मुंबईत उभारणार मराठी भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ
मराठी भाषेतील पहिले विद्यापीठ मुंबईतील वांद्रे येथे उभारण्यात येणार आहे. ‘ग्रंथाली’ने केलेल्या पाठपुराव्यानंतर मुंबई महापालिकेने वांद्रे बॅंडस्टॅंड येथील जागा या विद्यापीठासाठी देण्याचे मान्य केले आहे.
मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत विधानभवनात होणाऱ्या कार्यक्रमात त्या संदर्भातील अधिकृत पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘ग्रंथाली’च्या पदाधिकाऱ्यांना दिले जाणार आहे.
मराठी भाषेसाठीच्या स्वतंत्र विद्यापीठाची मागणी 80 वर्षांपासून होत होती. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरूनही ही मागणी सातत्याने होत होती; मात्र त्या दृष्टीने ठोस पावले उचलली गेली नव्हती.
आता लहान मुलांसाठी बालआधार कार्ड
आधारकार्ड हे प्रत्येक भारतीयासाठी अनिवार्य असे महत्त्वाचे कागदपत्र आहे. बँक खाते, आर्थिक व्यवहार आणि इतर अनेक महत्त्वाच्या व्यवहारांसाठी व्यक्तीकडे आधारकार्ड असणे आवश्यक असते. हे आधारकार्ड आता लहानग्यांसाठीही अनिवार्य असणार आहे.
5 वर्षांखालील मुलांकडे आधारकार्ड असावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून या मुलांना बालआधारकार्डदेण्यात येणार आहे. एरवी आधारकार्डसाठी बायोमेट्रीक माहिती आवश्यक असते पण बालआधारकार्डच्या बाबतीत त्याची आवश्यकता नसेल असे सांगण्यात आले आहे.
यूआयडीएआयने (UIDAI) आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ही माहिती दिली आहे. त्यानुसार 5 वर्षाखालील बालकांना निळ्या रंगाचे आधारकार्ड मिळेल असे सांगण्यात आले आहे. पण हे मूल जेव्हा वयाची 5 वर्षे पूर्ण करेल तेव्हा त्याने सामान्य आधारकार्डसाठी आवश्यक असणारी बायोमेट्रीक चाचणी करणे अनिवार्य आहे.
चंद्रावर पाण्याचे सर्वत्र अस्तित्व
चंद्रावरील पाणी कुठल्या एका भागापुरते मर्यादित नसून ते सर्व भागात आहे, असे मत भारताच्या चांद्रयान 1 बरोबर पाठवण्यात आलेल्या नासाच्या शोधक यानाने मिळवलेल्या माहितीच्या आधारे व्यक्त करण्यात आले आहे.
चंद्रावर दिवसरात्र पाणी उपलब्ध आहे, हे पाणी कुठून आले असावे व त्याचा वापर करणे कितपत शक्य आहे यावर विचार करावा लागेल असे त्यांचे म्हणणे आहे. जर चंद्रावर अजूनही भरपूर पाणी असेल व ते मिळवता येण्यासारखे असेल तर आगामी योजनांत त्याचे रूपांतर हायड्रोजन व ऑक्सिजनमध्ये करून श्वसनासाठी ऑक्सिजन मिळवणे शक्य आहे.
नेचर जिओसायन्स या नियतकालिकाने म्हटले आहे, की चंद्राचा पृष्ठभाग कसा आहे याच्याशी पाण्याच्या उपलब्धतेचा संबंध नाही. चंद्राच्या ध्रुवांवर मोठय़ा प्रमाणात पाणी आहे पाण्याचे संकेत तेथे मिळतात. काहींच्या पाण्याचे रेणू चंद्राच्या पृष्ठभागावरून शीत पट्टय़ात जाऊन उत्तर व दक्षिण ध्रुवावरील विवरात जातात.
अंदमान व निकोबार कमांड ‘मिलन 2018’ आयोजित करणार
मार्च 2018 मध्ये अंदमान व निकोबार कमांड ‘मिलन 2018’ या बहुराष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे.
6 मार्च ते 13 मार्च 2018 या काळात ‘फ्रेंडशिप अक्रॉस द सीज’ या विषयाखाली हा कार्यक्रम पोर्ट ब्लेअर येथे आयोजित केला जाणार आहे.
