गणिताचे भय हटवण्यासाठी चुडासमा समितीची निर्मिती
मनुष्यबळ विकास मंत्रालयाने गुजरातचे शिक्षण मंत्री भूपेंद्रसिंह चुडासमा यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली आहे. ही समिती गणित विषयाची सुलभ मांडणी करण्याच्या पद्धती सुचविणार आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) याच्या वार्षिक बैठकीनंतर मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही घोषणा केली. विद्यार्थ्यांची गणितांतील भीती दूर करण्यासाठी झालेल्या राष्ट्रीय आकलन सर्वेक्षणानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
इस्त्रोच्या IRNSS-1I या उपग्रहाचे यशस्वी उड्डाण
भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोने IRNSS-1I या उपग्रहाचे यशस्वी उड्डाण केले आहे. संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचा IRNSS-1I चा उपग्रह PSLV-C41 प्रक्षेपकाद्वारे अवकाशात झेपावला आहे.
आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा या ठिकाणी असलेल्या सतीश धवन अवकाश तळावरून हा उपग्रह अवकाशात झेपावला. तर PSLV चे हे 43 वे उड्डाण आहे.
तसेच दिशादर्शनच्या सात उपग्रहांची एक साखळी आहे. IRNSS-1I अवकाश कक्षेत स्थिर झाल्यानंतर या उपग्रहांच्या समूहामध्ये दाखल IRNSS-1I उपग्रह IRNSS-1A या दिशादर्शक उपग्रहाची जागा घेणार आहे.
IRNSS-1A या दिशादर्शक उपग्रहात बिघाड झाल्याने हा उपग्रह पाठवण्यात आला आहे. या उपग्रहाद्वारे मच्छीमारांना समुद्रात जाण्याआधी वातावरणाची योग्य माहिती मिळेल. तर मच्छिमारांना दिशादर्शक असा हा उपग्रह ठरणार आहे.
राहुल आवारेला राष्ट्रकुलचं सुवर्णपदक
ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या राहुल आवारेने भारताला कुस्तीतलं पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे.
57 किलो वजनी गटात राहुलने कॅनडाचा प्रतिस्पर्धी स्टिव्हन ताकाशाहीवर मात करत भारताच्या खात्यावर आणखी एक सुवर्णपदकाची भर घातली आहे.
याव्यतिरीक्त 53 किलो वजनी गटात भारताच्या बबिता कुमारी फोगटने रौप्यपदकाची कमाई केली आहे.
श्रीकांतला जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत पहिलं स्थान
बॅडमिंटनमधील भारताचा स्टार खेळाडू किदम्बी श्रीकांत याने जागतिक क्रमवारी पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. पुरुषांच्या यादीत अव्वल स्थान मिळवणारा श्रीकांत हा पहिला भारतीय बॅडमिंटनपटू ठरला आहे.
वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशनने (BWF) या क्रमवारीची यादी जाहीर केली.
सायना नेहवालनमागोमाग आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये प्रशंसनीय कामगिरी करत भारताचं प्रतिनिधीत्व करणाराश्रीकांत दुसरा खेळाडू ठरला आहे.
पुरुष एकेरी गटात जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर येणाऱ्या श्रीकांतने विश्वविजेत्या विक्टर अॅक्सेल्सेनला मागे टाकत 76,895 गुणांची कमाई केली आहे. तर या यादीमध्ये 11 व्या स्थानावरही भारताच्या एचएस प्रणॉयने झेप घेतली आहे.
आरक्षणाऐवजी दिव्यांग, मागास वर्गीय आणि अल्पसंख्यकांसाठी विशेष व्यवस्था केली जाणार.
बांग्लादेश हा दक्षिण आशियातला देश आहे. ढाका ही देशाची राजधानी आहे. बांग्लादेशी टाका हे राष्ट्रीय चलन आहे.
जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचा मान जपानच्या नोनाका यांना
जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती म्हणून जपानचे ११२ वर्षीय मसाझो नोनाका यांना मान्यता देण्यात आली आहे.नोनाका यांचा जन्म २५ जुलै १९०५ मध्ये झाला होता.
नोनाका हे सर्वात वयोवृद्ध असल्याचे प्रमाणपत्र गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसने त्यांना दिले आहे. तसेच स्पेनची वयोवृद्ध व्यक्ती फ्रान्सिस्को न्यूनेझ ओलिव्हरा यांचे वयाच्या ११३ व्या वर्षी निधन झाले होते, त्यानंतर ही नवीन नोंद करण्यात आली आहे.
२०१७ मध्ये जमेकातील व्हायोलेट ब्राऊन यांचा वयाच्या ११७ व्या वर्षी मृत्यू झाला होता.
जपान हा देश दीर्घायुषी लोकांसाठी प्रसिद्ध असून तेथील जेरोमॉन किमोरा यांचे २०१३ मध्ये वयाच्या ११६ व्या वर्षी निधन झाले होते.
तसेच जपानमध्ये शंभरी ओलांडलेले किमान ६८००० लोक आहेत, असे सरकारी आकडेवारीतून दिसून आले आहे.
जुलैमध्ये सूर्यावर पहिले अंतराळयान
माणसाने सूर्यावर स्वारी करण्याची कल्पना आता प्रत्यक्षात साकारणार आहे. पार्कर सोलार प्रोब हे नासाचे अंतराळयान 31 जुलै रोजी सूर्याच्या दिशेने झेपावणार आहे.
हे अंतराळयान हवाई दलाच्या विमानातून फ्लोरिडा येथे नेण्यात आले असून तिथे त्याच्या काही चाचण्या घेण्यात येत आहेत.
डेल्टा आयव्ही अग्निबाणाच्या सहाय्याने पार्कर सोलार प्रोब अवकाशात प्रक्षेपित करण्यात येईल. ते सूर्याच्या अगदी जवळ जाणार आहे.
आजवर तिथपर्यंत मानवनिर्मित एकही गोष्ट पोहोचू शकलेली नाही.

बांग्लादेशात शासकीय नोकर्यांमध्ये ‘आरक्षण’ पद्धत भंग करण्यात आली
बांग्लादेश सरकारने शासकीय नोकर्यांमध्ये ‘आरक्षण’ पद्धत भंग करण्याचा निर्णय घेतला आहे.