चालू घडामोडी १३ फेब्रुवारी २०१८

चालू घडामोडी १३ फेब्रुवारी २०१८

विद्या कांबळे महाराष्ट्र लोक अदालत समितीचे सदस्य होणारी पहिली किन्नर
विद्या कांबळे या पहिल्या किन्नर न्यायाधीश आहेत, ज्यांची महाराष्ट्र लोक अदालत समितीत सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


२९ वर्षीय विद्या कांबळे या किन्नर (LGBT) समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करणार्‍या ‘सारथी’ संघटनेच्या त्या अध्यक्षा देखील आहेत.


नागपूर जिल्हा न्यायालयात भरलेल्या लोक अदालतच्या समितीत त्यांनी सदस्य म्हणून कारभार सांभाळला. लोक अदालत ला ‘कायदेशीर सेवा प्राधिकरण कायदा-१९८७ अन्वये वैधानिक दर्जा प्राप्त आहे.



शिवछत्रपती पुरस्कारांची घोषणा
राज्य शासनाच्या क्रीडा खात्याने गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती पुरस्काराची घोषणा केली आहे.

राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्कारांची घोषणा करतानाच तिन्ही वर्षातील पुरस्कारपात्र खेळाडूंना १७ फेब्रुवारीला गेट वे ऑफ इंडिया येथे राज्यपालांच्या हस्ते गौरविण्यात येईल, असेही सांगितले आहे.

क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देणार्‍या खेळाडू, संघटक आणि प्रशिक्षकांना दरवर्षी शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

अरुण दातार या पुणेकरांसह कोल्हापूरच्या बिभीषण पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.



बिहारमध्ये खुल्या सिगारेट विक्रीवर बंदी
बिहार राज्य शासनाकडून राज्यात खुल्या सिगारेट विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

आदेशानुसार, मात्र सिगारेटच्या संपूर्ण बंडलाच्या खरेदीवर याप्रकारचे कोणतेही निर्बंध नाहीत. सुट्या सिगारेट विक्रीपासून कमी वयातील व्यसनी मुलांना परावृत्त करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय जवळपास ८०% लोक खुली सिगारेट खरेदी करतात.

याआधी झारखंड, उत्तरप्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, सिक्किम, जम्मू-काश्मीर, राजस्थान, चंडीगड, मिजोरम आणि पंजाब या राज्यांनीही खुली सिगारेट विकण्यावर बंदी घातलेली आहे.


रोहन मोरे ‘ओशन सेव्हन चॅलेंज’ पूर्ण करणारा पहिला आशियाई 
पुणे (महाराष्ट्र) येथील जलतरणपटू रोहन मोरे याने ‘ओशन सेव्हन चॅलेंज’ पूर्ण केले आहे.

या यशासोबतच, रोहन मोरे हा ‘ओशन सेव्हन चॅलेंज’ पूर्ण करणारा पहिला भारतीय, पहिला आशियाई आणि जगातला नववा व्यक्ती तसेच सर्वात तरूण (३२ वर्षाचा) जलतरणपटू ठरला आहे.

‘ओशन सेव्हन चॅलेंज’ यामध्ये खुल्या पाण्यात जगातील दीर्घ-पल्ल्याच्या सात समुद्री खाडी पोहून पार करण्याचा कारनामा करावा लागतो. नॉर्थ चॅनल (३४ किमी), द कुक स्ट्रेट (२६ किमी), द मोलोकई चॅनल (४४ किमी), द इंग्लिश चॅनल (३४ किमी), द कॅटालिन चॅनल (३४ किमी), द सुगारू स्ट्रेट (२० किमी), स्ट्रेट ऑफ जिब्राल्टर (१४ किमी) आणि न्यूझीलंडमधील कुक स्ट्रेट (२२ किमी) यांना पार करावे लागते.



पाकिस्तानच्या सामाजिक कार्यकर्त्या आसमा जहांगीर यांचे निधन
पाकिस्तानमधील प्रसिद्ध महिला वकील आणि मानवाधिकार कार्यकर्त्या आसमा जहांगीर यांचे निधन झाले आहे. त्या ६६ वर्षांच्या होत्या.

आसमा जहांगीर या ‘जहांगीर ह्यूमन राईट्स ऑफ कमिशन’ च्या सहसंस्थापक होत्या. साल २०१०-१२ या काळात पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या बार मंडळाच्या त्या अध्यक्षा होत्या. 

वर्ष १९८७ ते वर्ष २०११ या काळात त्या पाकिस्तान मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षा होत्या.



दुबईतले हॉटेल गेवोरा जगातील सर्वात उंच हॉटेल
संयुक्त अरब अमिराती (UAE) ची राजधानी दुबईत जगातील सर्वाधिक उंच ‘हॉटेल गेवोरा’ १२ फेब्रुवारी २०१८ पासून ग्राहकांसाठी खुले झाले आहे.

‘हॉटेल गेवोरा’ मध्ये ७५ मजले आहेत. या हॉटेलची उंची ३५६ मीटर आहे. यापूर्वी जगातील सर्वाधिक उंच हॉटेल म्हणून दुबईतल्याच ‘हॉटेल JW मेरियट (३५५ मीटर)’ ची नोंद होती.

हॉटेलमध्ये ५२८ खोल्या, ४ रेस्टॉरंट, ओपन एअर पूल, ७१ व्या मजल्यावर लक्झरी स्पा, हेल्थ क्लब आहे. ‘बुर्ज खलिफा’ ही जगातील सर्वात उंच इमारत आहे.



मराठी अभियंत्याने पटकावला ‘ऑस्कर’ 
विकास साठ्ये यांना कॅमेरा तंत्र विकसित करण्यासाठी ऑस्कर सन्मानाने गौरविण्यात आले आहे

‘के१ शॉटओव्हर’ या कॅमे-याची निर्मिती करण्यात मोलाचा वाटा उचणारे साठ्ये यांना ९० व्या ऑस्कर अकॅडमी अवॉर्डच्या सायंटिफिक अँड टेक्निकल पुरस्काराने लॉस एंजेलिस येथे गौरविण्यात आले आहे.

अकॅडमी ऑफफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसच्या निवड समितीने साठ्ये यांच्यासोबत या कॅमे-यावर काम करणारे जॉन कॉयल, ब्रॅड हर्नडेल आणि शेन बकहॅम या तिघांचीही पुरस्कारासाठी निवड केली होती.
Scroll to Top