६ वी ‘CPA ची भारत क्षेत्र परिषद’ पटनामध्ये आयोजित
‘राष्ट्रकुल संसदीय संघटना (CPA) च्या भारत क्षेत्रा’ची सहावी परिषद बिहारच्या पटना शहरात आयोजित करण्यात आली आहे.
राष्ट्रकुल संसदीय संघटना (Commonwealth Parliamentary Association -CPA) याची स्थापना १९११ साली ‘एम्पायर पार्लीमेंटरी असोसिएशन’ म्हणून करण्यात आली. ही संघटना सुव्यवस्था, लोकशाही आणि मानवाधिकारांचे समर्थन करण्यासाठी कार्य करते. याचे मुख्यालय सचिवालय लंडनमध्ये आहे.
पुरातत्वशास्त्रज्ञ अरविंद जामखेडकर ICHR चे नवे अध्यक्ष
पुरातत्वशास्त्रज्ञ अरविंद पी. जामखेडकर हे भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषद (ICHR) चे पुढील अध्यक्ष असणार आहेत.
जामखेडकर हे प्रा. के. सुदर्शन राव यांच्या सेवानिवृत्तीनंतर पदाचा कार्यभार सांभाळतील. प्रा. जामखेडकर वर्तमानात पुणे (महाराष्ट्र) येथील डेक्कन महाविद्यालयाचे कुलगुरू आहेत.
भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषद (ICHR) हे मनुष्यबळ विकास मंत्रालयाची एक स्वायत्त संस्था आहे, जी तत्कालीन शिक्षण मंत्रालयाच्या प्रशासकीय आदेशाने १९७२ साली स्थापित केली गेली होती. याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे.
३६ वर्षीय रॉजर फेडरर सर्वाधिक वयाचा पहिल्या क्रमांकाचा टेनिसपटू
स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने वर्षाचा पहिला ग्रँड स्लॅम ‘ऑस्ट्रेलियन ओपन’ जिंकल्यानंतर ATP जागतिक क्रमवारीत क्रमांक १ चा खेळाडू बनला आहे.
हायलेमरीयम देसालेग पंतप्रधान पदावर २०१२ सालापासून होते. त्यांनी पंतप्रधान पदाचा आणि इथिओपियन पीपल्स रिव्होल्युशनरी डेमोक्रेटिक फ्रंट (EPRDF) युतीच्या प्रमुख पदाचा राजीनामा दिला.
ऑगस्ट २०१७ मध्ये इथिओपियाच्या नागरिकांनी सरकारविरोधी केलेल्या आंदोलनात शेकडो लोक मारले गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात राजकीय स्वातंत्र्यांची मागणी केल्याच्या घटनेनंतर १० महिन्यांची आणीबाणी तात्काळ जाहीर केली गेली. देशातील राजकीय अस्थिरतेमुळे देसालेग यांनी पंतप्रधान पद सोडले.
इथिओपिया हा ईशान्य आफ्रिकेमधील एक स्वतंत्र देश आहे. अदीस अबाबा हे देशाचे राजधानी शहर आहे. इथिओपियन बीर हे चलन आहे.
ग्रीनपीस शास्त्रज्ञांचा ‘अंटार्क्टिक महासागर अभयारण्य’ प्रस्ताव
ग्रीनपीस संस्थेच्या शास्त्रज्ञांनी ‘अंटार्क्टिक महासागर अभयारण्य’ तयार करण्यासाठी एक प्रस्ताव दिलेला आहे.
‘अंटार्क्टिक महासागर अभयारण्य’ साधारणतः १.८ दशलक्ष चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले असणार. हे पृथ्वीवरील सर्वात मोठे संरक्षित क्षेत्र ठरणार आणि औद्योगिक मासेमारीतून सागरी जीवनासाठी सुरक्षित आश्रयस्थान प्रदान करेल.
त्यासाठी, ‘आर्क्टिक सनराइझ’ या ग्रीनपीसच्या संशोधन जहाजावर कार्यरत शास्त्रज्ञ लागणारी माहिती गोळा करीत आहेत. अभयारण्याची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी हवामानातील बदल, प्रदूषण आणि मासेमारी यांचा मुळ वन्यजीवनावर होणारा प्रभाव यासाठी तीन महिन्यांसाठीचा अभ्यास चालू आहे.

१७-१९ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत ही परिषद चालणार आहे. परिषदेत ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, यूगांडा, कॅमरून या राष्ट्रांच्या प्रतिनिधींसह देशाच्या लोकसभा, राज्यसभा आणि प्रत्येक विधानसभा व विधान परिषद येथील प्रतिनिधींनी सहभाग घेतला आहे.