‘मिलन’ हा अंदमान व निकोबार बेटांवर भारतीय नौदलाकडून आयोजित केला जाणारा द्वैवार्षिक कार्यक्रम आहे, ज्यात सहभागी देशांचे तटीय नौदल एकत्र येतात. सन 1995 मध्ये प्रथम ‘मिलन’ मध्ये चार देशांचा सहभाग होता.
‘रुस्तम 2 (किंवा TAPAS-BH-201)’ हे एक मध्यम उंचीवर उडणारे दीर्घ-क्षमतेचे मानवरहित हवाई वाहन आहे. हे भारताने विकसित केले आहे. ‘रुस्तम 1’ ने त्याचे प्रथम उड्डाण सात वर्षांआधी 16 नोव्हेंबर 2009 रोजी घेतले होते.
मायकल मॅककॉरमेक – ऑस्ट्रेलियाचे नवे उपपंतप्रधान
ऑस्ट्रेलियाचे नवे उपपंतप्रधान म्हणून मायकल मॅककॉरमेक यांची निवड करण्यात आली आहे.
स्वताःच्या कार्यालयातील एका महिला कर्मचारीसोबत असलेल्या लैंगिक संबंधांवरुन शालिनतेला अशोभनीय वर्तन केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचे 50 वर्षीय उपपंतप्रधान बार्नबॉय जॉयस यांच्या राजीनाम्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
ऑस्ट्रेलिया हा ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रमंडळ दक्षिण गोलार्धाच्या खंडाच्या अंतर्गत एक देश आहे, जो जगातला सर्वात छोटा खंड आहे आणि जगातला सर्वात मोठा बेट देखील आहे, ज्यामध्ये तस्मानिया आणि कित्येक अन्य बेटे हिंद व प्रशांत महासागरात आहेत.
बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यपकडे ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे जेतेपद
भारतीय बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप याने ‘ऑस्ट्रेलियन ओपन इंटरनॅशनल चॅलेंज 2018’ स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे.
व्हिएन्नामध्ये खेळलेल्या पुरुष एकेरी गटात अंतिम लढतीत कश्यपने मलेशियाच्या जुन वेई चिएम याचा पराभव केला.
हिवाळी ऑलंपिक 2018 चा समारोप
9-25 फेब्रुवारी या काळात दक्षिण कोरियात प्योंगचांग येथे सुरू असलेल्या हिवाळी ऑलंपिक 2018 चे समारोप झाले.
आंतरराष्ट्रीय ऑलंपिक समिती (IOC) हे जागतिक ऑलंपिक चळवळीचे सर्वोच्च प्राधिकरण आहे. स्वित्झर्लंडमधील लुसाने येथे याचे मुख्यालय आहे. IOC ची निर्मिती पिअरे डी कौर्बर्टिन यांनी 23 जून 1894 रोजी केली आणि डेमेट्रीओस विकेलस यांची प्रथम अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. याचे 105 सक्रिय सदस्य, 32 मानद सदस्य, 2 प्रतिष्ठित सदस्य (सेनेगल आणि अमेरिका) आहेत.

ही प्रक्रिया मोफत होणार असून पालक आपल्या पाल्याला घराजवळच्या आधारकार्ड केंद्रात घेऊन जाऊ शकतात
चंद्रावर पाण्याचे सर्वत्र अस्तित्व
चंद्रावरील पाणी कुठल्या एका भागापुरते मर्यादित नसून ते सर्व भागात आहे, असे मत भारताच्या चांद्रयान 1 बरोबर पाठवण्यात आलेल्या नासाच्या शोधक यानाने मिळवलेल्या माहितीच्या आधारे व्यक्त करण्यात आले आहे.
चंद्रावर दिवसरात्र पाणी उपलब्ध आहे, हे पाणी कुठून आले असावे व त्याचा वापर करणे कितपत शक्य आहे यावर विचार करावा लागेल असे त्यांचे म्हणणे आहे. जर चंद्रावर अजूनही भरपूर पाणी असेल व ते मिळवता येण्यासारखे असेल तर आगामी योजनांत त्याचे रूपांतर हायड्रोजन व ऑक्सिजनमध्ये करून श्वसनासाठी ऑक्सिजन मिळवणे शक्य आहे.
