चालू घडामोडी १४ जानेवारी २०१८

चालू घडामोडी १४ जानेवारी २०१८

गीता वर्मांची आंतरराष्ट्रीय भरारी
हिमाचल प्रदेशातील मनाली जिल्ह्यातील गीता वर्मा यांच्या दुचाकीवर स्वार होऊन दुर्गम भागातील खेड्यात राहणाऱ्या लोकांपर्यंत महत्त्वाच्या लसी पोहोचवण्याऱ्या कामाची दखल जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) घेतली आहे.


गीता यांनी २०१७ मध्ये डोंगराळ भागात असणाऱ्या सेरज घाटी परिसरातील खडतर रस्त्यांवरुन दुचाकी चालवत एका अभियानाअंतर्गत त्यांनी मिसल्स रुबेल्ला measles rubella (MR)vaccine लसी रायगढ (हिमाचल प्रदेश) पर्यंत पोहोचवल्या होत्या. 

त्यांच्या याच कामाची दखल घेत, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) त्यांच्या २०१८ च्या कॅलेंडरमध्ये गीता यांचा दुचाकी चालवतानाचा फोटो छापला आहे.



देशात ‘सक्षम-२०१८’ महोत्सवाचे आयोजन केले जाणार
महिनाभर चालणाऱ्या ‘सक्षम-२०१८’ या उपक्रमांचा १६ जानेवारी २०१८ ला दिल्लीत शुभारंभ होणार आहे. या मोहिमेअंतर्गंत समाजाच्या विविध स्तरांवरील व्यक्तींशी इंधन बचतीबाबत चर्चा करणे, जागरुकता निर्माण करणे आदींचा समावेश आहे.

सक्षम (संरक्षण क्षमता महोत्सव) हा केंद्र शासनाच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटनेच्या (PCRA) वतीने राबवण्यात येणारा वार्षिक उपक्रम आहे.


राज्य शासनासारख्या अन्य भागधारकांसह सार्वजनिक क्षेत्रातील तेल व वायू कंपन्यांच्या सक्रीय सहभागातून सर्वसामान्यांमध्ये इंधनाच्या बचतीबाबत तसेच पेट्रोलियम पदार्थांचे जतन या संदर्भात जागरुकता निर्माण करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना (Petroleum Conservation Research Association -PCRA) ही १९७८ साली स्थापित भारत सरकारच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अखत्यारित असलेली एक संस्था आहे, जी अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रात ऊर्जा कार्यक्षमतेला प्रोत्साहन देण्यामध्ये गुंतलेली आहे. 

हे सरकारला तेल आणि त्यावर भारताच्या अवलंबित्वाचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने धोरणे आणि धोरणांचा प्रस्ताव मांडण्यास मदत करते, तेल वापरण्याच्या पर्यावरणीय प्रभावाला कमी करण्यासाठी कार्य करते आणि जीवाश्म इंधनाचे संरक्षण देखील करते.



अतुल्य भारत डिजिटल दिनदर्शिका-२०१८ चे अनावरण
भारत सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ पुढाकाराचा भाग म्हणून पर्यटन आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ‘अतुल्य भारत डिजिटल दिनदर्शिका-२०१८’ चे अनावरण केले आहे. बाकावरील दिनदर्शिकेची ‘सर्वांसाठी भारत’ ही संकल्पना आहे.

यात दररोज भारतामधील पर्यटन स्थळांची छायाचित्रे प्रदर्शित केले जाणार. तसेच यात १२ विविध प्रकारच्या प्रवाश्यांचे विवरण दिलेले आहे आणि त्यांच्यासाठी सुयोग्य गंतव्य ठिकाणांची शिफारस देखील केलेली आहे.

अतुल्य भारत डिजिटल दिनदर्शिका अॅपच्या वापरकर्त्याला भारताच्या सर्व सण आणि उत्सवांची माहिती एकाच वेळी उपलब्ध होणार. हे अँड्राइड आणि iOS व्यासपीठावर डाउनलोड केले जाऊ शकते.


