तामिळनाडूमध्ये भारतातले पहिले कीटक संग्रहालय उघडले
तामिळनाडू कृषी विद्यापीठ (TNU) येथे अत्याधुनिक सुविधांसह ‘किटक संग्रहालय’ उघडण्यात आले आहे. हे भारतामधील पहिले कीटक संग्रहालय आहे.
५ कोटी रूपये खर्चून तयार करण्यात आलेले संग्रहालय TNU च्या कृषी किटकशास्त्र विभागाकडून स्थापन करण्यात आले आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले आहे.
किटक संग्रहालयात विविध प्रजातींच्या किटकांच्या जीवनातील विविध टप्प्यातले जिवंत नमूने यासोबतच तेथे त्यांचे वर्तन, सवयी आणि स्थळ याविषयी माहिती देणारी छायाचित्रे, चलचित्रे प्रदर्शित केली जाणार. किटकांवर बनलेले चित्रपट आणि माहितीपट प्रदर्शित करण्यासाठी एक छोटेखानी ऑडिटोरियम आणि एक दुकानाची देखील व्यवस्था आहे.
केंद्र शासन एअर इंडियातून ७६% भागभांडवलाची निर्गुंतवणूक करणार
केंद्र शासनाने एअर इंडियातून ७६% भागभांडवलाची निर्गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.
विक्रीनंतर केंद्र शासनाने खाजगी विमानसेवा कंपनीकडे व्यवस्थापन सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. विक्रीनंतर केंद्र शासनाकडे एअर इंडियाचा २४% भाग असणार.
विजय राघवन केंद्र शासनाचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार
कृष्णास्वामी विजय राघवन यांची केंद्र शासनांचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार (Principal Scientific Advisor) पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
81 वर्षीय अणूभौतिकशास्त्रज्ञ आर. चिदंबरम (२००१ सालापासून) यांच्या जागी ही नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ६४ वर्षीय राघवन जैवतंत्रज्ञान विभागात सचिव पदावर कार्य करीत आहेत. त्यांनी IIT कानपुरमधून रसायन अभियांत्रिकीमध्ये पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
प्रधान वैज्ञानिक सल्लागार हे पद अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात सरकारने १९९९ साली तयार केले. हे वैज्ञानिक धोरणांशी संबंधित सर्व विषयांमध्ये सरकारचे सर्वोच्च सल्लागार आहेत.
गुरु गोबिंद सिंह यांच्या जयंतीनिमित्त RBI रू. ३५० चे नाणे प्रसिद्ध करणार
१० वे आणि शेवटचे शीख गुरू गुरु गोबिंद सिंह यांच्या जयंतीनिमित्त भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) रु.३५० मूल्य असलेले नाणे प्रसिद्ध करणार आहे.
रु.३५० नाणे ३५ ग्रॅम वजनी असून ते ५०% चांदी, ४०% तांबा आणि प्रत्येकी ५% निकेल आणि जस्त अश्या मिश्र धातूंनी बनविले गेलेले असेल.
अब्देल सिसी पुन्हा इजिप्तच्या राष्ट्रपती पदी
सिसी यांना ९२% हून अधिक मत प्राप्त झालीत. त्यामुळे त्यांचा राष्ट्रपती पदावरचा हा दुसरा कार्यकाळ असणार.

एअर इंडिया ही भारताच्या ध्वजाखाली सरकारी विमानवाहतूक सेवा कंपनी आहे. ही विमान सेवा ९० देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गंतव्यांपर्यंत दिली जात आहे.
१५ ऑक्टोबर १९३२ रोजी जे. आर. डी. टाटा यांनी ‘टाटा एअरलाइन्स’ या नावाने ही कंपनी सुरू केली होती.
विजय राघवन केंद्र शासनाचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार
कृष्णास्वामी विजय राघवन यांची केंद्र शासनांचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार (Principal Scientific Advisor) पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
81 वर्षीय अणूभौतिकशास्त्रज्ञ आर. चिदंबरम (२००१ सालापासून) यांच्या जागी ही नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ६४ वर्षीय राघवन जैवतंत्रज्ञान विभागात सचिव पदावर कार्य करीत आहेत. त्यांनी IIT कानपुरमधून रसायन अभियांत्रिकीमध्ये पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
प्रधान वैज्ञानिक सल्लागार हे पद अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात सरकारने १९९९ साली तयार केले. हे वैज्ञानिक धोरणांशी संबंधित सर्व विषयांमध्ये सरकारचे सर्वोच्च सल्लागार आहेत.
इंदू भूषण आयुष्मान भारत मोहिमेचे CEO
इंदू भूषण यांची ‘आयुष्मान भारत – राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा मोहीम (ABNHPM)’ च्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. CEO पदावर त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असणार.

भूषण सध्या मनीला स्थित आशियाई विकास बँक (ADB) चे महासंचालक आहेत. ते १९९७ पासून ADB मध्ये कार्यरत आहेत.
भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘आयुष्मान भारत’ योजनेंतर्गत देशामधील १० कोटी गरीब कुटुंबांना (अंदाजे ५० कोटी लाभार्थी) प्रत्येकी ५ लक्ष रुपयांपर्यंत मोफत उपचार घेण्यासाठी सुविधा प्रदान करण्यासाठीची योजना आहे.
ही योजना १ एप्रिल २०१८ पासून संपूर्ण भारतात लागू करण्यात येणार आहे.
गुरु गोबिंद सिंह यांच्या जयंतीनिमित्त RBI रू. ३५० चे नाणे प्रसिद्ध करणार
१० वे आणि शेवटचे शीख गुरू गुरु गोबिंद सिंह यांच्या जयंतीनिमित्त भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) रु.३५० मूल्य असलेले नाणे प्रसिद्ध करणार आहे.
रु.३५० नाणे ३५ ग्रॅम वजनी असून ते ५०% चांदी, ४०% तांबा आणि प्रत्येकी ५% निकेल आणि जस्त अश्या मिश्र धातूंनी बनविले गेलेले असेल.
नाण्याच्या उलट बाजूवर तख्त श्री हरिमंदिर पटना साहिबचे चित्र असेल. आंतरराष्ट्रीय अंकामध्ये ‘१६६६’ आणि ‘२०१६’ नाण्याच्या डाव्या आणि उजव्या परिघांवर छापलेले असेल.
अब्देल सिसी पुन्हा इजिप्तच्या राष्ट्रपती पदी
इजिप्तचे वर्तमान राष्ट्रपती अब्देल फतेह अल सिसी यांची राष्ट्रपती पदावर पुनर्निवड झाली आहे.