चंद्रावर कुठल्याही वेळी कुठल्याही रेखांशावर पाणी उपलब्ध असल्याचे संकेत मिळतात असे अमेरिकेच्या स्पेस सायन्स इन्स्टिटय़ूटचे जोशुआ बँडफील्ड यांनी सांगितले.
नेचर जिओसायन्स या नियतकालिकाने म्हटले आहे, की चंद्राचा पृष्ठभाग कसा आहे याच्याशी पाण्याच्या उपलब्धतेचा संबंध नाही. चंद्राच्या ध्रुवांवर मोठय़ा प्रमाणात पाणी आहे पाण्याचे संकेत तेथे मिळतात. काहींच्या पाण्याचे रेणू चंद्राच्या पृष्ठभागावरून शीत पट्टय़ात जाऊन उत्तर व दक्षिण ध्रुवावरील विवरात जातात.
अंदमान व निकोबार कमांड ‘मिलन 2018’ आयोजित करणार
मार्च 2018 मध्ये अंदमान व निकोबार कमांड ‘मिलन 2018’ या बहुराष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे.
6 मार्च ते 13 मार्च 2018 या काळात ‘फ्रेंडशिप अक्रॉस द सीज’ या विषयाखाली हा कार्यक्रम पोर्ट ब्लेअर येथे आयोजित केला जाणार आहे.
‘मिलन’ हा अंदमान व निकोबार बेटांवर भारतीय नौदलाकडून आयोजित केला जाणारा द्वैवार्षिक कार्यक्रम आहे, ज्यात सहभागी देशांचे तटीय नौदल एकत्र येतात. सन 1995 मध्ये प्रथम ‘मिलन’ मध्ये चार देशांचा सहभाग होता.
मानवरहीत ‘रुस्तम 2’ चे चाचणी उड्डाण यशस्वी
संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) ने चित्रदुर्गमधील चलाकेर स्थित आपल्या चाचणी परिसरात 25 फेब्रुवारीला ‘रुस्तम 2’ चे यशस्वीरीत्या चाचणी उड्डाण पूर्ण केले. हे रुस्तमचे उच्च शक्तीच्या इंजनसह ‘यूजर कॉन्फिगरेशन’मध्ये प्रथम उड्डाण होते.
संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) ने चित्रदुर्गमधील चलाकेर स्थित आपल्या चाचणी परिसरात 25 फेब्रुवारीला ‘रुस्तम 2’ चे यशस्वीरीत्या चाचणी उड्डाण पूर्ण केले. हे रुस्तमचे उच्च शक्तीच्या इंजनसह ‘यूजर कॉन्फिगरेशन’मध्ये प्रथम उड्डाण होते.
‘रुस्तम 2 (किंवा TAPAS-BH-201)’ हे एक मध्यम उंचीवर उडणारे दीर्घ-क्षमतेचे मानवरहित हवाई वाहन आहे. हे भारताने विकसित केले आहे. ‘रुस्तम 1’ ने त्याचे प्रथम उड्डाण सात वर्षांआधी 16 नोव्हेंबर 2009 रोजी घेतले होते.
मायकल मॅककॉरमेक – ऑस्ट्रेलियाचे नवे उपपंतप्रधान
ऑस्ट्रेलियाचे नवे उपपंतप्रधान म्हणून मायकल मॅककॉरमेक यांची निवड करण्यात आली आहे.
स्वताःच्या कार्यालयातील एका महिला कर्मचारीसोबत असलेल्या लैंगिक संबंधांवरुन शालिनतेला अशोभनीय वर्तन केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचे 50 वर्षीय उपपंतप्रधान बार्नबॉय जॉयस यांच्या राजीनाम्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
ऑस्ट्रेलिया हा ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रमंडळ दक्षिण गोलार्धाच्या खंडाच्या अंतर्गत एक देश आहे, जो जगातला सर्वात छोटा खंड आहे आणि जगातला सर्वात मोठा बेट देखील आहे, ज्यामध्ये तस्मानिया आणि कित्येक अन्य बेटे हिंद व प्रशांत महासागरात आहेत.
ऑस्ट्रेलिया हा एकमेव असा प्रदेश आहे, जो एक खंड, एक राष्ट्र आणि एक बेट आहे. कॅनबेरा हे राजधानी शहर आहे आणि ऑस्ट्रेलियन डॉलर हे चलन आहे.