उत्तर कोएल जलाशय प्रकल्पासाठी बिहार, झारखंड सोबत केंद्राचा करार
१६२२.२७ कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चाच्या उत्तर कोएल जलाशय प्रकल्पाच्या उर्वरित कामाला पूर्ण करण्यासाठी भारत सरकारच्या जलस्त्रोत, नदी विकास व गंगा संरक्षण मंत्रालय आणि बिहार व झारखंड राज्य शासन यांच्यात सामंजस्य करार झाले आहे.

उत्तर कोएल धरणाचा बिहार आणि झारखंडला सिंचनाचा फायदा मिळणार आहे. या प्रकल्पासाठी दिर्घकालीन सिंचन कोष (LTIF) अंतर्गत बिहार आणि झारखंड राज्य शासनांसोबत राज्याच्या वाट्याच्या वित्त पुरवठ्यासाठी भारत सरकारचे जलस्त्रोत मंत्रालय, राष्ट्रीय जल विकास संस्था, NABARD आणि बिहार व झारखंड राज्य शासने यांच्यात एक पूरक करार केला गेला आहे.

उत्तर कोएल प्रकल्पाच्या बांधकामाला सुरुवात १९७२ साली झाली, मात्र १९९३ मध्ये यावर भूमी विवादामुळे स्थगित करण्यात आले. सोन नदीची उपनदी उत्तर कोएल नदी वर बांधण्यात येणार्‍या या प्रकल्पामधून झारखंडचे पलामू आणि गढवा जिल्हे तसेच बिहारचे औरंगाबाद व गया जिल्हे यासारख्या अत्याधिक मागास आणि दुष्काळग्रस्त क्षेत्रांमध्ये वार्षिक रूपात १,११,५२१ हेक्टर भूमीचे सिंचन होऊ शकणार.



राष्ट्रीय महिला मुष्टियुद्ध स्पर्धेत सरजुबाला देवीने सुवर्णपदक पटकावले
सरजूबाला देवी हिने ‘राष्ट्रीय महिला मुष्टियुद्ध विजेतेपद-२०१८’ स्पर्धेच्या ४८ किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले आहे.

मणिपुरच्या सरजूबालाने अंतिममध्ये हरियाणाच्या रितूचा पराभव करून राज्यासाठी एकमेव पदक जिंकले. सोबतच संपूर्ण स्पर्धेचा ‘सर्वोत्तम मुष्टियुद्ध’ चा किताब आपल्या नावे करून घेतला.

रेल्वे क्रीडा संवर्धन मंडळ (RSPB) ला ५ सुवर्ण आणि दोन कांस्य पदकांसह स्पर्धेचा एकूणच विजेता घोषित केले गेले. 

इतर सुवर्णपदक विजेत्यांमध्ये एल. सरिता देवी (६० किलो), सोनिया लाठेर (५७ किलो), मीना कुमारी (५४ किलो), राजेश नरवाल (४५-४८ किलो), पूजा रानी (७५ किलो) यांचा समावेश आहे.



भारत, भूटान यांच्या संयुक्त ‘विशेष प्रतीक’ चे अनावरण
भारत आणि भूटान यांच्या दरम्यानच्या औपचारिक राजकीय संबंधांचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष (५० वे वर्ष) आहे. यानिमित्त आयोजित समारंभाच्या ‘विशेष प्रतीक’ चिन्हाचे अनावरण करण्यात आले आहे.

दोन्ही देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी संयुक्तपणे नवी दिल्ली आणि थिंपू येथे या बोधचिन्हाचे अनावरण केले. हे चिन्ह दोन्ही देशांमधील ‘अनुकरणीय’ संबंध, विश्वास, सन्मान आणि एकदुसर्‍यांच्या हितार्थ संवेदनशीलता याला प्रदर्शित करते.
Scroll to Top