राष्ट्रकुल संसदीय संघटना (Commonwealth Parliamentary Association -CPA) याची स्थापना १९११ साली ‘एम्पायर पार्लीमेंटरी असोसिएशन’ म्हणून करण्यात आली. ही संघटना सुव्यवस्था, लोकशाही आणि मानवाधिकारांचे समर्थन करण्यासाठी कार्य करते. याचे मुख्यालय सचिवालय लंडनमध्ये आहे.
पुरातत्वशास्त्रज्ञ अरविंद जामखेडकर ICHR चे नवे अध्यक्ष
पुरातत्वशास्त्रज्ञ अरविंद पी. जामखेडकर हे भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषद (ICHR) चे पुढील अध्यक्ष असणार आहेत.
जामखेडकर हे प्रा. के. सुदर्शन राव यांच्या सेवानिवृत्तीनंतर पदाचा कार्यभार सांभाळतील. प्रा. जामखेडकर वर्तमानात पुणे (महाराष्ट्र) येथील डेक्कन महाविद्यालयाचे कुलगुरू आहेत.
भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषद (ICHR) हे मनुष्यबळ विकास मंत्रालयाची एक स्वायत्त संस्था आहे, जी तत्कालीन शिक्षण मंत्रालयाच्या प्रशासकीय आदेशाने १९७२ साली स्थापित केली गेली होती. याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे.
३६ वर्षीय रॉजर फेडरर सर्वाधिक वयाचा पहिल्या क्रमांकाचा टेनिसपटू
स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने वर्षाचा पहिला ग्रँड स्लॅम ‘ऑस्ट्रेलियन ओपन’ जिंकल्यानंतर ATP जागतिक क्रमवारीत क्रमांक १ चा खेळाडू बनला आहे.
यासोबतच, ३६ वर्षीय रॉजर फेडरर हा ATP जागतिक क्रमवारीत क्रमांक १ वर असणारा सर्वाधिक वयाचा टेनिसपटू ठरला आहे.
इथिओपियात ‘राष्ट्रीय आणीबाणी स्थिती’ जाहीर
इथिओपियाचे पंतप्रधान हायलेमरीयम देसालेग यांनी पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर इथिओपिया सरकारने देशात अनिर्णीत कालावधीसाठी ‘राष्ट्रीय आणीबाणी स्थिती’ची घोषणा केली आहे.
इथिओपियाचे पंतप्रधान हायलेमरीयम देसालेग यांनी पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर इथिओपिया सरकारने देशात अनिर्णीत कालावधीसाठी ‘राष्ट्रीय आणीबाणी स्थिती’ची घोषणा केली आहे.
हायलेमरीयम देसालेग पंतप्रधान पदावर २०१२ सालापासून होते. त्यांनी पंतप्रधान पदाचा आणि इथिओपियन पीपल्स रिव्होल्युशनरी डेमोक्रेटिक फ्रंट (EPRDF) युतीच्या प्रमुख पदाचा राजीनामा दिला.
ऑगस्ट २०१७ मध्ये इथिओपियाच्या नागरिकांनी सरकारविरोधी केलेल्या आंदोलनात शेकडो लोक मारले गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात राजकीय स्वातंत्र्यांची मागणी केल्याच्या घटनेनंतर १० महिन्यांची आणीबाणी तात्काळ जाहीर केली गेली. देशातील राजकीय अस्थिरतेमुळे देसालेग यांनी पंतप्रधान पद सोडले.
इथिओपिया हा ईशान्य आफ्रिकेमधील एक स्वतंत्र देश आहे. अदीस अबाबा हे देशाचे राजधानी शहर आहे. इथिओपियन बीर हे चलन आहे.
ग्रीनपीस शास्त्रज्ञांचा ‘अंटार्क्टिक महासागर अभयारण्य’ प्रस्ताव
ग्रीनपीस संस्थेच्या शास्त्रज्ञांनी ‘अंटार्क्टिक महासागर अभयारण्य’ तयार करण्यासाठी एक प्रस्ताव दिलेला आहे.
‘अंटार्क्टिक महासागर अभयारण्य’ साधारणतः १.८ दशलक्ष चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले असणार. हे पृथ्वीवरील सर्वात मोठे संरक्षित क्षेत्र ठरणार आणि औद्योगिक मासेमारीतून सागरी जीवनासाठी सुरक्षित आश्रयस्थान प्रदान करेल.
हे क्षेत्र असंख्य व्हेल, सील, पेंग्विन आणि अनेक प्रकारचे मासे आणि सागरी जीवन यांचे नैसर्गिक निवासस्थान आहे.