हिवाळी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा
मॅरिट बीजॉर्गेनने प्याँगचँग येथील हिवाळी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत अखेरच्या दिवशी सुवर्णपदकाची कमाईकरताना नॉर्वेला अव्वल स्थान पटकावून दिले.
रशियानेही नाटय़मयरीत्या पुरुष हॉकी संघाचे सुवर्ण जिंकले, परंतु उत्तेजक सेवनाच्या आरोपांमुळे समारोप समारंभात त्यांचा ध्वज फडकवण्यावर प्रतिबंध घालण्यात आला.
स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी तिने जिंकलेल्या सुवर्णपदकामुळे नॉर्वेने 14 सुवर्ण, 14 रौप्य आणि 11 कांस्य अशा एकूण 39 पदकांसह अव्वल स्थान पटकावले.
तसेच जर्मनीच्या खात्यातही 14 सुवर्णपदके होती, परंतु एकूण पदकसंख्या 31 राहिल्याने त्यांना दुसऱ्या स्थानावरसमाधान मानावे लागले. तर कॅनडा (11 सुवर्ण, 8 रौप्य व 10 कांस्य) 29 पदकांसह तिसऱ्या स्थानी राहिले.
अरुणा बी. रेड्डी – जिम्नॅस्टिक्स विश्वचषक स्पर्धेत वैयक्तिक पदक मिळविणारी प्रथम भारतीय
अरुणा बी. रेड्डी ही जिम्नॅस्टिक्स विश्वचषक स्पर्धेत वैयक्तिक पदक मिळविणारी प्रथम भारतीय ठरली आहे.
22 वर्षीय अरुणा रेड्डीने ऑस्ट्रेलियात मेलबर्न शहरात 13.649 गुण मिळवून कांस्यपदक जिंकले. या स्पर्धेचे सुवर्णपदक स्लोवानियाचे टिजासा किसेल्फ हिने 13.800 गुणांसह जिंकले तर रौप्यपदक ऑस्ट्रेलियाच्या एमिली व्हाइटहेडने जिंकले.
सर्व बँका 30 एप्रिलपर्यंत SWIFT शी CBS ला जोडणार
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने आतंरिक नियंत्रण बनविण्यासाठी सर्व बँकांना 30 एप्रिल 2018 पर्यंत आपल्या SWIFT (सोसायटी फॉर वर्ल्डवाइड इंटरबँक फायनॅनष्यल टेलीकम्युनीकेशन) प्रणालीला कोअर बँकिंग सोल्यूशन (CBS) सोबत जोडण्याचे निर्देश दिले.
सन 1973 मध्ये प्रस्तुत SWIFT (सोसायटी फॉर वर्ल्डवाइड इंटरबँक फायनॅनष्यल टेलीकम्युनीकेशन) प्रणाली एक नेटवर्क आहे, ज्याचा वापर जगभरातील बँक आणि वित्तीय सेवा प्रदान करणार्या अन्य संस्था करतात. सर्व बँकांकडे एक SWIFT कोड असतो आणि या कोडच्या माध्यमाने परदेशी व्यवहारांमधून पैसे हस्तांतरीत केले जातात.
भारतीय रिझर्व बँक (RBI) ही भारतातील केंद्रीय बँकिंग संस्था आहे, जी भारतीय रुपया चलनाचे आर्थिक धोरण नियंत्रित करते. भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या उपबंधानुसार ब्रिटिश राजवटीत संस्थेचे 1 एप्रिल 1935 पासून कार्य सुरू झाले.
कुंवर बाई या धमतरी विभागाच्या ग्रामपंचायत बरारीच्या आश्रित ग्राम कोटाभर्री च्या रहिवासी होत्या. त्यांनी 2015 साली स्वत:च्या बकर्या विकून घरामध्ये शौचालय बांधले होते. या कार्यामुळे राज्य शासनाने त्यांना स्वच्छतेसाठी राज्याचे ब्रॅंड अॅम्बेसडर घोषित केले होते.
भारताच्या NHRC ला UN कडून पुन्हा एकदा ‘ए’ मान्यता प्रमाणपत्र
राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC) ने सलग चौथ्यांदा संयुक्त राष्ट्रसंघाकडून प्राप्त ‘ए’ मान्यता प्रमाणपत्र मिळवले आहे.
