राज्यातील पहिले सोलर पार्क धुळ्यात
राज्यातील तूट भरून काढण्यासाठी दोंडाईचा-विखरण परिसरात सौरऊर्जेवर आधारित ५०० मेगावॉट वीजनिर्मिती प्रकल्प प्रस्तावित आहे. पैकी पहिल्या टप्प्यात २५० मेगावॉट सौर वीजनिर्मिती प्रकल्पाला म्हणजेच सोलर पार्कला सरकारने मान्यता दिली आहे.
तसेच त्या अनुषंगाने ‘महाजनको’ने नियोजन सुरू केले आहे. यात जे शेतकरी किंवा इतरांना जमिनी द्यायच्या नाहीत, त्यांना वगळून या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचे ‘महाजनको’ स्तरावर विचाराधीन आहे.
दलित साहित्य आणि दलित चळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या पानतावणे यांनी लोकसाहित्य, कविता, नाटक, समीक्षा आणि संशोधनपर लेखन केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार, दलित साहित्य अकादमी, फाय फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची गौरववृत्ती आदी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
२००९ मध्ये अमेरिकेत झालेल्या पहिल्या मराठी विश्व साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. डॉ. पानतावणे यांच्याकडे स्वच्छपणे समजलेला आंबेडकरी ध्येयवाद होता व साहित्य म्हणजे काय याची त्यांना तेवढीच जाणीवही होती.
जागतिक रंगभूमी दिन : मार्च २७
२७ मार्च २०१८ रोजी जगभरात जागतिक रंगभूमी दिन पाळला गेला आहे.
UNESCO आणि नॅशनल थिएटर इंस्टीट्यूट (ITI) यांच्या नेतृत्वात विविध कार्यक्रमाचे आयोजन करणात आले. कार्यक्रमाचे आयोजन पॅरिसमधील UNESCO सभागृहात करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय रंगभूमी दिनाची स्थापना १९६१ साली फ्रांसच्या पॅरिस स्थित नॅशनल थियेटर इंस्टीट्यूट (ITI) द्वारे केली गेली होती. १९६२ सालापासून दरवर्षी २७ मार्चला जगभरात ITI च्या विविध केंद्रांवर तसेच संबंधित अनेक संस्था आणि गटांकडून रंगभूमी दिन साजरा केला जातो.
या करारामार्फत ISA ला अधिकृत विशिष्टता प्राप्त झाली आहे आणि परिणामी त्यास करार करणे, जंगम व स्थावर मालमत्तांचे अधिग्रहण आणि निपटारा आणि कायदेशीर कारवाईला संस्थात्मक स्वरूप प्रदान करणे आणि संरक्षण करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे.
मिळालेल्या विशेषाधिकारामधून ISA मुख्यालयाद्वारे त्यांची कार्यक्रमे सोबतच विविध जबाबदार्या स्वतंत्रपणे पार पाडता येणार. ISA ला आपला दर्जा, विशेषाधिकार आणि संरक्षण कार्यचौकट करारामधील परिच्छेद १० अंतर्गत प्राप्त होणार.
पॅरिस हवामान कराराच्या पार्श्वभूमीवर चालवला जाणारा आंतरराष्ट्रीय सौर युती (International Solar Alliance -ISA) हा सर्वसामन्यांना स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी भारत आणि फ्रांस यांच्याकडून सुरू करण्यात आलेला एक जागतिक पुढाकार आहे.
सेबॅस्टियन वेट्टेल ऑस्ट्रेलियन फॉर्म्युला वन ग्रँड प्रिक्स शर्यतीचा विजेता
फेरारी संघाचा चालक सेबस्टियन वेट्टेल ह्याने मेलबर्नमध्ये आयोजित ‘२०१८ ऑस्ट्रेलियन फॉर्म्युला वन ग्रँड प्रिक्स’ शर्यत जिंकली. वेट्टेलचा त्याच्या कारकिर्दीतल्या २०० व्या ग्रँड प्रिक्समधील हा ४८ वा विजय होता.
शर्यतीत वेट्टेलने मर्सिडीज संघाच्या लुईस हॅमिल्टनला मागे टाकत पहिले स्थान प्राप्त केले. तिसर्या स्थानी फेरारी संघाच्या किमी राईक्कोनेन ह्याने शर्यत पूर्ण केली. सेबस्टियन वेट्टेल २०१८ साली चेकर झेंड्यापर्यंत पोहचणारा पहिला व्यक्ती ठरला.
मलेशियात आता खोट्या बातमी प्रकरणात १० वर्षे तुरुंगवास घडणार
मलेशिया सरकारने खोट्या बातमीला बेकायदेशीर ठरविण्यासाठी संसदेत ‘अॅंटी-फेक न्यूज विधेयक-२०१८’ सादर केला आहे. या विधेयकानुसार मलेशियात खोटी बातमी छापल्यास १० वर्षांचा कारावास दिला जाऊ शकतो.
शिक्षेच्या तरतुदीनुसार कायद्याचे उल्लंघन झाल्यास १० वर्षांचा कारावास आणि ५ लक्ष रिंगिट (मलेशियाचे चलन) म्हणजेच USD 1,28,140 एवढा दंड दिला जाऊ शकतो.
विधेयकानुसार बातमी, सूचना, माहिती किंवा अहवाल, जो पुर्णपणे किंवा अंशताः, खोटे असल्यास त्याला खोटी बातमी असे गृहीत धरण्यात येणार, अशी व्याख्या आहे. यामध्ये फिचर, व्हिज्युअल आणि ऑडियो रेकॉर्डिंग यांचा समावेश आहे. या कायद्यांतर्गत डिजिटल प्रकाशन आणि सामाजिक माध्यमे यांचा देखील समावेश आहे.
