राज्यपालांच्या हस्ते पोलिस पदके प्रदान
यात एक राष्ट्रपती पोलिस शौर्यपदक, 12 पोलिस शौर्यपदके, उल्लेखनीय सेवेबद्दल 7 राष्ट्रपती पोलिस पदके आणि गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल 80 पोलिस पदकांचा समावेश आहे.
प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन 2015 रोजी राष्ट्रपतींनी या पदकांची घोषणा केली होती.
पोलिस हवालदार गणपत नेवरू मडावी यांना राष्ट्रपती पोलिस शौर्यपदक; तर पोलिस शिपाई सुनील तुकडू मडावी आणि पोलिस नाईक गिरिधर नागो आत्राम यांना पोलिस शौर्यपदक मरणोत्तर देण्यात आले.
पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक मोहंमद सुवेज महबूब हक आणि यशवंत काळे (पोलिस उपअधीक्षक, सातारा) यांच्यासह 12 अधिकाऱ्यांना पोलिस शौर्यपदकाने सन्मानित करण्यात आले.
कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव
17 जानेवारी रोजी मुख्यमंत्री सचिवालय येथे जनसंपर्क कक्षात मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत काही निर्णय घेतले गेले. ज्यात दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
महाराष्ट्र स्टेट इनोव्हेटिव्ह स्टार्टअप पॉलिसी 2017 ला मान्यता देण्यात आली. तर मराठवाड्यातील वॉटर ग्रीडसाठी ‘मेकोरोट’ या इस्त्राईल सरकारच्या कंपनीसोबत सामंजस्य करारही करण्यास मान्यता मिळाली आहे.
तसेच या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, कोल्हापूर येथील विमानतळाचे नामकरण ‘छत्रपती राजाराम महाराज विमानतळ, कोल्हापूर’ असे करण्यात येणार आहे.
कोल्हापुरात राजाराम महाराजांनी विमान सेवा सुरू केली होती. त्या अनुषंगाने कोल्हापूरच्या विमानतळाला राजाराम महाराज यांचे नाव देण्याची मागणी अनेक वर्षापासून सुरु होती. त्या मागणीला आता मूर्त स्वरूप आल्याने कोल्हापूरकरांच्या मध्ये आनंदाचे वातावरण आहे.
दिल्लीत तिसर्या ‘रायसीना संवाद’ परिषदेचा शुभारंभ
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या भारत दौर्यादरम्यान नवी दिल्लीत तिसर्या ‘रायसीना संवाद’ या भू-राजनैतिक परिषदेला सुरुवात करण्यात आली आहे.
‘मॅनेजींग डिसरप्टीव्ह ट्रांझिशन्स: आयडियाज, इंस्टिट्यूशन अँड इडियम’ या संकल्पनेखाली ही परिषद भरविण्यात आली आहे. तीन दिवस चालणारी ही परिषद परराष्ट्र मंत्रालय आणि ऑब्जर्वर रिसर्च फाउंडेशन यांच्याद्वारा संयुक्त रूपात आयोजित केली गेली आहे.
‘रायसीना संवाद’ ही नवी दिल्लीत दरवर्षी आयोजित होणारी बहुपक्षीय परिषद आहे. 2016 सालापासून परिषदेचे आयोजन ऑब्जर्वर रिसर्च फाउंडेशन (स्वायत्त वैचारिक संस्था) करते. “रायसीना” हे नाव नवी दिल्लीमधील ‘रायसीना हिल’ ठिकाणावरून ठेवले गेले आहे, जे भारत सरकार तसेच राष्ट्रपती भवन, राष्ट्रपती भवन यांच्यासाठीचे घर आहे.
या वर्षी 4 प्रख्यात कलाकार आणि विद्वानांना ‘अकादमी रत्न’ शिष्यवृत्ती तर 43 कलाकारांना ‘अकादमी पुरस्कार’ दिला गेला आहे. (त्यामध्ये दोन पुरस्कार भागीदारीत आहेत)
‘संगीत नाटक अकादमी शिष्यवृत्ती आणि पुरस्कार (अकादमी रत्न आणि अकादमी पुरस्कार)’ हा 1953 साली स्थापित भारत सरकारच्या वतीने राष्ट्रीय संगीत, नृत्य आणि नाटक प्रबोधिनीकडून कलाकारांना देण्यात येणारा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान आहे.
