चालू घडामोडी १४ फेब्रुवारी २०१८

चालू घडामोडी १४ फेब्रुवारी २०१८

जगातील श्रीमंत शहरांच्या यादीत मुंबई १२ व्या स्थानी 
जगातील टॉप १५ श्रीमंत शहरांमध्ये देशाची आर्थिक राजधानी मुंबईचा समावेश झाला आहे. मुंबईची संपत्ती ९५० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली असून या यादीत अमेरिकेतील न्यूयॉर्क हे शहर अव्वल स्थानी आहे.


‘न्यू वर्ल्ड वेल्थ’ या संस्थेचा अहवाल प्रसिद्ध झाला असून यात जगातील श्रीमंत शहरं आणि अब्जाधीशांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

तसेच या यादीत मुंबई १२ व्या स्थानी आहे. तर न्यूयॉर्क पहिल्या स्थानी आहे.

न्यूयॉर्कची संपत्ती सुमारे तीन लाख कोटी डॉलरच्या घरात आहे. तर २.७ लाख कोटी डॉलरची संपत्ती असलेले लंडन दुसऱ्या स्थानी आहे. २.५ लाख कोटी डॉलरची संपत्ती असलेले टोकियो तिसऱ्या आणि २.३ लाख कोटी डॉलर्सची संपत्ती सॅन फ्रान्सिस्को चौथ्या स्थानी आहे. चीनमधील बिजिंग हे शहर २.२ लाख कोटी डॉलरसह पाचव्या स्थानी आहे.



जागतिक रेडियो दिवस १३ फेब्रुवारी
जगभरात दरवर्षी १३ फेब्रुवारी रोजी ‘जागतिक रेडियो दिवस’ पाळला जातो. यावर्षी हा दिवस ‘रेडियो अँड स्पोर्ट्स’ या विषयाखाली आयोजित केला गेला आहे.

१३ फेब्रुवारी १९४६ रोजी संयुक्त राष्ट्रसंघ रेडियो (रेडियो UNO) ला सुरुवात करण्यात आली. शिक्षणाचा प्रसार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सार्वजनिक चर्चेमध्ये रेडियोच्या भूमिकेला रेखांकित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) ने पहिल्यांदा १३ फेब्रुवारी २०१२ रोजी प्रथम ‘जागतिक रेडियो दिवस’ साजरा केला.



भारताची पहिली-वहिली ‘महामार्ग क्षमता पत्रिका’ प्रसिद्ध
केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्रालयाकडून ‘इंडो HCM’ या शीर्षकाखाली देशाची पहिली-वहिली ‘महामार्ग क्षमता पत्रिका’ प्रसिद्ध करण्यात आली आहे.

ही मार्गदर्शक पत्रिका CSIR-CRRI ने तयार केले आहे. ७ शैक्षणिक संस्थांच्या मदतीने CSIR-CRRI ने रस्ते (एक पदरी, दू-पदरी आणि बहु-पदरी), शहरी रस्ते आणि द्रुतगती मार्ग यावर रहदारी वैशिष्ठ्यांचे राष्ट्र पातळीवर सखोल अभ्यास केलेला आहे.

पत्रिकेत विविध प्रकारचे रस्ते आणि चौकांचा विस्तार करणे आणि संचालन करणे या संबंधित दिशानिर्देश दिले गेले आहेत. शिवाय रस्त्यांच्या बांधकामामध्ये अभियंता आणि धोरण निर्मात्यांना मार्गदर्शन प्रदान करणार.


टोलनाक्याच्या व्यवस्थेसाठी क्रमवारी देण्यासाठी NHAI चा उपक्रम सुरू
भारतीय राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने १० फेब्रुवारी २०१८ रोजी एक राष्ट्रव्‍यापी अभियान सुरू केले आहे, जेणेकरून महामार्गांचा वापर करणार्‍यांवर प्रतिकूल प्रभाव टाकणार्‍या मुद्द्यांना हाताळल्या जाऊ शकणार.

यामध्ये टोल देण्यासंबंधी सुलभता, इलेक्‍ट्रॉनिक टोल/फास्टेग लेन, टोल नाक्यावरची स्वच्छता, टोल नाक्यावर कार्यरत लोकांचा व्‍यवहार, मार्शलांची नियुक्ती, शौचालयांची साफसफाई, हायवे नेस्‍ट (मिनी) चे कार्यान्वयन, महामार्गांच्या किनारी सुविधा आणि महामार्गांवर कोणत्याही आणीबाणीच्या स्थितीवर रुग्णवाहिका आणि क्रेनची उपलब्‍धता हे मुद्दे सामील आहेत.

अभ्यासाअंती NHAI टोल नाक्यासाठी एक क्रमवारी प्रणाली सुरू करणार. प्रत्येक तिमाहीत, तीन सर्वोत्कृष्ट टोल नाक्यांची निवड केली जाणार आणि प्रसिद्ध केले जाणार.



ओमान-भारत यांच्यात झाले ८ करार 
पंतप्रधान मोदींनी सय्यद असद यांच्याशी आंतरराष्ट्रीय संबंध आणि सहकार्यावर चर्चा करून दोन्ही देशांत ऊर्जा, वाणिज्य, गुंतवणूक, पर्यटन यांसह ८ क्षेत्रांत करार झाले आहेत.

तसेच मोदी यांनी मस्कतमध्ये मोदींनी मोतीश्वर मंदिरात पूजा केली. हे मंदिर १२५ वर्षे जुने आहे.

तर ओमानमधील मंदिरात जाणारे मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरले आहेत.

१९९९ मध्ये गुजरातमधील व्यापारी समुदायाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता.
Scroll to Top