चालू घडामोडी २४ फेब्रुवारी २०१८

चालू घडामोडी २४ फेब्रुवारी २०१८

शासकीय योजनांसाठी आधार कार्ड बंधनकारक
शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘आधार’ बंधनकारक करण्यात येत आहे. त्यानंतर आता रेशन दुकानात मिळणाऱ्या स्वस्त धान्यासाठी यापुढे आधारकार्ड अनिवार्य केले जाणार आहे.


बायोमॅट्रिक शिधापत्रिकाधारकांनाच स्वस्तात धान्य देण्याच्या सरकारच्या निर्णयाविरुद्धची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने 23 फेब्रुवारी रोजी फेटाळून लावली. त्यामुळे 1 मार्चपासून आधारकार्डशिवाय स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून दिले जाणार नाही.

शिधापत्रिकाधारकांची चुकीची माहिती दिली गेल्याने 74 हजारांहून अधिक शिधापत्रिका असल्याचा आक्षेप नाशिकमधील सामाजिक कार्यकर्ते अझीझ पठाण यांनी घेतला.

सरकारच्या या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेमध्ये अन्नधान्य देताना बायोमॅट्रिकचा डाटा आधारकार्डच्या डाटासोबत पडताळणी करून दिला जाणार आहे.



एच-1बी व्हिसाचे नियम आणखी कडकअमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने H-1B व्हिसाचे नियम आणखी कडक केले आहेत. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने या व्हिसा धोरणांमध्ये केलेल्या नव्या बदलांचा सर्वाधिक परिणाम अमेरिकेत कामानिमित्त गेलेल्या लोकांवर होणार आहे. 

यामुळे भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील लोकांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे. एवढेच नाही तर बदललेल्या नियमांचा परिणाम त्या कर्मचाऱ्यांवरही होणार आहे जे एक किंवा एकापेक्षा अधिक अमेरिकन कंपन्यांसाठी काम करतात.

या धोरणांमधील बदलांनंतर कंपन्यांना हे देखील निश्चित करावे लागणार आहे की, त्यांचे H-1B व्हिसावरील कर्माचारी तिसऱ्या कंपनीसाठी काम करीत आहेत. जर कंपनीला कर्मचाऱ्यांची गरज आहे आणि जर अमेरिकेत त्यायोग्य कर्मचारी नसतील तेंव्हाच अमेरिकन कंपन्यासाठी H-1B व्हिसाच्या कार्यक्रमांतर्गत व्यावसायिकांना अमेरिका व्हिसा प्रदान करेन.

तसेच या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम भारतीय आयटी कंपन्या आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर होणार आहे. कारण भारतीय आयटी कंपन्या अनेक काळापासून H-1B व्हिसाचा लाभ घेत आहेत.



अमेरिकेच्या महिला संघाने आइस हॉकीत ऑलंपिक सुवर्ण जिंकलेअमेरिकेच्या महिला आइस हॉकी संघाने 9-25 फेब्रुवारी या काळात IOC च्या वतीने दक्षिण कोरियात प्योंगचांग येथे सुरू असलेल्या हिवाळी ऑलंपिक 2018 मध्ये आइस हॉकी स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले.

अमेरिकेच्या संघाने 20 वर्षांमध्ये प्रथमच महिला आइस हॉकी स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकलेले आहे. अंतिम लढतीत अमेरिकेने कॅनडाचा पराभव केला.

आंतरराष्ट्रीय ऑलंपिक समिती (IOC) हे जागतिक ऑलंपिक चळवळीचे सर्वोच्च प्राधिकरण आहे. स्वित्झर्लंडमधील लुसाने येथे याचे मुख्यालय आहे. IOC ची निर्मिती पिअरे डी कौर्बर्टिन यांनी 23 जून 1894 रोजी केली आणि डेमेट्रीओस विकेलस यांची प्रथम अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. याचे 105 सक्रिय सदस्य, 32 मानद सदस्य, 2 प्रतिष्ठित सदस्य (सेनेगल आणि अमेरिका) आहेत.

भारताकडे प्रथम आंतरराष्ट्रीय सौर युती परिषदेचे यजमानपदभारतात 11 मार्च 2018 रोजी आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) च्या प्रथम शिखर परिषदेचे आयोजन केले जाणार आहे. परिषद दिल्लीमध्ये भरणार.
या परिषदेत 121 प्रकल्पांना करारबद्ध करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत, जे दोन टप्प्यांत केले जाऊ शकते; म्हणजेच 11 मार्चला 50 तर 20 एप्रिलला अन्य 71 करार होण्याचे अपेक्षित आहे.

पॅरिस हवामान कराराच्या पार्श्वभूमीवर चालवला जाणारा आंतरराष्ट्रीय सौर युती (International Solar Alliance -ISA) हा सर्वसामन्यांना स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी भारत आणि फ्रान्स यांच्याकडून सुरू करण्यात आलेला एक जागतिक पुढाकार आहे. 

गुडगावमधील राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्थान (NISE, गवलपहारी) येथे ISA चे मुख्यालय आणि अंतरिम सचिवालय आहे. ही भारतातली पहिली आंतरराष्ट्रीय व आंतर-शासकीय संस्था आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्स राष्ट्राध्यक्ष फ्रँकोईस हॉलंड यांनी आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) ची स्थापना 30 नोव्हेंबर 2015 रोजी केली. 

ISA 121 सदस्य देशांमधील सौर ऊर्जा प्रकल्पांना उभारण्यासाठी समन्वय साधणारा उपक्रम आहे. आतापर्यंत 19 देशांनी याला स्वीकृती दिली आहे आणि 48 देशांनी ISA कार्यचौकट करारावर स्वाक्षर्‍या केल्या आहेत.



पृथ्वी-2 क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीभारताने देशी अण्वस्त्रवाहू ‘पृथ्वी-2’ क्षेपणास्त्राची ओडिशाच्या एका चाचणी केंद्रावरून यशस्वी चाचणी घेतली. यावेळी प्रथमच रात्रीच्या वेळी अशी चाचणी घेण्यात आली, जी अत्यंत महत्वाची आहे.

लघु-पल्ला श्रेणीतील ‘पृथ्वी-2’ क्षेपणास्त्र 350 किलोमीटरपर्यंत मारा करू शकते. हे भारतात विकसित व अंतर्भूत करण्यात आलेले देशी पृष्ठभागावरुन पृष्ठभागावर मारा करणारे पहिले क्षेपणास्त्र आहे. क्षेपणास्त्राचा एक मीटरचा व्यास आणि 8.56 मीटर लांब आहे. हे मानवरहित हवाई वाहनांसह चलित लक्ष्य भेदू शकते.

2003 साली DRDO ने ‘पृथ्वी-2’ क्षेपणास्त्र या सिंगल-स्टेज द्रव इंधनावर आधारित शस्त्राला विकसित केले.



बानदुंगमध्ये भारत-इंडोनेशिया संयुक्त लष्करी सराव सुरुभारत आणि इंडोनेशिया यांच्या ‘गरुडा शक्ती’ या वार्षिक संयुक्त लष्करी सरावाला इंडोनेशियाच्या बानदुंगमध्ये 19 फेब्रुवारीला सुरुवात झाली. 

पश्चिमेकडील जावा प्रांतात हा सहावा वार्षिक लष्करी सराव दोन आठवडे चालणार आहे. सरावादरम्यान दहशतवाद-विरोधी कारवायांमधील व लढाई योजनासंबंधी अनुभव सामायिक करणे आणि इतर विशेष कारवाया यांचा समावेश आहे.
Scroll to Top