इथियोपियाचा सोलोमन डेकसिसा – मुंबई मॅरेथॉनचा विजेता
इथियोपियाचा लांब पल्ल्याचा धावक सोलोमन डेकसिसा याने १५ व्या ‘मुंबई मॅरेथॉन’ स्पर्धेत पुरुष गटात विजेतेपद पटकावले आहे.
एप्रिल २०१८ पर्यंत भारताचे स्वयंचलित महासागरी प्रदूषण निरीक्षण यंत्रणा कार्यान्वीत होणार
महासागरामधील प्रदूषणाची पातळी जाणून घेण्याकरिता आणि त्यावर लक्ष ठेवण्याकरिता ‘भारत राष्ट्रीय महासागर माहिती सेवा’ (INCOIS) एप्रिल २०१८ पर्यंत आपले स्वयंचलित सुविधा केंद्र कार्यान्वीत करणार आहे.
भारत राष्ट्रीय महासागर माहिती सेवा (INCOIS) ही भारतीय भूविज्ञान मंत्रालयांतर्गत कार्यरत स्वायत्त संस्था आहे. ESSO-INCOIS ची स्थापना १९९९ साली हैदराबाद येथे झाली. ही संस्था सागरी हवामान संदर्भात माहिती प्रदान करते आणि सल्लागार संस्था म्हणून देखील कार्य करते.
दिल्लीत कचर्यापासून कुतूबमिनारची प्रतिकृती उभारली
नवी दिल्लीत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ महिपालपुर उड्डाणपूलाच्या खाली धातूच्या कचर्यापासून जवळजवळ ३५ फुट उंचीची कुतूबमिनारची प्रतिकृती उभारण्यात आली आहे.
नगरच्या आर्ट ऑफ ब्यूटिफिकेशन योजनेंतर्गत ही प्रतिकृती तयार करण्यासाठी दक्षिण दिल्ली महानगरपालिकाने एकूण १.३ टन धातूच्या कचर्याचा वापर केला. याला १६ लक्ष रुपये खर्च आला.
अत्यंत पातळ, जवळजवळ अदृश्यच, जी अगदी तळहातावर चिपकवता येते, अश्या या टॅटूमध्ये संवेदक (sensors) आहेत, जे चुंबकीय क्षेत्राची उपस्थिती दर्शवू शकतात. हे संवेदक व्यक्तीला केवळ हाताच्या हावभाव वरूनच दैनंदिन वस्तूंना हाताळण्यास किंवा उपकरणे नियंत्रित करण्यास सक्षम करू शकणार.
जमैकाच्या मॉन्टेगो बे शहरात आणीबाणी घोषित
जमैकाच्या ‘मॉन्टेगो बे’ या बेट शहरामध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.
मॉन्टेगो बेमध्ये हत्याकांडांच्या वाढत्या प्रमाणामुळे नागरीकांना सुचना देण्यात आल्या आहेत. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरात अनेक वर्षांपासून हत्येचे प्रमाण वाढले आहे.
जमैका हा उत्तर अमेरिका उपखंडामधील ग्रेटर एंटीलिज वर स्थित एक बेट राष्ट्र आहे. कॅरेबियन समुद्रात स्थित २८ लक्ष लोकसंख्या असलेला उत्तर अमेरिकामधील अमेरिका आणि कॅनडा नंतर तिसरा सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. किंग्सटन हे देशाचे राजधानी शहर आणि जमैकन डॉलर देशाचे चलन आहे.

इथियोपियाच्याच अमाने गोबेना हिने महिला गटात विजेतेपद पटकावले. भारतीय पुरुष गटात गोपी थोनाकल आणि महिला गटात सुधा सिंह यांनी विजय प्राप्त केला.
इथियोपियाच्या २२ वर्षीय धावक डेकसिसाने २ तास ९ मिनट ३४ सेकंदात पूर्ण मॅरेथॉन पार केले. या गटात दुसर्या स्थानी इथियोपियाच्या सुमेत अकालनाव तर तिसर्या स्थानी केनियाचा जोशुआ किपकोरिर यांनी शर्यत पूर्ण केली.
पूर्ण मॅरेथॉनमध्ये महिला गटात दुसर्या व तिसर्या स्थानी अनुक्रमे केनियाची बोर्नेस किटुर आणि इथियोपियाची शुको गेनोमो या होत्या.
