पश्चिम घाटात वनस्पतीची नवीन प्रजाती आढळली
भारतीय संशोधकांनी पश्चिम घाटात वनस्पतीच्या एका नवीन प्रजातीचा शोध लावला आहे. या गवती वनस्पतीला ‘फिमब्रिस्टायलीस अगस्थ्यमॅलेन्सिस’ हे देण्यात आले आहे.
ए. आर. विजी आणि प्रा. टी. एस. प्रीथा या संशोधकांनी केरळ आणि तामिळनाडू क्षेत्रातल्या अगस्थ्यमाला बायोस्फीयर रिझर्व्हमधील पोनमूडी पर्वतराजीच्या दलदली गवताळ प्रदेशांत ही वनस्पती आढळून आली.
या वनस्पतीला ‘सेज’ म्हणून वर्गीकृत केले गेले आहे.
२१ व्या राष्ट्रकुल खेळांना सुरुवात झाली
ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये 4 एप्रिलला 21 व्या राष्ट्रकुल खेळांचे (Gold Coast Commonwealth Games) उद्घाटन झाले. ऑस्ट्रेलिया हे खेळ पाचव्यांदा आयोजित करीत आहे.
18 दिवस चालणार्या कार्यक्रमात विविध स्पर्धांमध्ये 275 सुवर्ण पदकांसाठी 18 क्रिडा प्रकारात 71 देशांतील 6500 हून अधिक खेळाडू भाग घेतील. 225 जणांच्या भारतीय संघाचे नेतृत्व पी. व्ही. सिंधूने केले.
राष्ट्रकुल खेळ ही राष्ट्रकुल परिषदेमधील सभासद राष्ट्रांची एक क्रीडा स्पर्धा आहे. 1930 सालापासून राष्ट्रकुल खेळ स्पर्धा दर चार वर्षांनी आयोजित केली जाते.
इकरस – आतापर्यंतचा सर्वात दूरवरचा तारा
खगोलशास्त्रज्ञांनी आतापर्यंत पाहिलेला सर्वात दूरवरचा तारा शोधला आहे. हा तारा जवळजवळ संपूर्ण विश्वाच्या अर्ध्यापेक्षा अधिक अंतरावर असल्याचा अंदाज आहे.
या तार्याला ‘इकरस’ (प्राचीन ग्रीक पौराणिक व्यक्तीचे नाव) हे नाव दिले गेले आहे. हा तारा सूर्यापेक्षा लक्षपटीने अधिक तेजस्वी आणि साधारणतः दुप्पट गरम आहे.
पूर्वी या तार्याला औपचारिकरित्या ‘MACS J1149+2223 लेंस्ड स्टार-1’ असे नाव देण्यात आले होते. हा तारा शोधण्यासाठी NASA च्या हबल स्पेस टेलिस्कोपचा वापर केला गेला.
कोलकाता शहरातून निघून 60 कंटेनरसह ही ट्रेन भारतातून सिलदाह, न्याहती, रानाघाट, गदे आणि बांग्लादेशातील दर्साना व ईशूरदी मार्गे ढाकापासून 117 किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या बंगाबंधू (पश्चिम) स्थानकाकडे पोहचणार.
रशिया टर्कीचा पहिले अणुऊर्जा प्रकल्प उभारत आहे
टर्कीचे राष्ट्रपती रेसेप तय्यिप एर्दोगान आणि रशियाचे व्लादीमीर पुतीन यांनी 3 एप्रिलला टर्कीच्या पहिले अणुऊर्जा प्रकल्पाच्या बांधकामाचे उद्घाटन केले आहे.
भूमध्य प्रदेशातल्या मेरसिन क्षेत्रात अंकारा येथे $ 20 अब्ज खर्चून ‘अक्कुयू अणुऊर्जा प्रकल्प’ उभारला जात आहे. टर्की हा एक युरोपीय देश आहे. देशाची राजधानी शहर अंकारा आणि चलन तुर्की लिरा हे आहे.
बाकूमध्ये गट-निरपेक्ष चळवळ (NAM) च्या वरिष्ठ अधिकार्यांची बैठक झाली
3 एप्रिल 2018 रोजी अझरबैजानची राजधानी बाकू शहरात ‘गट-निरपेक्ष चळवळ (Non-Aligned Movement-NAM)’ च्या वरिष्ठ अधिकार्यांची बैठक झाली.
“इंटरनॅशनल पीस अँड सिक्युरिटी फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट” या विषयाखाली 5 आणि 6 एप्रिल रोजी बाकूमध्ये NAM ची शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे. ही त्यासाठी पूर्वतयारी बैठक होती.
तेल गळतीनंतर इंडोनेशियाने आणीबाणी घोषित केली
इंडोनेशिया सरकारने मोठ्या तेल गळतीमुळे बोर्नियो बेटावरील बंदरांच्या परिसरात आणीबाणी घोषित केली आहे.
बालीकपापन बंदर शहरातील आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे, परंतु 31 मार्चपासून झालेल्या गळतीमुळे तेल 12 चौरस किलोमीटरच्या परिसरात पसरले आहे.

नवीन प्रजाती ‘सायपेरासीए’ कुटुंबातली आहे. या बहुतेक औषधी वनस्पती आहेत किंवा चारा म्हणून वापरल्या जातात.
२१ व्या राष्ट्रकुल खेळांना सुरुवात झाली
ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये 4 एप्रिलला 21 व्या राष्ट्रकुल खेळांचे (Gold Coast Commonwealth Games) उद्घाटन झाले. ऑस्ट्रेलिया हे खेळ पाचव्यांदा आयोजित करीत आहे.