हे प्रमाणपत्र जिनेव्हामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘ग्लोबल अलायंस ऑफ नॅशनल ह्यूमन राइट्स इंस्टिट्यूशन (GANHRI)’ कडून दिले जाते. हे प्रमाणपत्र पाच वर्षांसाठी दिले जाते. असे प्रमाणपत्र केवळ त्याच मानवाधिकार आयोगांना दिले जाते, जे संयुक्त राष्ट्रसंघाच्या पॅरिस सिद्धांतांचे पुर्णपणे पालन करतात.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC) ही एक स्वायत्त सार्वजनिक संस्था आहे, ज्याची स्थापना 28 सप्टेंबर 1993 रोजी प्रसिद्ध झालेल्या मानवाधिकार संरक्षण अध्यादेश अंतर्गत 12 ऑक्टोबर 1993 रोजी करण्यात आली.
ग्लोबल अलायंस ऑफ नॅशनल ह्यूमन राइट्स इंस्टिट्यूशन (GANHRI) (पूर्वीचे NHRI ची आंतरराष्ट्रीय समन्वय समिती (ICC) किंवा फक्त ICC) हे सभासद देशांमधील राष्ट्रीय मानवाधिकार संस्थांचे (NHRIs) एक वैश्विक जाळे आहे. हे एकमेव बिगर-UN मंडळ आहे, ज्याची आंतरिक मान्यता प्रणाली 1993 सालच्या पॅरीस सिद्धांतावर आधारित आहे.

मूळ भागभांडवलाची प्रत्येकी 100 समभागामध्ये विभागणी झालेली आहे, जे की सुरुवातीला खाजगी भागधारकांच्या पूर्णपणे मालकीचे होते. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर, RBI चे 1 जानेवारी 1949 रोजी राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
कुंवर बाई – स्वच्छ भारत अभियानाच्या 106 वर्षीय स्वच्छता दूताचे निधन
छत्तीसगडमधील स्वच्छ भारत अभियानाच्या स्वच्छता दूत बनलेल्या 106 वर्षीय कुंवर बाई यादव यांचे 23 फेब्रुवारीला निधन झाले.
छत्तीसगडमधील स्वच्छ भारत अभियानाच्या स्वच्छता दूत बनलेल्या 106 वर्षीय कुंवर बाई यादव यांचे 23 फेब्रुवारीला निधन झाले.
कुंवर बाई या धमतरी विभागाच्या ग्रामपंचायत बरारीच्या आश्रित ग्राम कोटाभर्री च्या रहिवासी होत्या. त्यांनी 2015 साली स्वत:च्या बकर्या विकून घरामध्ये शौचालय बांधले होते. या कार्यामुळे राज्य शासनाने त्यांना स्वच्छतेसाठी राज्याचे ब्रॅंड अॅम्बेसडर घोषित केले होते.
भारताच्या NHRC ला UN कडून पुन्हा एकदा ‘ए’ मान्यता प्रमाणपत्र
राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC) ने सलग चौथ्यांदा संयुक्त राष्ट्रसंघाकडून प्राप्त ‘ए’ मान्यता प्रमाणपत्र मिळवले आहे.
हे प्रमाणपत्र जिनेव्हामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘ग्लोबल अलायंस ऑफ नॅशनल ह्यूमन राइट्स इंस्टिट्यूशन (GANHRI)’ कडून दिले जाते. हे प्रमाणपत्र पाच वर्षांसाठी दिले जाते. असे प्रमाणपत्र केवळ त्याच मानवाधिकार आयोगांना दिले जाते, जे संयुक्त राष्ट्रसंघाच्या पॅरिस सिद्धांतांचे पुर्णपणे पालन करतात.
भारताला हे प्रमाणपत्र सर्वात आधी सन 1999 मध्ये मिळाले होते. त्यानंतर सन 2006 आणि सन 2011 मध्ये प्राप्त झाले.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC) ही एक स्वायत्त सार्वजनिक संस्था आहे, ज्याची स्थापना 28 सप्टेंबर 1993 रोजी प्रसिद्ध झालेल्या मानवाधिकार संरक्षण अध्यादेश अंतर्गत 12 ऑक्टोबर 1993 रोजी करण्यात आली.
याला मानवाधिकार संरक्षण अधिनियम-1993 मार्फत वैधानिक आधार दिला. NHRC मध्ये एक अध्यक्ष (भारताचे निवृत्त सरन्यायाधीश CJI), एक सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, एक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, अन्य दोन अनुभवी व्यक्ती आणि चारही राष्ट्रीय आयोग (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला आणि अल्पसंख्यांक) यांचे अध्यक्ष सदस्य म्हणून समाविष्ट आहेत.