चालू घडामोडी ३ फेब्रुवारी २०१८

चालू घडामोडी ३ फेब्रुवारी २०१८

१५ ऑगस्टपासून सुरू होणार ‘मोदीकेअर’ योजना
देशातील १० कोटी गरीब कुटुंबांना ५ लाखांचे आरोग्य विमा संरक्षण देणारी ‘मोदीकेअर’ ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना कॅशलेस असेल. 


१५ ऑगस्ट किंवा २ ऑक्टोबरपासून योजना सुरू होण्याची शक्यता आहे. यासाठी १० ते १२ हजार कोटी खर्च येईल.

या योजनेत कुटुंबनिहाय १००० ते १२०० रुपयांचा हप्ता सरकार भरेल. ४०% लोकसंख्येला लाभ होईल.

– सरकारी व निवडक खासगी रुग्णालयांत उपचारांची सुविधा.

– सर्व उपचार मोफत होतील, योजना पूर्णपणे कॅशलेस.
– सध्या २००० कोटींची तरतूद, गरज पडल्यास रक्कम वाढवणार.
– कुटुंबातील सदस्यांची मर्यादा नाही, सर्व रोगांवर उपचार.
– कालांतराने उर्वरित कुटुंबांनाही देणार योजनेचा लाभ .



सुदीप लखटकिया NSG चे नवे महानिदेशक
IPS अधिकारी सुदीप लखटकिया यांनी ‘राष्ट्रीय सुरक्षा गार्ड (NSG)’ च्या महानिदेशक पदाचा कारभार आपल्या हातात घेतला आहे.

NSG चे प्रमुख एस. पी. सिंह यांच्या सेवानिवृत्तीमुळे ही नियुक्ती केली गेली आहे. लखटकिया १९८४ सालचे तेलंगाना संवर्गातले IPS अधिकारी आहेत. या नियुक्तीपूर्वी ते केंद्रीय रिजर्व पोलीस दल (CRPF) मुख्यालयात विशेष महानिदेशक पदी कार्यरत होते.


भारत सरकारने दहशतवाद विरोधात जमिनीवरील संघर्षासाठी १९८४ साली राष्ट्रीय सुरक्षा गार्ड (NSG) ची निर्मिती केली. या दलाचे मुख्यालय हरियाणाच्या मानेसर येथे आहे. देशामध्ये पाच ठिकाणी याचे तळ आहेत.



विख्यात ओटनथुल्लाल कलावंत गीतानंदन यांचे निधन केरळचे विख्यात नर्तक कलामंडलम गीतानंदन यांचे नृत्य करतानाच हृदय झटक्याने निधन झाले आहे. ते ५८ वर्षांचे होते.

गीतानंदन ओटनथुल्लाल या नृत्य प्रकारचे गुरु मानले जात होते. त्यांनी देशविदेशात ५००० हून जास्तवेळा व्यासपीठावर आपल्या कलेचे प्रदर्शन केले होते. वर्ष २००० मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि वर्ष २०१० मध्ये कलामंडलम् पुरस्कार त्यांना प्राप्त झालीत. शिवाय त्यांनी ३० हून अधिक मल्याळम चित्रपटांमध्येही काम केले आहे.



शेष आनंद मधुकर यांना साहित्य अकादमीचा भाषा सन्मान
मगही भाषा आणि साहित्यामध्ये उल्लेखनीय योगदान दिल्या कारणाने वर्ष २०१६ साठीचा साहित्य अकादमीचा प्रतिष्ठित भाषा सन्मान शेष आनंद मधुकर यांना प्रदान केला गेला आहे.

बिहारमध्ये जन्मलेले शेष आनंद मधुकर यांनी ‘मगही’ भाषेच्या विकासासाठी व्यापक कार्य केलेले आहे. त्यांची मगही आणि हिंदी मधील पाचहून अधिक पुस्तके प्रकाशित झालीत.

साहित्य अकादमीचा प्रतिष्ठित भाषा सन्मान हा भारतीय भाषा आणि साहित्य लेखनात उल्लेखनीय योगदान देणार्‍या व्यक्तीला दिला जातो. 

स्मृतिचिन्ह आणि एक लाख रुपयांची रक्कम पुरस्कार स्वरुपात प्रदान केली जाते. वर्ष १९९६ मध्ये सुरू केलेल्या भाषा सन्मानाने आतापर्यंत ९६ लेखकांना गौरविण्यात आलेले आहे.


‘इंडिया ओपन’ मुष्टीयुद्ध स्पर्धेत मेरी कोमला सुवर्णपदक
भारताची विश्वविजेता महिला मुष्टीयोद्धा एम. सी. मेरी कोम हिने ‘इंडिया ओपन’ मुष्टीयुद्ध स्पर्धेत ४८ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात फिलिपींसच्या जोसी गॅबुकोचा पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे.

शिवाय, भारताच्या विलाओ बसुमतरी हिने ६४ किलो वजनी गटात थायलंडच्या सुदापोर्न सिसोन्दीचे पराभव करून सुवर्णपदक जिंकले. भारताच्या लोवलिना बोगरेहेन हिने वेल्टरवेट (६९ किलो) गटात सुवर्णपदक आणि एल. सरिता देवीने (६० किलो) रौप्यपद जिंकले.

पुरुषांमध्ये, संजीत (९१ किलो) याने उज्बेकिस्तानच्या संजर तुर्सुनोव्हच पराभव करत सुवर्ण जिंकले. शिवा थापा, स‍तीश कुमार आणि मनोज कुमार या दोघांनाही कांस्यपदकाची कमाई केली आहे



१७८ वर्षांनंतर ब्रिटिश संसद भवनाची दुरुस्ती
लंडन-ब्रिटनच्या १००२ वर्षांपूर्वीच्या संसद भवनाची दुरुस्तीसाठी ३० वर्षांपासून सुरू असलेल्या योजनेवर अखेर शिक्कामोर्तब झाले. 

पॅलेस ऑफ वेस्टमिंस्टरमध्ये संसदेचे कामकाज चालते. ही इमारत १०१६ मध्ये उभारण्यात आली. 

यापूर्वी १७८ वर्षांपूर्वी १८४० मध्ये या इमारतीची दुरुस्ती झाली होती. तेव्हा ३० वर्षे हे काम चालले. 

आता ही इमारत रिकामी करायला ३ वर्षे लागतील आणि दुरुस्तीसाठी ६ वर्षे. 

तसेच हे काम २०२० मध्ये सुरू करून २०२६ मध्ये पूर्ण करण्याची योजना असून तोवर संसद उत्तर आयर्लंडच्या विधानसभेत चालेल. 

या दुरुस्तीसाठी 32 हजार कोटी रुपये खर्च होतील.

पॅलेस ऑफ वेस्टमिंस्टर थेम्स नदीच्या किनाऱ्यावर असलेली ऐतिहासिक इमारत आहे. ही इमारत अनेक भागांत विभागलेली आहे. 

यातील एका भागात बिग बेन घड्याळही आहे. यापैकी एका भागात संसदेचे कामकाज चालते.

पॅलेस ऑफ वेस्टमिंस्टर युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट आहे.
Scroll to Top