नदी (भौगोलिक संज्ञा) – भाग २

नदी (भौगोलिक संज्ञा) – भाग २

नदीचे कार्य

बाह्यकारकाच्या क्षरणकार्यापैकी ९०% क्षरण नदी करते.
०१. क्षरण
०२. वहन
०३. संचयन
नदीचे क्षरण कार्य 
प्रक्रिया पुढील प्रकारे चालते ०१. जलदाब क्रिया नदीच्या वाहण्याच्या वेगाने खडकाचे तुकड्यात रुपांतर होते.

०२. अपघर्षण क्रिया
पाण्यासोबत लहान खडकाचे तुकडे खालून नदी पृष्ठभागासोबत घर्षण करतात.

०३. संन्निघर्षण क्रिया
वाहत असताना खडकाचे तुकडे एकमेकांवर आदळून लहान तुकड्यात रुपांतर करतात.

०४. भक्षण क्रिया 

नदीच्या क्षरणाचे स्वरूप.

०१. उर्ध्वक्षरण :- उभ्या गतीने क्षरण होत असते नदी पात्राची खोली वाढते.
०२. पार्श्ववर्ती क्षरण क्षरण कार्यावर परिणाम करणारे घटक.
०3. पाण्याचा वेग व सातत्य
०4. नदीतील पाणी प्रमाण
०5. नदीतील खडक प्रकार व रचना.
०6. नदीच्या पाण्यातील वाहणारे पदार्थ व त्याचे स्वरूप

नदीच्या क्षरण कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे

०१. V आकाराची दरी पहिल्या टप्प्यात निर्मिती नदीची युवावस्था असते.काठांचा आकार उतार ३०० पर्यंत असतो.
उदा. खंडाळ्याजवळ उल्हास नदीने अशा प्रकारची दरी निर्माण केली आहे.

०२. घळईदोन्ही काठाचा उतार ६००पर्यंत असतो.काठ तीव्र उताराचे असतात.सिंधू नदीने गिलगिटजवळ ५५०० मी खोलीची घळई निर्माण केली आहे.नर्मदा,सतलज,सिंधू,चंबळ याही नद्यांनी घळई तयार केली आहे.
०३. निदरी (महाघळई) दरीमध्ये दरी निर्माण केली जाते.
उदा. अमेरिकेतील कोलोरॅडो मधील ग्रँड कॅनियॉन हि जगप्रसिध्द निदरी आहे. याची खोली २०६० मी आहे.दोन टप्प्यात तयार होतो.नर्मदा नदीची भेडाघाट जवळील घळई.
०४. कुंभगर्ता किंवा रांजन खळगेनदीच्या पात्रातील मोठे खळगेखोली १० ते १५ मीरुंदी ३ ते ४ मी अशा डोहाना रांजण खळगे किंवा जलगर्तिका म्हणतात.गोदावरी पात्रातील रामकुंड,सीताकुंडअहमदनगर येथील कुकडी नदी (ता.पारनेर)
०५. धावत्या किंवा द्रूतप्रवाह नद्या (rapids)नद्यांतील खडकांची रचना मृदू-कठीण अशी असेल तर सहयाद्रीतून कोकणात वाहणाऱ्या नद्या.
०६. धबधबा किंवा जलप्रवाह.दोन प्रकार पाडलेले आहेत.

  • सामान्य धबधबा : याचे सरकता धबधबा, स्थायी धबधबा व पठारी धबधबा असे तीन प्रकार पडतात.
  • अवरोधक स्वरूपाचा धबधबा :– पृथ्वी अंतर्गत भागातील हालचालीमुळे एखादा भाग खचला जातो. नदीचे पुनरूज्जीवन व पृथ्वी अंतर्गत हालचाली यांमुळे.उदा. प्रस्तरभंगाने निर्माण झालेल्या आफ्रिकेतील झाम्बोजी नदीवरील धबधबा.व्हिक्टोरिया धबधबा.

०७. गुंफित गिरीपाद (अंतर्बधन सोंड)डोंगरामध्ये पायथ्या पासून वळणे घेऊन नदी वाहते. एक वळणाकार प्रकार तयार होतो.

