जम्मू-काश्मीरमधील जोजिला बोगद्याच्या बांधकामास मंत्रिमंडळाची मंजूरी
आर्थिक विषयक मंत्रिमंडळाच्या समितीने जम्मू-काश्मीरमधील दू-पदरी दोन्ही बाजूने वाहतुकीस सक्षम १४.१५ किलोमीटर लांबीचा ‘जोजिला बोगदा’ तयार करण्यास मंजूरी दिली आहे.
जोजिला भूप्रदेश श्रीनगर-कारगिल-लेह राष्ट्रीय महामार्गावर ११५७८ फुट उंचीवर आहे. हिवाळ्यात (डिसेंबर-एप्रिल) हिमवर्षावामुळे भारताच्या काश्मीर घाटी आणि लद्दाख दरम्यानच्या भागातील संपर्क तुटतो. त्यामुळे सर्वकाळ संपर्क सुविधा उपलब्ध करण्याच्या हेतूने हा बोगदा खणला जाणार आहे.
बिलासपूरमध्ये नवीन AIIMS उघडण्यास मंत्रिमंडळाची मंजूरी
केंद्रीय मंत्रिमंडळाने हिमाचल प्रदेशातील बिलासपुर येथे ‘अखिल भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था (AIIMS)’ स्थापन करण्यास मंजूरी दिली आहे.
१८ नोव्हेंबर २०१९ पर्यंत ही नियुक्ती आहे. एप्रिल २०१७ मध्ये आर. आर. भटनागर यांनी CRPF चा भार सांभाळल्यापासून हे पद रिक्त होते.
अभय हे सध्या केंद्रीय आरक्षित पोलीस दल (CRPF) मध्ये अतिरिक्त महानिदेशक पदावर कार्यरत आहेत.
अंमली पदार्थ नियंत्रण विभाग (Narcotics Control Bureau -NCB) ची १७ मार्च १९८६ रोजी भारत सरकारने स्थापना केली. NCB मादक द्रव्यांची तस्करी आणि अवैध पदार्थांचा दुरुपयोग टाळण्यासाठी भारतातील गुप्तचर यंत्रणा आहे.
इस्रायलसोबतच्या तेल व नैसर्गिक वायू क्षेत्रात सहकार्य करार
केंद्रीय मंत्रिमंडळाने तेल व नैसर्गिक वायू क्षेत्रात सहकार्य चालविण्यासाठी भारत आणि इस्रायल दरम्यान केल्या जाणार्या सामंजस्य करारास मंजूरी दिली आहे.
दोन्ही देशांमध्ये ऊर्जा क्षेत्रात सहकार्यातून गुंतवणूक, तंत्रज्ञान हस्तांतरण, संशोधन व विकास (R&D), संयुक्त अभ्यास करणे, मनुष्यबळ क्षमता निर्मिती आणि स्टार्ट-अप क्षेत्रात युती करण्यामध्ये सुलभता येणार.
इस्रायल हा नैऋत्य आशियामधील एक देश आहे. याला आग्नेय भूमध्य सागरची पूर्व किनारपट्टी लाभलेली आहे. जेरूसलेम ही देशाची (स्व-घोषित मात्र विवादीत) राजधानी आहे आणि इजरायली न्यू शेकेल हे देशाचे चलन आहे
म्यानमारसोबतच्या भू-सीमा पार करण्यासंदर्भात करारास मंत्रिमंडळाची मंजूरी
केंद्रीय मंत्रिमंडळाने भू-सीमा पार करण्यासंदर्भात असणार्या म्यानमारसोबतच्या करारास मंजूरी दिली आहे.
या करारामधून भारत आणि म्यानमार यांच्या सीमा क्षेत्रात वास्तव्य करणार्या लोकांच्या मुक्त स्वैराचारासंबंधित उपस्थित अधिकारांचे नियमन व त्यामध्ये सामंजस्य राखण्यास सुलभता मिळणार. त्यामुळे भारत आणि म्यानमार यांच्यात व्यापारी आणि भौगोलिक संपर्क वाढवण्यास प्रोत्साहन मिळणार.
म्यानमार दक्षिण आशियातला एक देश आहे. याला पूर्वी ‘बर्मा’ या नावाने ओळखले जात होते. भारत आणि चीन दरम्यानचा देश आहे. या देशाची राजधानी नाएप्यीडॉ हे शहर आहे आणि क्याट हे देशाचे चलन आहे

एकूण ६८०९ कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे जोजिला भूप्रदेशातला प्रवास ३.५ तासाच्या जागी फक्त १५ मिनटात होऊ शकणार आणि हा जगातला सर्वात लांब बोगदा असणार. यामुळे श्रीनगर, कारगिल आणि लेह यामध्ये सर्वकाळ संपर्क सुविधा असेल.
जोजिला भूप्रदेश श्रीनगर-कारगिल-लेह राष्ट्रीय महामार्गावर ११५७८ फुट उंचीवर आहे. हिवाळ्यात (डिसेंबर-एप्रिल) हिमवर्षावामुळे भारताच्या काश्मीर घाटी आणि लद्दाख दरम्यानच्या भागातील संपर्क तुटतो. त्यामुळे सर्वकाळ संपर्क सुविधा उपलब्ध करण्याच्या हेतूने हा बोगदा खणला जाणार आहे.
बिलासपूरमध्ये नवीन AIIMS उघडण्यास मंत्रिमंडळाची मंजूरी
केंद्रीय मंत्रिमंडळाने हिमाचल प्रदेशातील बिलासपुर येथे ‘अखिल भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था (AIIMS)’ स्थापन करण्यास मंजूरी दिली आहे.
१३५१ कोटी रुपयांची ही संस्था ‘प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना’ अंतर्गत उभारण्यात येणार आहे. या संस्थेमध्ये रुग्णांसाठी ७५० खाटांची सोय आणि ट्रॉमा सेंटरची सुविधा असेल. तसेच तेथे दरवर्षी १०० MBBS विद्यार्थी क्षमता असलेले वैद्यकीय महाविद्यालय आणि ६० बी.एस्सी. (नर्सिंग) विद्यार्थी क्षमतेचे नर्सिंग महाविद्यालय चालवले जाईल.
‘पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजना’ देशात विविध भागांमध्ये आरोग्य सुविधांना सर्वांसाठी समरूपता उपलब्ध करून देण्यासाठीच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे.
योजनेंतर्गत देशातल्या मागास राज्यांमध्ये वैद्यकीय शिक्षणास गुणवत्तापूर्ण करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे.
या योजनेला मार्च २००६ मध्ये मंजूरी दिली गेली. योजनेंतर्गत आतापर्यंत भुवनेश्वर, भोपाल, रायपुर, जोधपुर, ऋषिकेश आणि पटना या ठिकाणी AIIMS स्थापित केले गेले आहे.
अभय – अंमली पदार्थ नियंत्रण विभाग (NCB) चे नवे महानिदेशक
वरिष्ठ IPS अधिकारी अभय यांना अंमली पदार्थ नियंत्रण विभाग (NCB) चे महानिदेशक पदावर नियुक्त करण्यात आले आहे.