18 दिवस चालणार्या कार्यक्रमात विविध स्पर्धांमध्ये 275 सुवर्ण पदकांसाठी 18 क्रिडा प्रकारात 71 देशांतील 6500 हून अधिक खेळाडू भाग घेतील. 225 जणांच्या भारतीय संघाचे नेतृत्व पी. व्ही. सिंधूने केले.
राष्ट्रकुल खेळ ही राष्ट्रकुल परिषदेमधील सभासद राष्ट्रांची एक क्रीडा स्पर्धा आहे. 1930 सालापासून राष्ट्रकुल खेळ स्पर्धा दर चार वर्षांनी आयोजित केली जाते.
स्पर्धेला 1954 साली ब्रिटिश एम्पायर खेळ, त्यानंतर ब्रिटिश एम्पायर व राष्ट्रकुल खेळ आणि 1970 सालापासून ब्रिटिश राष्ट्रकुल खेळ आणि 1978 साली राष्ट्रकुल खेळ हे नाव दिले गेले. राष्ट्रकुल खेळ महासंघ (CGF) याचे लंडनमध्ये मुख्यालय आहे.
इकरस – आतापर्यंतचा सर्वात दूरवरचा तारा
खगोलशास्त्रज्ञांनी आतापर्यंत पाहिलेला सर्वात दूरवरचा तारा शोधला आहे. हा तारा जवळजवळ संपूर्ण विश्वाच्या अर्ध्यापेक्षा अधिक अंतरावर असल्याचा अंदाज आहे.
या तार्याला ‘इकरस’ (प्राचीन ग्रीक पौराणिक व्यक्तीचे नाव) हे नाव दिले गेले आहे. हा तारा सूर्यापेक्षा लक्षपटीने अधिक तेजस्वी आणि साधारणतः दुप्पट गरम आहे.
हा पृथ्वीपासून 9.3 अब्ज प्रकाशवर्ष दूर आहे. हा एक प्रकारचा तारा आहे, ज्याला ‘ब्ल्यू सुपरजायंट’ म्हणतात.
पूर्वी या तार्याला औपचारिकरित्या ‘MACS J1149+2223 लेंस्ड स्टार-1’ असे नाव देण्यात आले होते. हा तारा शोधण्यासाठी NASA च्या हबल स्पेस टेलिस्कोपचा वापर केला गेला.
भारत-बांग्लादेश दरम्यान पहिली कंटेनर रेल्वे सुरू
भारत आणि बांग्लादेश दरम्यान प्रायोगिक तत्वावर पहिली कंटेनर ट्रेन सुरू करण्यात आली आहे.
भारत आणि बांग्लादेश दरम्यान प्रायोगिक तत्वावर पहिली कंटेनर ट्रेन सुरू करण्यात आली आहे.
कोलकाता शहरातून निघून 60 कंटेनरसह ही ट्रेन भारतातून सिलदाह, न्याहती, रानाघाट, गदे आणि बांग्लादेशातील दर्साना व ईशूरदी मार्गे ढाकापासून 117 किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या बंगाबंधू (पश्चिम) स्थानकाकडे पोहचणार.
रशिया टर्कीचा पहिले अणुऊर्जा प्रकल्प उभारत आहे
टर्कीचे राष्ट्रपती रेसेप तय्यिप एर्दोगान आणि रशियाचे व्लादीमीर पुतीन यांनी 3 एप्रिलला टर्कीच्या पहिले अणुऊर्जा प्रकल्पाच्या बांधकामाचे उद्घाटन केले आहे.
भूमध्य प्रदेशातल्या मेरसिन क्षेत्रात अंकारा येथे $ 20 अब्ज खर्चून ‘अक्कुयू अणुऊर्जा प्रकल्प’ उभारला जात आहे. टर्की हा एक युरोपीय देश आहे. देशाची राजधानी शहर अंकारा आणि चलन तुर्की लिरा हे आहे.
बाकूमध्ये गट-निरपेक्ष चळवळ (NAM) च्या वरिष्ठ अधिकार्यांची बैठक झाली
3 एप्रिल 2018 रोजी अझरबैजानची राजधानी बाकू शहरात ‘गट-निरपेक्ष चळवळ (Non-Aligned Movement-NAM)’ च्या वरिष्ठ अधिकार्यांची बैठक झाली.
“इंटरनॅशनल पीस अँड सिक्युरिटी फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट” या विषयाखाली 5 आणि 6 एप्रिल रोजी बाकूमध्ये NAM ची शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे. ही त्यासाठी पूर्वतयारी बैठक होती.
1961 मध्ये बेलग्रेड परिषदेत गट-निरपेक्ष चळवळ (NAM) अस्तित्वात आली. ही चळवळ भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इजिप्तचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्दल नासर आणि युगोस्लाव्हियाचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ ब्रॉज टिटो यांनी स्थापन केली होती.
NAM ही अशी राष्ट्रांची एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे, जी जगाच्या कोणत्याही अधिकारीत समुहासोबत किंवा त्याच्या विरोधात उभी राहणार नाही आणि निष्पक्षरित्या आपले कार्य करणार या निश्चयाने तयार केली गेली.
याची व्याख्या हवाना घोषणापत्र-1979 मधून स्पष्ट केली गेली. NAM मध्ये 120 राज्यांचा समावेश आहे. NAM ला 17 राज्ये आणि 10 आंतरराष्ट्रीय संस्थांच्या निरीक्षकांचा दर्जा आहे