मलेशिया हा आग्नेय (दक्षिण पूर्व) आशियामधील एक देश आहे. मलेशियाची राजधानी क्वालालंपूर असून पुत्रजय येथे संघराज्य शासनाचे मुख्य केंद्र आहे. रिंगिट हे देशाचे चलन आहे. देशात मलाय भाषा बोलली जाते.

डॉ. गंगाधर पानतावणे यांचे निधन
ज्येष्ठ साहित्यिक, अस्मितादर्श चळवळीचे जनक आणि पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गंगाधर पानतावणे यांच २७ मार्च रोजी पहाटे निधन झाले. केंद्र सरकारने पद्मश्री या पुरस्काराने त्यांचा गौरव केला होता. ते ८१ वर्षांचे होते.

पानतावणे यांचे वाचनही चौफेर होते. धर्म-जाती-देश-निरपेक्ष अशा ‘साहित्यिक’ या भूमिकेवरच ते प्रेम करत आल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. केंद्र सरकारने नुकतेच त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.
जागतिक रंगभूमी दिन : मार्च २७
२७ मार्च २०१८ रोजी जगभरात जागतिक रंगभूमी दिन पाळला गेला आहे.
UNESCO आणि नॅशनल थिएटर इंस्टीट्यूट (ITI) यांच्या नेतृत्वात विविध कार्यक्रमाचे आयोजन करणात आले. कार्यक्रमाचे आयोजन पॅरिसमधील UNESCO सभागृहात करण्यात आले.
यावर्षी ५ वेगवेगळ्या UNESCO खंडातील (आफ्रिका, अमेरिका, अरब प्रदेश, आशिया-प्रशांत आणि युरोप) प्रत्येकी एक याप्रमाणे पाच लेखकांनी आंतरराष्ट्रीय रंगभूमी संदेश दिला.
आंतरराष्ट्रीय रंगभूमी दिनाची स्थापना १९६१ साली फ्रांसच्या पॅरिस स्थित नॅशनल थियेटर इंस्टीट्यूट (ITI) द्वारे केली गेली होती. १९६२ सालापासून दरवर्षी २७ मार्चला जगभरात ITI च्या विविध केंद्रांवर तसेच संबंधित अनेक संस्था आणि गटांकडून रंगभूमी दिन साजरा केला जातो.
१९६२ साली पहिला आंतरराष्ट्रीय रंगभूमी संदेश फ्रांसच्या जीन काक्टे यांनी दिला होता. २००२ साली हा संदेश भारताचे प्रसिद्ध रंगकर्मी गिरीश कर्नाड यांनी दिला होता.
संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) ही फ्रांसची राजधानी पॅरिस शहरात स्थित संयुक्त राष्ट्रसंघाची शिक्षण, नैसर्गिक विज्ञान, सामाजिक/मानवशास्त्र, सांस्कृतिक आणि संचार/माहिती या पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्य करणारी एक विशेष संघटना आहे.
या संघटनेची स्थापना १६ नोव्हेंबर १९४५ रोजी लंडन (ब्रिटन) येथे करण्यात आली. UNESCO मध्ये १९५ सदस्य राज्ये/राष्ट्रे आहेत आणि १० सहकारी सदस्य आहेत.
ISA आणि भारत सरकार यांच्यात ‘यजमान देश करार’ झाला
आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) आणि भारत सरकारचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय यांनी नवी दिल्लीत ‘यजमान देश करार’ (Host Country Agreement) यावर स्वाक्षर्या केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) आणि भारत सरकारचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय यांनी नवी दिल्लीत ‘यजमान देश करार’ (Host Country Agreement) यावर स्वाक्षर्या केल्या आहेत.
या करारामार्फत ISA ला अधिकृत विशिष्टता प्राप्त झाली आहे आणि परिणामी त्यास करार करणे, जंगम व स्थावर मालमत्तांचे अधिग्रहण आणि निपटारा आणि कायदेशीर कारवाईला संस्थात्मक स्वरूप प्रदान करणे आणि संरक्षण करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे.
मिळालेल्या विशेषाधिकारामधून ISA मुख्यालयाद्वारे त्यांची कार्यक्रमे सोबतच विविध जबाबदार्या स्वतंत्रपणे पार पाडता येणार. ISA ला आपला दर्जा, विशेषाधिकार आणि संरक्षण कार्यचौकट करारामधील परिच्छेद १० अंतर्गत प्राप्त होणार.
पॅरिस हवामान कराराच्या पार्श्वभूमीवर चालवला जाणारा आंतरराष्ट्रीय सौर युती (International Solar Alliance -ISA) हा सर्वसामन्यांना स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी भारत आणि फ्रांस यांच्याकडून सुरू करण्यात आलेला एक जागतिक पुढाकार आहे.
गुडगावमधील राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्थान (NISE, गवलपहारी) येथे ISA चे मुख्यालय आणि अंतरिम सचिवालय आहे. ही भारतातली पहिली आंतरराष्ट्रीय व आंतर-शासकीय संस्था आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रांस राष्ट्राध्यक्ष फ्रँकोईस हॉलंड यांनी आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) ची स्थापना ३० नोव्हेंबर २०१५ रोजी केली.
ISA १२१ सदस्य देशांमधील सौर ऊर्जा प्रकल्पांना उभारण्यासाठी समन्वय साधणारा उपक्रम आहे. आतापर्यंत १९ देशांनी याला स्वीकृती दिली आहे आणि ४८ देशांनी ISA कार्यचौकट करारावर स्वाक्षर्या केल्या आहेत.