कमल हसनव्दारे ‘मक्कल निधी मय्यम’ पक्षाची घोषणा
दाक्षिणात्य अभिनेता कमल हसनने तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश केला आहे. मदुराईच्या ओथाकडाई मैदानात आपल्या लाखो पाठीराख्यांच्या साक्षीने कमल हसनने आपल्या नवीन पक्षाची घोषणा केली.
कमल हसनच्या नवीन पक्षाचे नाव ‘मक्कल निधी मय्यम’ असे आहे. 21 फेब्रुवारीच्या सभेदरम्यान कमल हसनने आपल्या पक्षाच्या राजकीय चिन्हाक्गेही अनावरण केले. एका ताऱ्याभोवती सहा हातांनी केलेली गुंफण असे हसन यांच्या नवीन पक्षांचे चिन्ह असणार आहे.
महानदीच्या पाण्यावरून ओडिशा आणि छत्तीसगड या राज्यात वाद सुरू आहे.
आंतरराज्य नदी पाणी तंटा कायदा-1956 च्या तरतुदीनुसार, न्यायाधिकरणात एक अध्यक्ष तसेच भारताचे सर न्यायाधीशांनी, सर्वोच्च वा उच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांपैकी नियुक्त केलेल्या दोन इतर सदस्यांचा समावेश असेल. कायद्यानुसार, न्यायाधीकरणाने तीन वर्षात आपला अहवाल आणि निर्णय देणे आवश्यक आहे.
बिनोला खेड्यामध्ये 200 एकर परिसरात भारतीय संरक्षण विद्यापीठ उभारण्यासाठी अंदाजे 300 कोटी खर्चीले जात आहे. विद्यापीठात राष्ट्रीय संरक्षण अभ्यास, संरक्षण व्यवस्थापन, संरक्षण तंत्रज्ञान या विषयांमध्ये उच्च शिक्षण घेता येणार.
उत्तराखंडमध्ये बागोरी गंगा ग्राम प्रकल्पाचे उद्घाटन
बागोरीमध्ये नवा स्वजल प्रकल्प आणि उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्याच्या डूंडा गावात गंगोत्री स्वच्छ प्रतीक स्थळाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रकल्पांच्या माध्यमातून स्वच्छता सुनिश्चित करण्यासोबतच गंगातटी गावांमध्ये राहणार्या लोकांना पायाभूत सुविधा देखील मिळणार.
24 प्रायोगिक गंगा गावांमध्ये हागणदारी मुक्त बागोरीच समावेश आहे. यावर्षी याला ‘गंगा ग्राम’ मध्ये रूपांतरित करण्यासाठी निवडण्यात आले आहे. गावात पहिल्या टप्प्यात 11.88 लक्ष रुपयांच्या घन व द्रव कचरा व्यवस्थापन योजनेचे उद्घाटन केले गेले.

महानदी पाण्याचा प्रश्न तंटा न्यायाधीकरणाकडे सोपवण्यास मंजूरी
महानदीच्या पाणी वाटपावरून उद्भवलेल्या प्रश्नाचा तंटा सोडविण्यासाठी प्रकरण तंटा न्यायाधीकरणाकडे सोपवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
महानदीच्या पाण्यावरून ओडिशा आणि छत्तीसगड या राज्यात वाद सुरू आहे.
आंतरराज्य नदी पाणी तंटा कायदा-1956 च्या तरतुदीनुसार, न्यायाधिकरणात एक अध्यक्ष तसेच भारताचे सर न्यायाधीशांनी, सर्वोच्च वा उच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांपैकी नियुक्त केलेल्या दोन इतर सदस्यांचा समावेश असेल. कायद्यानुसार, न्यायाधीकरणाने तीन वर्षात आपला अहवाल आणि निर्णय देणे आवश्यक आहे.
गुरुग्राममध्ये ‘भारतीय संरक्षण विद्यापीठ’ उभारले जात आहे
हरियाणातल्या गुरुग्राम येथे ‘भारतीय संरक्षण विद्यापीठ’ उभारले जात आहे. हे भारताचे पहिले संरक्षण विद्यापीठ आहे.
बिनोला खेड्यामध्ये 200 एकर परिसरात भारतीय संरक्षण विद्यापीठ उभारण्यासाठी अंदाजे 300 कोटी खर्चीले जात आहे. विद्यापीठात राष्ट्रीय संरक्षण अभ्यास, संरक्षण व्यवस्थापन, संरक्षण तंत्रज्ञान या विषयांमध्ये उच्च शिक्षण घेता येणार.
उत्तराखंडमध्ये बागोरी गंगा ग्राम प्रकल्पाचे उद्घाटन
केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्री उमा भारती यांच्या हस्ते ‘बागोरी गंगा ग्राम’ प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे.