चालू घडामोडी २२ मार्च २०१८

चालू घडामोडी २२ मार्च २०१८

बिहारच्या राज्यपालांकडे ओडिशाचा अतिरिक्त कार्यभार
बि​हारचे राज्यपाल सत्य पाल मलिक यांच्याकडे ओडिशाच्या राज्यपाल पदाचा प्रभार सोपवण्यात आला आहे.


ओडिशाचे वर्तमान राज्यपाल एस. सी. जमीर यांचा कार्यकाळ २० मार्च २०१८ रोजी पूर्ण होत आहे. पदावर नवनियुक्ती होतपर्यंत हा कार्यभार मलिक यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.



झारखंडच्या देवघर जिल्ह्यात ‘प्लास्टिक पार्क’ उभारणार 
केंद्रीय रसायन व खते मंत्रालयाने झारखंडच्या देवघर जिल्ह्यात एक ‘प्‍लास्टिक पार्क’ स्‍थापन करण्याची परवानगी दिली आहे.

‘प्‍लास्टिक पार्क’ला १५० एकर क्षेत्रात १२० कोटी रुपयांच्या गुंतवणूकीसह उभारण्यात येणार. या ठिकाणी अनेक पॉलिमर उत्‍पादने, जसे विणलेली पिशवी, मॉल्‍डेड घरातले बैठकीचे समान, पाण्याची टाकी, बाटली, नळी, मच्‍छरदानी इ., तयार केली जाणार.

भारतामध्ये पॉलिमरची विक्री उपस्थित १०
 दशलक्ष मेट्रिक टनावरून वाढत २०२२ सालापर्यंत २० दशलक्ष मेट्रिक टनापर्यंत पोहचणार, असा अंदाज आहे.



भारताचे NCAA – जगातले पहिले प्रमाणित ‘विश्वसनीय डिजिटल भांडार’ 
संस्‍कृती मंत्रालयाचा राष्ट्रीय सांस्कृतिक दृक-श्राव्‍य अभिलेखागार (National Cultural Audiovisual Archives -NCAA) प्रकल्पाला जगातला पहिला विश्वसनीय डिजिटल भांडार याचे प्रमाणपत्र प्राप्‍त झाले आहे.

इंदिरा गांधी राष्‍ट्रीय कला केंद्र (IGNCA) कडून संचालित या प्रकल्पाला ब्रिटनच्या प्रायमरी ट्रस्‍टवर्दी डिजिटल रिपॉजिटरी ऑथरायझेशन बॉडी लिमिटेड (PTAB) या संस्थेकडून ISO 16363:2012 चे प्रमाणपत्र दिले गेले.

NCAA दृक-श्राव्‍य सामुग्रीच्या रूपात विद्यमान भारताच्या सांस्‍कृतिक वारसाची ओळख पटवणे आणि त्यास डिजिटल माध्‍यमातून सुरक्षित करणे या उद्देशाने आहे. देशभरातील २५ शहरांमध्ये केल्या जाणार्‍या सर्वेक्षणाच्या आधारावर पुढील ५ वर्षांमध्ये या भांडारात ३ लाख तासांची दृक-श्राव्‍य सामुग्री एकात्मिक केली जाणार. 

मार्च २०१८ पर्यंत ३०००० तासांच्या अप्रकाशित आणि बिगर-व्‍यवसायीकृत दृक-श्राव्‍य सामुग्रीला NCAA च्या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्‍ध करून दिले जाणार.

NCAA डिजिटल भांडाराची स्‍थापना डिजिटालय (DIGITALAYA) याच्या सहयोगाने केली गेली आहे, ज्याला सी-डेक, पुणे संस्थेनी विकसित केले आहे. याचे कार्यसंचालन ओपन आर्चिव्हल इंफॉरमेशन सिस्‍टम (OAIS) संदर्भ मॉडेल ISO 14721:2012 च्या दिशानिर्देशांतर्गत केले गेले आहे.

भारत सरकारच्या इंदिरा गांधी राष्‍ट्रीय कला केंद्र (IGNCA) याची स्‍थापना १९८५ साली करण्यात आली. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत ही एक स्वायत्त संस्था आहे. मानवी व सांस्‍कृतिक वारसा क्षेत्रात डेटा बँक बनविण्यासाठी ही एक केंद्रीय संस्था म्हणून कार्य करते. 

हे केंद्र UNESCO कडून मान्‍यता प्राप्त आहे. ही संस्था दक्षिण आणि दक्षिण-पूर्व आशियाई देशांमधील कला, सांस्‍कृतिक वारसा आणि जीवन पद्धती यासंदर्भात क्षेत्रीय डेटा बँक विकसित करीत आहे


२०१९ भारतीय विज्ञान परिषद भोपाळमध्ये आयोजित केली जाणार 
१०६ वी ‘भारतीय विज्ञान परिषद’ (2019 Indian Science Congress) जानेवारी २०१९ मध्ये बरकातुल्ला विद्यापीठ (भोपाळ, मध्यप्रदेश) येथे आयोजित केली जाणार आहे. “फ्यूचर इंडिया: सायन्स अँड टेक्नॉलजी” या विषयाखाली परिषद भरवली जाणार आहे.

२० मार्च २०१८ रोजी मणीपुरच्या इंफाळमध्ये भारतीय विज्ञान परिषदेच्या १०५ व्या सत्रात ‘७ वी महिला विज्ञान परिषद’ याच्या उद्घाटन प्रसंगी ही घोषणा करण्यात आली.

भारतीय विज्ञान परिषद मंडळ (ISCA) ही कोलकाता (पश्चिम बंगाल) येथे मुख्यालय असलेली भारतातली एक प्रमुख वैज्ञानिक संघटना आहे. याची १९१४ साली स्थापना करण्यात आली आणि ते दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भेटतात. 

यामध्ये ३०००० हून अधिक वैज्ञानिक सदस्य म्हणून आहेत. १५-१७ जानेवारी १९१४ या काळात ISCA ची पहिली बैठक एशियाटिक सोसायटी (कलकत्ता) येथील परिसरात झाली.



फ्रांसपासून स्वातंत्र्याच्या प्रस्तावावर न्यू कॅलेडोनिया मतदान करणार 
न्यू कॅलेडोनिया फ्रांसपासून स्वातंत्र्य मिळवण्याच्या प्रस्तावावर सार्वमत घेण्यासाठी निश्चित केलेल्या तारखेला मतदान आयोजित करणार आहे.

येथे बेकारीचा उच्च दर आहे तसेच शैक्षणिक अपयश, मद्य सेवन आणि युवा गुन्हे अश्या अनेक आव्हानांना हा प्रदेश तोंड देत आहे. या परिस्थितीला सुधारण्यासाठी स्वातंत्र्य देणे आवश्यक झाले आहे, जेणेकरून स्थिती सुधारणेच्या दृष्टीने स्वतंत्रपणे निर्णय घेण्यास व धोरणे तयार करण्यास मुभा मिळणार.

न्यू कॅलेडोनिया हे ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेकडे स्थित एक राज्य आहे. याची लोकसंख्या जवळपास २७५००० आहे आणि याची राजधानी नौमिया हे शहर आहे. फ्रेंच संसदेत न्यू कॅलेडोनियाचे दोन प्रतिनिधी आणि दोन मंत्री आहेत.
Scroll to Top