होणे. (जलजन्य खडक)
०३. खडकांचे स्फटिकीभवन.
०४. अपनती व अभिनती यांच्यावर दाब पडून
संधीचे प्रकार
०१. स्तंभी जोड
अग्निजन्य खडकात निपण्याचे क्रीयेमुळे निर्माण
उभ्या भेगांना स्तंभी जोड
०२. पाटण जोड (विपत्रण जोड)
जलजन्य खडकातील आडवे जोड.
०३. प्रमुख जोड
आडव्या आणि उभ्या भेगांचे जाळे.
०४. नती जोड
खडकाच्या उताराला अनुसरून भेगा पडतात.
०५. नतीलंब जोड
खडकांना आडव्या भेगा पडतात.
नतीभेगांना काटकोनात छेदणाऱ्या.
०६. एकसंध जोड (स्थरिकीत जोड.)