चालू घडामोडी ९ मार्च २०१८

चालू घडामोडी ९ मार्च २०१८

देशभरातील तीस महिलांना ‘नारी शक्ती पुरस्कार जाहीर’ 

सिंधुताई सपकाळ यांच्यासह देशभरातील तीस महिलांना ‘नारी शक्ती पुरस्कार जाहीर’ झाला आहे. आज जागतिक महिला दिनी हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

देशातील महिलांसाठीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मानला जाणारा ‘नारी शक्ती पुरस्कार’ केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आला आहे.

जागतिक माहिलादिनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या या पुरस्कारांमध्ये राज्यातील डॉ. सिंधुताई सपकाळयांच्यासह देशभरातील ३० महिला आणि संघटनांचा समावेश आहे.

नारी शक्ती पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या महिलांमध्ये अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ, जयम्मा भंडारी, के. श्यामलकुमारी, वनश्री, गार्गी गुप्ता, साबरमती टिकी, मित्तल पटेल, एस. सिवा सथ्य, डॉ. लिझीमोल, फिलिपोझ पमाद्यकंदाथिल, शिरोम इंदिरा, उर्मिला बळवंत आपटे, दीपिका कुंदाजी, पुर्णिमा बर्मन, अनिता भरद्वाज, भारती कश्यप, अंबिका बेरी, गौरी मौलेखी, पुष्पा गिरीमजी, श्रुजन, सी. के. दुर्गा, रेखा मिश्रा, थिनलाल कोरोल, मेहविश मुश्ताक, नविका सागर परिक्रमा, मधू जैन, जेट्सन पेमा, एम. एस. सुनिल, शीला बालाजी, मालविका अय्यर, रेवाना उमादेवी नागराज, अनुराधा कृष्णमुर्ती आणि नम्रता सुदर्शन, न्या. गिता मित्तल यांचा समावेश आहे.



मुंबई विमानतळ जगातील एक नंबर 
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ जगातील अव्वल क्रमांकाचे विमानतळ ठरले आहे.

एअरपोर्ट काउन्सिल इंटरनॅशनलने विमानतळाच्या सोई-सुविधेनुसार सर्वेक्षण केले. यात चेकइन, विमानतळावरील प्रवेश, सुरक्षा, प्रवाशांचे विश्रामगृह, प्रवाशांची खानपान व्यवस्था, प्रवासी सामान कक्ष या बाबींचा समावेश होता. या सर्व बाबींत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने अव्वल ठरत सर्वेक्षणामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.

मुंबई आणि दिल्ली विमानतळाला विभागून हा क्रमांक देण्यात आला आहे.



संरक्षणावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशात भारत चौथ्या क्रमांकावर 
अत्याधुनिक शस्त्रास्त्र विकसित करणारा चीन सातत्याने आपल्या संरक्षण खर्चात वाढ करत आहे. तसेच याही वर्षी चीनने आपल्या संरक्षणासाठी ११.४ लाख कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. तर यात गेल्या वर्षीच्या तुलनेत ही ८.१ टक्क्यांची वाढ आहे.

अमेरिकेनंतर संरक्षणावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशांच्या यादीत चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे.

अमेरिका आणि चीनच्या तुलनेत भारत मागे असला तरीही सर्वाधिक संरक्षण बजेट सादर करणाऱ्यांच्या बाबतीत भारताचा चौथा क्रमांक आहे.

भारताने संरक्षण खर्चाच्या बाबतीत रशिया आणि ब्रिटनसारख्या बलाढ्य देशांना सुद्धा पिछाडीवर टाकले आहे.

इंटरनॅशनल इंस्टीटूयट फॉर स्ट्रॅटजिक स्टडीजने २०१८ ची ही आकडेवारी जारी केली आहे.


नागालँडच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा नेफियू रियो यांची नियुक्ती 
नॅशनल डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पक्षाचे अध्यक्ष नेफियू रियो यांची नागालँडच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा निवडकरण्यात आली. त्यामुळे नेफियू रियो हे चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत.

राज्यपाल पी.बी. आचार्य यांनी रियो यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. विशेष म्हणजे त्यांचा शपथविधी सोहळा राजभवनाबाहेर झाला. त्यामुळे राजभवनाबाहेर शपथ घेणारे ते पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत.

नेफियू रियो यांचा शपथविधी सोहळा कोहिमा लोकल मैदानात संपन्न झाला. या शपथविधी सोहळ्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन, केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिज्जू यांच्यासह इतर काही राजकीय नेते उपस्थित होते.



अब्जाधीशांच्या यादीत भारत जगात तिसर्‍या क्रमांकावर 
अब्जाधीशांच्या यादीत भारत पहिल्यांदाच जगात तिसऱ्या स्थानावर झळकला आहे. भारतात एकूण १२१ अब्जाधीश असून ही संख्या मागील वर्षीपेक्षा १९ अंकांनी वधारली आहे.

अमेरिकेत सर्वाधिक ५८५ तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या चीनमध्ये ३७३ अब्जाधीश आहेत. 
फोर्ब्जने जाहीर केलेल्या अब्जाधीशांच्या या यादीत अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोज १०० अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह प्रथम क्रमांकावर आहेत.

देशात मुकेश अंबानींची संपत्ती सर्वाधिक ४०.१ अब्ज डॉलर्स इतकी आहे. त्यांच्या संपत्तीत मागील वर्षीपेक्षा १६.९ अब्ज डॉलर्सची भर पडली आहे. त्यांचे भारतातल्या सर्वाधिक श्रीमंताच्या यादीतले स्थान यंदाही अढळ आहे. जागतिक पातळीवर त्यांनी ३३ व्या क्रमांकावरून १९ व्या क्रमांकावर भरारी घेतली आहे.

तसेच अझीम प्रेमजी यांनी लक्ष्मी मित्तल यांना यंदा मागे टाकत भारतातले सर्वाधिक श्रीमंतांचे दुसरे स्थान पटकावले आहे.



NITI आयोगातर्फे ‘महिला उद्योजकता व्यासपीठ (WEP)’ चा शुभारंभ 
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त NITI आयोगाने ८ मार्च २०१८ रोजी नवी दिल्लीत ‘महिला उद्योजकता व्यासपीठ (WEP)’ चा शुभारंभ केला आहे.

महिला उद्योजकता व्यासपीठ (WEP) हा असा एक मंच आहे, जेथे महिलांमधील उद्योजकतेस प्रोत्साहन दिले जाणार. मदत करणार्‍या संस्थांच्या सहाय्याने महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणे, त्यांना योजना, कार्यक्रमे व सेवांशी जोडणे, व्यापारासंबंधी अडचणी ओळखून त्यांचे निराकरण करणे, त्यांची नोंदणी, आणि अश्या अनेक बाबींवर येथे विचार केला जाणार.



भारताच्या UPSC आणि मॉरिशसच्या PSC यांच्यातल्या सामंजस्य करारास मंजूरी 
केंद्रीय मंत्रिमंडळाने संघ लोक सेवा आयोग (UPSC) आणि मॉरिशसच्या लोक सेवा आयोग (PSC) यांच्यात सामंजस्य करार करण्यास मंजूरी दिली आहे.

करारामधून भर्ती क्षेत्रात दोन्ही पक्षांचे अनुभव आणि विशेषज्ञता यासाठी एक आदानप्रदान सुविधा प्राप्त होणार. शिवाय दस्‍ताऐवज, परीक्षा घेण्यामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर, ऑनलाइन परीक्षा, अर्जांची छाटणीआदि बाबींमध्ये अनुभवांचे आदानप्रदान केले जाणार.
Scroll to Top