चालू घडामोडी १० एप्रिल २०१८

चालू घडामोडी १० एप्रिल २०१८

मुंबईमध्ये ८ व्या आंतरराष्ट्रीय रंगभूमी ऑलंपिकची सांगता 
१७ फेब्रुवारी ते ८ एप्रिल २०१८ या कालावधीत भारतात ‘फ्लॅग ऑफ फ्रेंडशिप’ या विषयाखाली आठव्या ‘आंतरराष्ट्रीय रंगभूमी ऑलंपिक’ (Theatre Olympics) चे आयोजन केले गेले होते.


कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या (NSD) वतीने करण्यात आले होते. यावर्षी भारतात प्रथमच या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. या कार्यक्रमात जगभरातील ३० देशांनी ४५० नाटके सादर केलीत.

दिल्लीत लालकिल्यात उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले आणि मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया येथे या कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यक्रमांचे आयोजन १७ शहरांमध्ये केले गेले.

वर्ष १९९५ मध्ये ग्रीसच्या डेल्फाई शहरात प्रथम आंतरराष्ट्रीय रंगभूमी ऑलंपिक (International Theatre Olympics) आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर जपान (१९९९), रशिया (२००१), टर्की (२००६), दक्षिण कोरिया (२०१०), चीन (२०१४), पोलंड (२०१६) मध्ये ऑलंपिकचे आयोजन केले गेले.



पाच स्थानके लवकरच रोकडरहित 
रेल्वे स्थानकातील सेवांचा लाभ घेताना प्रवाशांनी जास्तीत जास्त रोकडरहित (कॅशलेस) व्यवहारावर भर द्यावा, या उद्देशाने मध्य रेल्वेवरील आणखी पाच स्थानकांवर रोकडरहित सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि ठाणे या तीन स्थानकांनंतर आता आणखी पाच स्थानकांत रोकडरहित सुविधा सुरू केली जाणार आहे. यामध्ये दादर, माटुंगासह भायखळा, कल्याण, अंबरनाथ स्थानकांचा समावेश आहे.

तिकीट खिडक्यांवर, रेल्वे हद्दीतील वाहन पार्किंग सुविधा, प्रसाधनगृह, खाद्यपदार्थ आणि बुक स्टॉल्स, विश्रामकक्षांसाठी शुल्क देण्यासाठी पीओएस यंत्र, पेटीएम, स्कॅन कोड इत्यादी सुविधा येत्या सहा महिन्यांत टप्प्याटप्प्यात उपलब्ध केल्या जातील


RBI च्या निरीक्षणाखाली ११ सार्वजनिक बँका 
बँकिंग क्षेत्रातल्या वाढत्या अकार्यक्षम संपत्तीच्या समस्येवरून तब्बल ११ सार्वजनिक क्षेत्रातील बँका भारतीय रिझर्व बँक (RBI) च्या निरीक्षणाखाली आल्या आहेत. या सर्व बँकांना RBI च्या त्वरित सुधारात्मक कारवाई (Prompt Corrective Action -PCA) कार्यचौकटी अंतर्गत आणण्यात आले आहे. 

११ सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये – ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC), IDBI बँक, इंडियन ओवरसीज बँक, UCO बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, देना बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, कॉरपोरेशन बँक, यूनायटेड बँक ऑफ इंडिया, अलाहाबाद बँक आणि बँक ऑफ इंडिया – या बँकांचा समावेश आहे.

‘त्वरित सुधारात्मक कार्यवाही (PCA)’ हे RBI द्वारा प्रस्तुत केले गेलेले एक गुणात्मक साधन आहे, ज्याअंतर्गत बँकांचे वित्तीय आरोग्य कायम चांगले राखण्यासाठी कमकुवत बँकांवर प्रत्यक्ष कार्यवाही केली जाते आणि त्यांना अत्याधिक नुकसानीपासून वाचविण्यात येते. नियामक कार्यवाहीमधून बँकांची कार्यक्षमतेवर ‘कोणत्याही प्रकारे भौतिक प्रभाव’ पडत नाही आणि ही कार्यवाही आपत्ती व्यवस्थापन, संपत्तीची गुणवत्ता, लाभ आणि दक्षता यामध्ये समग्र सुधारणा आणण्यास योगदान देते.

सन २०२२ मध्ये RBI गव्हर्नर बिमल जलान यांच्या कार्यकाळात भारतात प्रथमच PCA प्रस्तुत केले गेले आणि एप्रिल २०१७ मध्ये RBI गवर्नर उर्जित पटेल यांनी या नियमांना आणखी कडक केले. ही प्रक्रिया ग्रामीण प्रादेशिक बँका (RRB) यांना वगळता सर्व अनुसूचित वाणिज्यिक बँकांसाठी (SCB) लागू होते. याच्या कार्यकक्षेत पेमेंट बँक, बिगर बँकिंग वित्तीय संस्था (NBFC) आणि मुद्रा बँका येत नाहीत.



इक्वेटोरीयल गिनीला भेट देणारे पहिले भारतीय राष्ट्रपती 
भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद इक्वेटोरीयल गिनी (विषवृत्तीय गिनी) या आफ्रिकेच्या राष्ट्राच्या दौर्‍यावर आहेत. यासोबतच, राष्ट्रपती राम नाथ कोविंद हे इक्वेटोरीयल गिनीला भेट देणारे पहिले भारतीय राष्ट्रपती बनले आहेत.

गिनीचे राष्ट्रपती टिओडोरो ओबीयांग नगुएमा मबासोगो यांनी राजधानी मालाबो येथे त्यांचे स्वागत केले. त्यांनी राष्ट्रपती कोविंद यांना ‘कोंडेकोरॅसीयन’ या देशाच्या सर्वोच्च गैर-नागरिक सन्मानाने गौरवले.

राष्ट्रपती राम नाथ कोविंद त्यांच्या दौर्‍यात आफ्रिकेतील इक्वेटोरियल गिनी, स्वाझिलँड आणि झांबिया या तीन देशांना भेटी देणार आहेत.



त्रिपुराने आगरतळामध्ये PMKVY च्या राज्य घटकाचे उद्घाटन केले 
त्रिपुराची राजधानी आगरतळा येथे त्रिपुराचे मुख्यमंत्री बिपलाब कुमार देब यांच्या हस्ते ७ एप्रिलला प्रधानमंत्री कौशल विकास योजना (PMKVY) याच्या राज्य घटकाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

यासोबतच, त्रिपुरा प्रधानमंत्री कौशल विकास योजना (PMKVY) हा कार्यक्रम राबविणारा ईशान्य भारतातला पहिला राज्य बनला.

राज्य शासनाने २०२० सालापर्यंत राज्यातील एक लाखापेक्षा जास्त युवांना प्रशिक्षण देण्याचा उद्देश ठेवला आहे.
Scroll to Top