या प्रकरणातील नोट्स विशेषतः राज्यसेवा परीक्षेसाठी आहेत
द्वितीय श्रेणीचे भूमिस्वरूपे
भूखंड आणि महासागर यांतील अंतर्गत शक्तीमुळे भूखंडावर आणि महासागरावर काही भूस्वरूपाची निर्मिती झाली यांचे दोन गटात वर्गीकरण करण्यात येते.
भूखंडावरील भूमीस्वरूपे
०१. पर्वत
०२. पठार
०३. मैदान
सागरावर भूमीस्वरूपे
०१. भूखंड मंच
०२. भूखंड उतार
०३. सागरी मैदान
०४. गर्त
पर्वत
९०० मी पेक्षा उंच असलेल्या उंचवट्यास पर्वत असे म्हणतात.
पर्वताचे वर्गीकरण
पठार
३०० ते ९०० मी पर्यंतच्या विस्तृत माथ्याच्या उंचवट्यास पठार असे म्हणतात.
०१. पर्वतांतर्गत पठार
आशिया खंडातील तिबेटचे पठार
दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हियाचे पठार
मेक्सिकोचे पठार
आशिया खंडातील तिबेटचे पठार
दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हियाचे पठार
मेक्सिकोचे पठार
०२. पर्वत पदीय पठार
पर्वताच्या पायथ्याशी असणारे पठार.
उत्तर अमेरिकेतील कोलोरॉडो पठार
दक्षिण अमेरिकेतील पँटागोनियाचे पठार
आल्पस पर्वताच्या पायथ्याशी इटलीचे पठार
०३. विदीर्ण पठार
स्कॉलंड व वेल्समधील पठार
जास्त पर्जन्याचा प्रदेश, वाहत्या पाण्यानी कडा व्यापत जातात.
०४. उष्ण व कोरड्या हवामानातील पठार
अरेबियाचे पठार
रेतीच्या स्वरूपातील पठार
०५. प्राचीन भूमीखंडपासून तयार झालेले पठार
पंजीयाचे विभाजन होताना त्यावेळी निर्माण झालेल कॅनडा चे पठार
स्केंडेनिवियाचे पठार
सेलिरियाचे पठार
ही पठारे अंगारालेंड (ग्ल्यारेशिया) पासून निर्माण झाली.
दक्षिणेकडील गौंडवना भूमिचे विभाजन होऊन ऑस्ट्रेलिया पठार, दख्खन पठार, आफ्रिकेचे पठार, ब्राझील पठार.
०६. वाऱ्याच्या निक्षेपण कार्याने निर्माण झालेले पठार
पश्चिम पाकिस्तानात रावळपिंडी जिल्हयातील पोतवारचे पठार.
०७. हिमनदीच्या घर्षण कार्यामुळे निर्माण झालेले पठार
प्लास्टोयसीन युगातील निर्माण झालेली आहेत.
ग्रीनलंडचे पठार
अंटार्क्टिका चे पठार
०८. हिमनदीच्या संचयन कार्यामुळे वाहून आणलेल्या गाळ वगैरे
जर्मनीतील प्रशियाचे पठार
काश्मीरमधील केरवा चे पठार.
०९. ज्वालामुखीमुळे निर्माण झालेले पठार
अमेरिकेच्या वायव्य भागतील कोलंबियाचे पठार
१०. महाद्विपीय पठारे
विस्तीर्ण अशा पठारांना महाद्वीपीय पठार असे म्हणतात
आफ्रीकेचे पठार
दख्खनचे पठार
अरेबियाचे पठार
इंडो चायनाचे पठार
११. घुमटाकार पठारे
उत्तर अमेरिकेतील ओझार्कचे पठार.
मैदान
समुद्रसपाटीपासून सुमारे ३००मी पेक्षा कमी उंची असलेल्या विस्तृत, सपाट, अतिमंद अशा उतारांना मैदान म्हणतात.
समुद्रसपाटीपासून सुमारे ३००मी पेक्षा कमी उंची असलेल्या विस्तृत, सपाट, अतिमंद अशा उतारांना मैदान म्हणतात.
रचनात्मक मैदाने रचनात्मक मैदाने ही प्रामुख्याने समुद्राकिनाऱ्यावर असतात
या मैदानाचे दोन प्रकार पडतात
या मैदानाचे दोन प्रकार पडतात
०१. किनारपट्टीचे मैदान
समुद्राच्या अंतर्गत भागातील शक्ती मुळे
समुद्राच्या अंतर्गत भागातील शक्ती मुळे
०२. नदीच्या क्षरण चक्रात समुद्राकिनाऱ्यात मृदू व कठीण खडकांच्या थराने बनलेले मैदान.
संचयन कार्यातून निर्माण होणारी मैदाने.पुढिल प्रकार पडतात.
०१. नदीच्या संचयन कार्यातून निर्माण होणारे गाळाचे मैदान
- पर्वतपदीय मैदान. भांबर प्रकारचे मैदान तयार होते. हिमालय पायथ्याशी निर्माण झालेले
- पूर मैदान (प्रौढावस्थेत नदी )
- त्रिभूज प्रदेश (वृद्धवस्थेत नदी)
०२. हिमनदीच्या संचयन कार्यामुळे
- हिमोडीचे मैदाने – शुध्द हिमनदीचे संचयन
- उत्क्षलित मैदाने – बर्फ आणि पाण्यापासून निर्माण होणारे मैदान म्हणजे उत्क्षलित मैदाने.
०३. वाऱ्याच्या संचयन कार्यामुळे
- चीनचे लूअस मैदान – पिवळसर रंग आणि सूक्ष्म गाळ
०४. सरोवरात गाळाचे संचयन होऊन निर्माण होणारी मैदाने
- भारतातील चिल्का सरोवर.
- आफ्रिकेतील व्हिक्टोरिया सरोवर.
क्षरण कार्यामुळे निर्माण होणारे मैदान
०१. समतलप्राय मैदाने
नद्यांच्या क्षरण कार्यातून (वृद्धावस्थेच्या) (क्षरण कार्यातून )
Monad Knox(मृतावस्थेत)
०२. कुएस्टा मैदान
नदीच्या वृद्धवस्थेत बशीच्या आकाराच्या खोलगट भागास कुएस्टा म्हणतात.
नेदरलँड्सचे मैदान
०३. कास्ट मैदाने
चुनखडीच्या प्रदेशात भूमिगत पाण्याच्या क्षरणाच्या कार्यातून निर्मिती होते
युगोस्लाव्हियात सर्वात जास्त.
०४. हिमघर्षित मैदाने
पर्वताच्या भागात घर्षण कार्यातून हिमनदीच्या घर्षण कार्यात
उत्तर अमेरिकेच्या उत्तर भागात.
महासागरात तयार होणारे भूरूपे०१. भूखंडमंच
१०० फॅदम पर्यंत यांची खोली असते.
१ फदम – ६फुट
किनाऱ्याशी लागून असलेला उतार १० ते ३० पर्यंत उतार
०२. खंडात उतार
खोली १०० फॅदम ते २००० फॅदम पर्यंत
उतार ५० ते १५० सरासरी उतार
०३. सागरी मैदान
२००० फॅदम ते ३००० फॅदम
उतार अतिशय नगण्य असतो
एकूण सागरी क्षेत्रफळाच्या ७५.९% भाग सागरी मैदानाचा असतो.
०४. सागरी डोह (गर्त)
याची खोली ३००० ते ५००० फॅदम
क्षेत्रफळ ७% एकूण महासागराच्या