एप्रिल २०१८ पर्यंत भारताचे स्वयंचलित महासागरी प्रदूषण निरीक्षण यंत्रणा कार्यान्वीत होणार
महासागरामधील प्रदूषणाची पातळी जाणून घेण्याकरिता आणि त्यावर लक्ष ठेवण्याकरिता ‘भारत राष्ट्रीय महासागर माहिती सेवा’ (INCOIS) एप्रिल २०१८ पर्यंत आपले स्वयंचलित सुविधा केंद्र कार्यान्वीत करणार आहे.
अंदाजे १०० कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे भारत सरकारकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर या प्रकल्पाला कार्यान्वित केले जाईल. या प्रणाली अंतर्गत समुद्रातल्या पाण्याचे नमुने गोळा करून आणि नंतर त्यांचे विश्लेषण करून प्रदूषणाच्या पातळीचा अभ्यास करण्यात येणार.
भारत राष्ट्रीय महासागर माहिती सेवा (INCOIS) ही भारतीय भूविज्ञान मंत्रालयांतर्गत कार्यरत स्वायत्त संस्था आहे. ESSO-INCOIS ची स्थापना १९९९ साली हैदराबाद येथे झाली. ही संस्था सागरी हवामान संदर्भात माहिती प्रदान करते आणि सल्लागार संस्था म्हणून देखील कार्य करते.
दिल्लीत कचर्यापासून कुतूबमिनारची प्रतिकृती उभारली
नवी दिल्लीत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ महिपालपुर उड्डाणपूलाच्या खाली धातूच्या कचर्यापासून जवळजवळ ३५ फुट उंचीची कुतूबमिनारची प्रतिकृती उभारण्यात आली आहे.
नगरच्या आर्ट ऑफ ब्यूटिफिकेशन योजनेंतर्गत ही प्रतिकृती तयार करण्यासाठी दक्षिण दिल्ली महानगरपालिकाने एकूण १.३ टन धातूच्या कचर्याचा वापर केला. याला १६ लक्ष रुपये खर्च आला.
जर्मन शास्त्रज्ञांनी त्वचेवर गोंदविणारे अतिसूक्ष्म पातळ थराचे इलेक्ट्रॉनिक टॅटू विकसित केले
जर्मनीच्या हेलहॉल्ट्झ-जेन्ट्रम ड्रेस्डन-रॉसेनडॉर्फ (HZDR) संस्थेमधील शास्त्रज्ञांनी त्वचेवर गोंदविणारे अतिसूक्ष्म पातळ थराचे इलेक्ट्रॉनिक टॅटू विकसित केले आहे. हे टॅटू आभासी आणि भौतिक वस्तूंना केवळ हाताच्या संकेतांनी नियंत्रित करण्यास मदत करते.
जर्मनीच्या हेलहॉल्ट्झ-जेन्ट्रम ड्रेस्डन-रॉसेनडॉर्फ (HZDR) संस्थेमधील शास्त्रज्ञांनी त्वचेवर गोंदविणारे अतिसूक्ष्म पातळ थराचे इलेक्ट्रॉनिक टॅटू विकसित केले आहे. हे टॅटू आभासी आणि भौतिक वस्तूंना केवळ हाताच्या संकेतांनी नियंत्रित करण्यास मदत करते.
अत्यंत पातळ, जवळजवळ अदृश्यच, जी अगदी तळहातावर चिपकवता येते, अश्या या टॅटूमध्ये संवेदक (sensors) आहेत, जे चुंबकीय क्षेत्राची उपस्थिती दर्शवू शकतात. हे संवेदक व्यक्तीला केवळ हाताच्या हावभाव वरूनच दैनंदिन वस्तूंना हाताळण्यास किंवा उपकरणे नियंत्रित करण्यास सक्षम करू शकणार.
जमैकाच्या मॉन्टेगो बे शहरात आणीबाणी घोषित
जमैकाच्या ‘मॉन्टेगो बे’ या बेट शहरामध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.
मॉन्टेगो बेमध्ये हत्याकांडांच्या वाढत्या प्रमाणामुळे नागरीकांना सुचना देण्यात आल्या आहेत. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरात अनेक वर्षांपासून हत्येचे प्रमाण वाढले आहे.
२०१७ साली विक्रमी ३३५ जणांची हत्या झाली. जमैकामध्ये २०१५ साली दर १००००० लोकसंख्येमागे ४३ खून नोंदवले गेले होते, हे जगात सर्वाधिक होते.