महाराष्ट्रातील कर्करोग पिडीतांना मोफत केमोथेरपी उपचार
कर्करोगावरील उपचारामध्ये असणाऱ्या केमोथेरपीची सुविधा राज्यातील जिल्हा रुग्णालयात मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
साधारणता जून महिन्यापासून या योजनेचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. त्यात नागपूर, गडचिरोली, पुणे, अमरावती, जळगाव, नाशिक, वर्धा, सातारा, भंडारा आणि अकोला या १० जिल्ह्यांचा समावेश आहे. मुंबईतील टाटा रुग्णालयात याबाबत वैद्यकीय अधिकार्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
राष्ट्रीय कर्करोग नोंदणी कार्यक्रमानुसार देशात वर्षभरात सुमारे ११ लाख कर्करुग्ण आढळून येतात. देशात जुने आणि नवे मिळून सुमारे २८ लाख कर्करुग्णांची संख्या आहे. त्यापैकी पाच लाख मृत्यू दरवर्षी कर्करोगाने होतात. महाराष्ट्रातील कर्करोगाचे प्रमाण कमी करण्याबाबत राज्य शासनातर्फे उपाययोजना केल्या जातात.
‘गोबर धन’ योजनेंतर्गत शेणापासून बायोगॅस प्लांट वैयक्तिक, सामुदायिक, बचत गट, किंवा गौशाळा सारख्या NGO च्या पातळीवर स्थापित केले जाऊ शकणार. प्रकल्पासाठी तांत्रिक विशेषज्ञांची मदत घेतली जाणार.
VSSC ने या प्रकारचा अभ्यास आधीपासूनच करीत आहे. १९६० साली वातावरणासंबंधी अभ्यास करण्यासाठी विदेशी क्षेपणास्त्राची मदत घेतली गेली होती.
विक्रम साराभाई अंतराळ केंद्र (VSSC) भारताच्या उपग्रह कार्यक्रमांसाठी क्षेपणास्त्र आणि अंतराळ यानांवर लक्ष केंद्रित करणारे ISRO चे प्रमुख संशोधन केंद्र आहे. हे केरळ राज्यातील तिरुवनंतपुरम येथे स्थित आहे. याची स्थापना १९६३ साली करण्यात आली.
पेसच्या विश्वविक्रमासह भारताचा विजय
एकेरीचे पहिले दोन्ही सामने गमावल्यानंतर भारतीय संघ डेव्हिस चषक टेनिस लढतीत पराभवाच्या दिशेने होता. मात्र लिएण्डर पेसने धडाकेबाज खेळी करत विश्वविक्रम केला आहे.
भारतीय खेळाडूंनी एकेरीचे परतीचे दोन्ही सामने जिंकले आणि चीनवर ३-२ असा विजय नोंदवला आहे.
तसेच पेसने रोहन बोपण्णाच्या साथीत दुहेरीत माओ झिन गोंग व झेई झांग यांच्यावर ५-७, ७-६ (७-५), ७-६ (७-३)अशी मात केली आहे.
हा सामना जिंकून पेसने स्पर्धेतील दुहेरीत सर्वाधिक ४३ सामने जिंकण्याचा विश्वविक्रम नोंदवला आहे.
नेपाळ-भारत यांच्यात ६ करार
भारत-नेपाळमध्ये संरक्षण, व्यापाराच्या क्षेत्रात सहकार्य वाढीवर सहमती झाली आहे. त्यात व्यापार, संरक्षण, रेल्वे, पाणी संबंधी सहा करारांवर स्वाक्षरी झाली आहे.
भारत-नेपाळ यांच्यात संपर्क वाढवण्यावर सहमती झाली आहे. त्यात तीन मुद्दे महत्त्वाचे ठरणार आहेत. रक्सोलहून काठमांडू दरम्यान रेल् वे मार्ग, नद्यांच्या माध्यमातून जलमार्ग संपर्क व नेपाळमध्ये कृषी क्षेत्रात सहकार्य व भागीदारीकेली जाणार आहे. तसेच रक्सोल ते काठमांडू विजेवरील रेल्वे रुळ अंथरण्यात येणार आहे.

हरियाणामधून केंद्र शासनाच्या ‘गोबर धन’ योजनेचा शुभारंभ
हरियाणाच्या कर्नाळ शहरात ३० एप्रिल २०१८ रोजी केंद्र शासनाच्या ‘गोबर धन’ योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

गोबर (GOBAR) म्हणजे ‘गॅल्व्हनाइजिंग ऑर्गेनिक बायो एग्रो रिसोर्सेस’. राष्ट्र पातळीवर राबविण्यात येणार्या ‘गोबर धन’ योजनेमार्फत घन कचरा व जनावरांच्या मलमूत्रापासून खते व बायोगॅस इंधन निर्मिती केली जाणार आहे.
‘गोबर धन’ योजनेंतर्गत शेणापासून बायोगॅस प्लांट वैयक्तिक, सामुदायिक, बचत गट, किंवा गौशाळा सारख्या NGO च्या पातळीवर स्थापित केले जाऊ शकणार. प्रकल्पासाठी तांत्रिक विशेषज्ञांची मदत घेतली जाणार.
त्यासाठी केंद्र आणि राज्य शासन ६०:४० च्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणार. योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक जिल्हयात एक गावाची निवड केली जाईल. यावर्षी योजनेंतर्गत ७०० जिल्ह्यांना सामील करण्यात येणार आहे.
वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी RH300 ध्वनी क्षेपणास्त्र सोडले
वातावरणाचा अचूक अंदाज घेण्यासाठी ६ एप्रिल २०१८ रोजी विक्रम साराभाई अंतराळ केंद्राद्वारे (VSSC) विकसित करण्यात आलेले ‘RH-३००’ ध्वनी क्षेपणास्त्र (RH300 sounding rocket) केरळच्या थुम्बा इक्वाटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशनवरून सोडण्यात आले आहे.
वातावरणाचा अचूक अंदाज घेण्यासाठी ६ एप्रिल २०१८ रोजी विक्रम साराभाई अंतराळ केंद्राद्वारे (VSSC) विकसित करण्यात आलेले ‘RH-३००’ ध्वनी क्षेपणास्त्र (RH300 sounding rocket) केरळच्या थुम्बा इक्वाटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशनवरून सोडण्यात आले आहे.
VSSC ने या प्रकारचा अभ्यास आधीपासूनच करीत आहे. १९६० साली वातावरणासंबंधी अभ्यास करण्यासाठी विदेशी क्षेपणास्त्राची मदत घेतली गेली होती.
पहिल्यांदा स्वदेशी क्षेपणास्त्राचा वापर २ मे १९६५ रोजी केला गेला होता. याअंतर्गत RH-300 MK2 क्षेपणास्त्रापासून माहिती गोळा केली जात आहे. यावेळी हे RH300 ध्वनी क्षेपणास्त्राचे २१ वे प्रक्षेपण होते.