नदीचे वहन कार्य

०१. घर्षण क्रियेद्वारे दगडगोटे नदीच्या खालुन वाहत जातात.घासत वाहत जातात.
०२. निलंबन क्रियेद्वारे नदी पात्रातून मध्यम भागातून वाहत जातात. खालच्या भागाशी संबंध नसतो.
०३. विद्रव्य क्रियेद्वारे खनिजयुक्त खडक पाण्यात विरघळतात.
०४. उत्परीवर्तन (उत्प्लवन )घासत जाणारे तुकडे थोडेसे उड्या मारत जातात. मोठ्या आकाराचे खडक तुकडे असतात.

नदीचे संचयन कार्य/ रचनात्मक /निक्षेपण नदीच्या वृद्धावस्थेत घडतेनदीने वाहून आणलेला गाळ, वहन करण्याधी क्षमता संपल्याने थोड्याच अवरोधात पूर्ण गाळाचे संचयन होते.

जलोड शंकू पर्वत उतारावर पायथ्याशी शंकू आकाराचे मैदान निर्माण होते त्यास जलोड शंकू असे म्हणतात.
जलोड पंख पंख्याच्या आकाराची मैदाने पायथ्याशी निर्माण होतात.
पर्वतपदीय गाळाचे मैदान पंखाकृती मैदानाचा विस्तार होऊन हे मैदान तयार होतात. हिमालयाचे पायथ्याचे खांबर मैदान
पुरतर किंवा नैसर्गिक बांध नदीचे पाणी पायाबाहेर जाऊन काही निसर्गनिर्मित बांध निर्माण होतात.
उदा.कोसी नदीचे बांध होयांगहो नदी ,मिसिसिपी नदी.
पुरमैदाने पुरतर जेथे निर्माण झाले तेथे पुरमैदाने निर्माण होतात. पुराचे पाणी जेथेपर्यंत जाते तेथपर्यंत सुक्ष्म गाळाचे मैदान तयार होते.
उदा.नाईल नदी, सिंधू नदी, गंगा नदी.
नागमोडी वळणे (नालाकृती कुंडके)नदीच्या प्रौढावस्थेतील महत्वाचे लक्षण नदी एखादा अवरोध आल्यास नदी त्याला वळसा घालून पुढे जाते.
उदा. चंद्रभागा नदी, भीमा नदी. Ox,blow lake
त्रिभुज प्रदेश (delta) हे सर्वात प्रथम शब्द (delta) प्रयोग हेरोडॉटस यांनी केला होता. नाईल नदीच्या मुखाशी जे संचयन झाले होते.त्या संचयनाला त्रिभुज प्रदेश असे म्हणतात. यासाठी मंद उतार असावा. नदीचा विस्तार व लांबी जास्त असावी. वाहत असताना गाळाचे प्रमाण जास्त असावे. धबधबे व धरणाची संख्या कमी असावी. त्रिभुज प्रदेशाचे प्रकार
०१. धनुष्याकार त्रिभुज प्रदेश
उदा.नाईल, सिंधू, मिकांग, होयांग्हो, नायझर, इरावती राहीन, मरे, डेन्यूग, बहुतेक नदीकाठी त्रिभुज प्रदेश याच प्रकारचे आहेत.

०२. पंखाकृती /विहंगपद (delta)
पक्षाच्या पायाचा आकार  उदा.गंगा नदी मिसिसिपी नदी.

०३. क्षिणाकार त्रिभुज प्रदेश
ज्यावेळेस नदी समुद्राशी मिळते तेंव्हा त्रिभुज प्रदेशाची व्यवस्थित निर्मिती होते. हडसन नदी त्रिभुज प्रदेश

०४. एकमुखी त्रिभुज प्रदेश
नदीच्या मुखाशी भारती प्रवाह जोरात असल्यास उदा. टायबर नदी त्रिभुज प्रदेश

०५. खाडीचा त्रिभुज प्रदेश
नदीच्या मुखाशी खाड्याची निर्मिती होते. उदा.हुगळी, नर्मदा आणि तापी.

०६. भग्नाकार त्रिभुज प्रदेश
त्रिभुज प्रदेशाचे भग्नादेश उरतात. व्हीएतनाम मधील होंग नदी उत्तर अमेरिकेतील रिओ ग्रांट नदी. जगातील सर्वात मोठ दलदल सुंदरबन
Scroll to Top