चालू घडामोडी २९ मार्च २०१८

चालू घडामोडी २९ मार्च २०१८

आरोग्य सुरक्षा कायद्याचा मसुदा जाहीर 
वैयक्तिक माहितीच्या संरक्षणावरून केंद्र सरकारवर टीका होत असतानाच सरकारने हळुवारपणे संकेतस्थळावर आरोग्यविषयक माहितीच्या संरक्षणाच्या कायद्याचा मसुदा टाकला असून त्यामध्ये पाच वर्षांचा कारावास आणि पाच लाख रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.


द ड्राफ्ट डिजिटल इन्फॉर्मेशन इन हेल्थकेअर अ‍ॅक्ट (दिशा) मध्ये म्हटले आहे की, शारीरिक आणि मानसिक आरोग्य स्थितीबाबतची कोणतीही माहिती, वैद्यकीय नोंदी ही संबंधित व्यक्तीची खासगी मालमत्ता आहे.



राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्य आणि विशिष्ट सेवा पदकांचे वितरण 
राष्‍ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते नवी दिल्लीत आयोजित एका समारंभात सशस्‍त्र दलाच्या सैनिक कर्मचार्‍यांना ३ किर्ती चक्र आणि १७ शौर्य चक्र पुरस्‍कार प्रदान करण्यात आले आहे. त्यामध्ये १ किर्ती चक्र व ५ शौर्य चक्र पुरस्‍कार मरणोत्तर दिले गेले आहेत.

शिवाय सैन्‍य दलांच्या वरिष्‍ठ अधिकार्‍यांना त्यांच्या विशिष्‍ट सेवांसाठी १४ परम विशिष्‍ट सेवा पदक, १ उत्‍तम युद्ध सेवा पदक आणि २२ अती विशिष्‍ट सेवा पदक पुरस्‍कार दिले गेलेत.

किर्ती चक्र प्राप्तकर्ते :-

मेजर डेव्हिड मनलून (मरणोत्तर)
चेतन कुमार चीता
मेजर विजयंत बिस्त

उत्तम युध्द सेवा पदक :- लेफ्टनंट जनरल अजाए कुमार शर्मा

किर्ती चक्र आणि शौर्य चक्र (१९५२ सालापासून) हे लष्कराच्या कर्मचार्‍यांना शांती काळात दाखविलेल्या शौर्यासाठी दिले जाणारे राष्ट्रीय पदक आहेत. महावीर चक्र नंतर किर्ती चक्र आणि शौर्य चक्र हे अनुक्रमे दुसर्‍या आणि तिसर्‍या श्रेणीत मोडणारे सन्मान आहेत.


न्यायमूर्ती जवाद रहीम NGT चे कार्यकारी अध्यक्ष 
सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती जवाद रहिम यांची राष्ट्रीय हरित प्राधिकरण (NGT) च्या कार्यकारी अध्यक्ष (acting chairman) पदी नियुक्ती केली आहे.

कर्नाटक उच्च न्यायालयाचे माजी न्या. जवाद रहीम यांनी डिसेंबर २०१७ मध्ये सेवा निवृत्त झालेल्या न्या. स्वातंतर कुमार यांच्या जागेवर पदभार सांभाळतील.

राष्ट्रीय हरित प्राधिकरण (NGT) हे राष्ट्रीय हरित प्राधिकरण अधिनियम-२०१० अंतर्गत स्थापन करण्यात आले आहे. 

पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन या संबंधित कोणत्याही कायदेशीर अधिकाराच्या अंमलबजावणीसह इतर नैसर्गिक स्रोतांच्या संरक्षणाशी संबंधित प्रकरणांची प्रभावीपणे आणि वेगाने विल्हेवाट लावण्यासाह पर्यावरणविषयक वाद हाताळण्यासाठी आवश्यक कौशल्य असलेले हे एक विशेष मंडळ आहे.



भारत-जपान दरम्यान ‘कूल EMS’ सेवेला सुरूवात 
भारत सरकारच्या दळणवळण मंत्रालयाने ‘कूल EMS सेवा’ याचा शुभारंभ केला आणि ही सेवा २९ मार्च २०१८ पासून वापरात आणली जाणार आहे.

‘कूल EMS सेवा’ जपान आणि भारत यांच्या दरम्यान एकमात्र अशी सेवा आहे, जी भारतात ग्राहकांच्या वैयक्तिक उपयोगासाठी जपानी अन्नपदार्थांची आयात करणार आणि भारतीय नियमांतर्गत त्यांची परवानगी देण्यात आली आहे. 

एक्सप्रेस मेल सेवा (EMS) याच्या ट्रॅक आणि ट्रेस सारख्या अन्य सर्व सुविधा देखील कूल EMS सेवेसाठी उपलब्ध असणार.

प्रारंभी कूल EMS सेवा केवळ दिल्लीत उपलब्ध होणार आहे. अन्नपदार्थांना जपानच्या टपाल विभागाद्वारे विशेष रूपाने तयार केलेल्या थंड डब्ब्यांमधून आणले जाणार, ज्यामध्ये अन्नपदार्थांची गुणवत्ता कायम राखण्यासाठी रेफ्रिजरेंट असतात. 

या डब्ब्यांना विदेश डाकघर (कोटला रोड, नवी दिल्ली) येथे आणले जाणार, जेथून निश्चित कालमर्यादेत एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून ग्राहकाकडे पाठविले जाणार.



अबिये अहमद: इथिओपियाचे नवे पंतप्रधान 
इथिओपियाचे नवे पंतप्रधान म्हणून अबिये अहमद यांची निवड करण्यात आली आहे.

या नियुक्ती बरोबरच अबिये अहमद दुसरे सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या आफ्रिकेतील इथिओपियाचे पंतप्रधान ठरले आहेत. हायलेमरियम देसलेग्न यांनी फेब्रुवारी २०१८ मध्ये पंतप्रधान पद सोडले होते.

इथिओपिया हा आफ्रिकेचे शिंग (Horn of Africa) स्थित एक भूपरिवेष्टित देश आहे. याची राजधानी अदीस अबाबा आहे आणि देशाचे चलन बिर्र हे आहे. देशाची अधिकृत राष्ट्रीय भाषा अम्हारिक ही आहे.
Scroll to Top