चालू घडामोडी १० जानेवारी २०१८

चालू घडामोडी १० जानेवारी २०१८

‘ओल्ड मंक’चे ब्रिगेडिअर कपिल मोहन कालवश 
‘ओल्ड मंक’ला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवणारे पद्मश्री ब्रिगेडिअर (निवृत्त) कपिल मोहन यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी ६ जानेवारी रोजी निधन झाले.


उद्योग व्यवसायातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना वर्ष २०१० मध्ये पद्मश्री किताबाने सन्मानित करण्यात आले होते. 

कपिल मोहन हे १९६५ च्या आधीपासून ट्रेड लिंक्स प्रा. लि.चे प्रमुख होते. त्यांनी डायर मीकिन ब्रेव्हरेजची धुरा सांभाळल्यानंतर कंपनीचा विविध क्षेत्रात विस्तार केला होता. 

कपिल मोहन यांनी या कंपनीची धुरा सांभाळल्यानंतर ओल्ड मंक रम भारतातच नव्हे तर जगात लोकप्रिय झाली झाली होती.



दिल्लीत प्रथम PIO संसदीय परिषदेचे आयोजन
९ जानेवारी २०१८ रोजी नवी दिल्लीत प्रथम ‘भारतीय वंशाचे व्यक्ती संसदीय परिषद’ (Persons of Indian Origin Parliamentary Conference) आयोजित करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

‘प्रवासी भारतीय दिवस’ भारताच्या विकासामध्ये परदेशात असलेल्या भारतीय समुदायाच्या योगदानाला चिन्हांकित करण्यासाठी दरवर्षी ९ जानेवारी रोजी साजरा केला जातो. 

९ जानेवारी १९१५ रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेमधून भारतात परतले आणि भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व केले. त्यामुळे ही तारीख प्रवासी भारतीय दिवस म्हणून निवडण्यात आली आहे.



भारताचा पहिला मल्टी-पेटाफ्लॉप सुपरकंप्यूटर ‘प्रत्‍यूष’ राष्ट्राला समर्पित 
पुण्यामध्ये भारताचा पहिला मल्टी-पेटाफ्लॉप सुपरकंप्यूटर ‘प्रत्‍यूष’ राष्ट्राला समर्पित करण्यात आला आहे.

‘प्रत्‍यूष’ मल्टी-पेटाफ्लॉप सुपरकंप्यूटरला ‘भारतीय हवामानशास्त्र संस्‍था (IITM), पुणे’ येथे प्रस्थापित केले गेले आहे, ज्याच्या माध्यमातून भुविज्ञान मंत्रालयाकडून अचूक हवामान अंदाज मिळण्यास मदत होईल.

‘प्रत्‍यूष’ मल्टी-पेटाफ्लॉप सुपरकंप्यूटरची उच्च प्रदर्शन कंप्यूटिंग (HPC) क्षमता ६.८ पेटाफ्लॉप आहे, जी कित्येक अब्जावधी गणना एका सेकंदात करू शकते. 

ब्रिटन (२०.४ पेटाफ्लॉप), जापान (२० पेटाफ्लॉप) आणि अमेरिका (१०.७ पेटाफ्लॉप) यांच्यानंतर भारत हवामान अंदाजासंबंधी देखरेख कार्यांसाठी HPC क्षमता ठेवणारा चौथा देश बनला आहे.


बांग्ला अभिनेता सौमित्र चट्टोपाध्याय यांना फ्रान्सचा ‘लीजन ऑफ ऑनर’ पुरस्कार
प्रसिद्ध बांग्ला अभिनेता सौमित्र चट्टोपाध्याय यांना फ्रान्स सरकारकडून ‘लीजन ऑफ ऑनर’ पुरस्कार घोषित झाला आहे.

८२ वर्षीय चट्टोपाध्याय यांनी सत्यजीत रे यांच्या ‘अभिजन’, ‘चारूलता’, ‘अरण्येर दिनरात्री’, ‘अशनी संकेत’ आणि अश्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका वठवलेल्या आहेत. 

त्यांनी १९५९ साली ‘अपूर संसार’ चित्रपटात रे यांच्यासोबत पहिल्यांदा काम केले होते.

‘लीजन ऑफ ऑनर’ हा सन्मान फ्रेंच सरकारच्या संस्कृती मंत्रालयाकडून फ्रान्समध्ये आणि जगातील कलाक्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल लेखक आणि कलाकारांना दिला जातो. 

हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. याची सुरुवात १९५७ मध्ये करण्यात आली होती आणि वर्षातून तीन वेळा दिले जाते.



ए. आर. रहमान – सिक्किमचे ‘ब्रॅंड अॅम्बेसेडर’
प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांना सिक्किमचे ‘ब्रॅंड अॅम्बेसेडर’ म्हणून नियुक्त केले गेले आहे. ही नियुक्ती एका वर्षासाठी आहे. 

११ दिवसांच्या पर्यटन उत्सव रेड पांडा विंटर उत्सवाला ८ जानेवारी २०१८ रोजी गंगटोकमध्ये सुरुवात झाली. त्यादरम्यान ही घोषणा करण्यात आली.



पश्चिम बंगालच्या अधिकृत ‘प्रतीक’ चे अनावरण
पश्चिम बंगाल राज्य शासनाला आपले अधिकृत ‘प्रतीक’ प्राप्त झाले आहे. प्रतीकामध्ये वरच्या बाजूला अशोक स्तंभ आहे तर मध्यभागी ‘बिस्व बांग्ला’ ही संकल्पना रेखांकीत केलेली आहे. यामध्ये हिरव्या रंगाला आधारभूत रंग दर्शवला गेला आहे.

हे प्रतीक राज्य शासन राज्याच्या विकासासाठी आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी वापर करणार.



ओपरा विनफ्रे यांना ‘सेसिल बी डी मिले’ सन्मान
हॉलीवुडमध्ये उल्लेखनीय योगदान देण्यासाठी ओपरा विनफ्रे यांना ७५ व्या गोल्डन ग्लोब्स पुरस्कार समारंभात ‘सेसिल बी डी मिले’ ने सन्मानित करण्यात आले आहे.

यासोबतच, ओपरा विनफ्रे वर्ष १९५२ मध्ये स्थापन करण्यात आलेला ‘सेसिल बी डी मिले’ सन्मान मिळवणारी पहिली आफ्रिकी-अमेरिकी महिला बनली.
Scroll to Top