चालु घडामोडी १० फेब्रुवारी २०१८

चालु घडामोडी १० फेब्रुवारी २०१८

स्वच्छ भारत अभियानांतर्गत ११ राज्ये व केंद्रशासित प्रदेश हागणदारीमुक्त घोषित
भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत आतापर्यंत ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना हागणदारी मुक्त (ODF) जाहीर करण्यात आले आहे.


या ११ मध्ये सिक्कीम, हिमाचल प्रदेश, केरळ, उत्तराखंड, हरियाणा, गुजरात, चंदीगड, दमण-दीव, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड आणि मेघालय यांचा समावेश आहे.

भारत सरकारकडून राष्ट्रव्यापी ‘स्‍वच्‍छ भारत’ अभियानाला ऑक्टोबर २०१४ पासून सुरुवात करण्यात आली. हे मोहीम पेयजल व स्‍वच्‍छता मंत्रालयांतर्गत राबवविले जात आहे. 

आतापर्यंत १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ३०० जिल्हे आणि ३ लक्ष गांवांना हागणदारी मुक्त घोषित करण्यात आले आहे.



खेलो इंडिया शालेय खेळांमध्ये ३८ सुवर्ण पदकांसह हरियाणा प्रथम
प्रथम ‘खेलो इंडिया शालेय’ खेळांमध्ये हरियाणा राज्यातील खेळाडूंनी ३८ सुवर्णपदकांसह एकूण १०२ पदके जिंकून पदकतालिकेत प्रथम स्थान पटकावले आहे.

हरियाणाने ३८ सुवर्ण, २६ रौप्य आणि ३८ कांस्य पदकांची कमाई केलेली आहे. त्यानंतर पदकतालिकेत महाराष्ट्राने १११ पदकांसह दुसर्‍या स्थानी तर दिल्लीने ९४ पदकांसह तिसरे स्थान पटकावले.

 महाराष्ट्राने ३६ सुवर्ण, ३२ रौप्य आणि ४२ कांस्य पदके जिंकलीत. 

एप्रिल २०१६ मध्ये भारत सरकारने देशात क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी ‘खेलो इंडिया’ ही नवीन योजना सुरू केली होती.

 समाजाच्या अगदी तळ पातळीवर बदल करून राष्ट्रव्यापी क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जानेवारी-फेब्रुवारी २०१८ मध्ये ‘खेलो इंडिया शालेय खेळ’ याच्या प्रथम संस्करणाचे आयोजन करण्यात आले. 

स्पर्धांमधून निवडण्यात येणार्‍या सर्वश्रेष्ठ प्रतिभावंत खेळाडूंना आठ वर्षापर्यंत दरवर्षी प्रत्येकी पाच लक्ष रुपये शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार, जी १००० उदयोन्मुख खेळाडूंसाठी निश्चित करण्यात आलेली आहे. वर्षागणीक खेळाडूंना ‘खेलो इंडिया’ अंतर्गत जोडण्यात येणार आहे.


सर्वाधिक उंचावर आइस हॉकी खेळण्याचा गिनीज विश्वविक्रम
जम्मू-काश्मीर राज्याच्या लदाख प्रदेशात स्पर्धा आयोजित करून सर्वाधिक उंचावर आइस हॉकी खेळण्याचा विश्वविक्रम करण्यात आला आहे. याची गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे.

समुद्रसपाटीपासून १४०५० फूट उंचीवर लदाखच्या चांगथांग क्षेत्रातील छिब्रा कारग्याम येथे दोन दिवसीय आइस हॉकी स्पर्धेला ८ फेब्रुवारी २०१८ रोजी सुरुवात झाली. कॅनडा, जर्मनी, रशिया, अमेरिका आणि भारत या पाच आंतरराष्ट्रीय संघांच्या समावेशासह सहा संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला.

लदाख विंटर स्पोर्ट्स क्लब (LWSC), हॉकी फाउंडेशन आणि ललोक विंटर स्पोर्ट्स असोसिएशन यांनी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे.



डिजिटल सुरक्षितता राखण्यासंबंधी विद्यार्थ्यांना शिकविण्यास गूगल आणि NCERT यांच्यात करार
गूगल आणि राष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) यांच्यात ‘डिजिटल सिटिजनशीप अँड सेफ्टी (डिजिटल नागरिकत्व आणि सुरक्षा)’ या विषयावर एक एकात्मिक अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी करार झाला आहे.

या अभ्यासक्रमामधून भारतातील १.४ दशलक्ष शाळांमध्ये दहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात येईल. कंपनीकडून हे प्रशिक्षण मोफत दिले जाणार आहे. 

NCERT कडून माहिती तंत्रज्ञान व संपर्क तंत्रज्ञान या विषयावर एक अभ्यासक्रम चालवला जातो. हा अभ्यासक्रम शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये समाविष्ट आहे.

राष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) ही भारत सरकारची एक स्वायत्त संस्था आहे, जी १ सप्टेंबर १९६१ रोजी साहित्य, वैज्ञानिक आणि धर्मादाय संस्था म्हणून स्थापन करण्यात आली. याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे.
Scroll to Top