लेसोथोमध्ये जगातला पाचवा सर्वात मोठा हिरा सापडला
आफ्रिकेच्या लेसोथो देशात एक असा हिरा सापडला आहे, जो जगात या गुणवत्तेचा पाचवा सर्वात मोठा हिरा आहे. जेम डायमंड या कंपनीने हा हिरा शोधला.
हिरा ‘डी’ रंग श्रेणीमधील 910 कॅरट वजनी हिरा आहे. ‘डी’ श्रेणी हिर्याचा अतिशुद्ध प्रकार असतो. हा संपूर्णता रंगहीन असतो. या हिर्याची किंमत साधारणतः $4 कोटी असण्याची शक्यता आहे. हा हिरा लेटसेंगच्या खाणीत मिळाला आहे.
पोलिस दलात उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल राष्ट्रपतींकडून जाहीर झालेल्या पोलिस पदकांचे राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते 16 जानेवारी रोजी वितरण झाले.

परिषदेत 90 देशांमधून आलेल्या 150 हून अधिक वक्ता आणि 550 प्रतिनिधींनी भाग घेतला आहे.
‘रायसीना संवाद’ ही नवी दिल्लीत दरवर्षी आयोजित होणारी बहुपक्षीय परिषद आहे. 2016 सालापासून परिषदेचे आयोजन ऑब्जर्वर रिसर्च फाउंडेशन (स्वायत्त वैचारिक संस्था) करते. “रायसीना” हे नाव नवी दिल्लीमधील ‘रायसीना हिल’ ठिकाणावरून ठेवले गेले आहे, जे भारत सरकार तसेच राष्ट्रपती भवन, राष्ट्रपती भवन यांच्यासाठीचे घर आहे.
वर्ष 2016 साठी ‘संगीत नाटक अकादमी शिष्यवृत्ती आणि पुरस्कारांचे वाटप
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते संगीतकार, नर्तक व रंगभूमी कलाकारांच्या एका विशेष समूहाला वर्ष 2016 साठी संगीत नाटक अकादमी शिष्यवृत्ती आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते संगीतकार, नर्तक व रंगभूमी कलाकारांच्या एका विशेष समूहाला वर्ष 2016 साठी संगीत नाटक अकादमी शिष्यवृत्ती आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे.
या वर्षी 4 प्रख्यात कलाकार आणि विद्वानांना ‘अकादमी रत्न’ शिष्यवृत्ती तर 43 कलाकारांना ‘अकादमी पुरस्कार’ दिला गेला आहे. (त्यामध्ये दोन पुरस्कार भागीदारीत आहेत)
संगीत (11), नृत्य (9), रंगभूमी (9), पारंपरिक/लोक/जनजाती संगीत/नृत्य/रंगभूमी आणि बाहुल्यांचा खेळ (10) या क्षेत्रात तसेच पप्पू वेणुगोपाल राव आणि अविनाश पशरिचा यांना प्रदर्शन कलेमध्ये त्यांच्या योगदानासाठी पुरस्कार प्रदान केले गेले. अरविंद पारिख, आर.वेड्डावली, रामगोपाल बजाज आणि सुनील कोठारी यांना अकादमी रत्न प्रदान केले गेले.
‘संगीत नाटक अकादमी शिष्यवृत्ती आणि पुरस्कार (अकादमी रत्न आणि अकादमी पुरस्कार)’ हा 1953 साली स्थापित भारत सरकारच्या वतीने राष्ट्रीय संगीत, नृत्य आणि नाटक प्रबोधिनीकडून कलाकारांना देण्यात येणारा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान आहे.
हा सन्मान प्रदर्शन कलाकार तसेच कला क्षेत्राशी जुडलेल्या शिक्षक आणि विद्वानांना दिले जाते. शिष्यवृत्ती म्हणून प्रत्येकी तीन लाख रुपये, अंग वस्त्र आणि एक ताम्रपत्र दिले जाते. पुरस्कार प्राप्त कलाकारांना प्रत्येकी एक लाख रुपये, अंग वस्त्र आणि ताम्रपत्र दिले जाते.